मुलींनी कोणत्या पायात बांधावा काळा धागा?

राशिभविष्य अध्यात्मिक

मित्रांनो पूर्वीच्या काळी सर्वच जण हे आपल्या पायाला, हाताला तसेच कमरेला देखील काळा दोरा बांधत असत. आपले जे आजोबा किंवा आजी असतील ते नजर न लागण्यासाठी देखील हा काळा दोरा आपल्या हातात किंवा पायामध्ये बांधत असत. परंतु आजकाल तर विविध रंगाचे दोरे हे फॅशन म्हणून आपल्या हातामध्ये बांधले जातात.

परंतु मित्रांनो जो काळा धागा असतो याला पूर्वीच्या काळी खूपच महत्त्व असायचे आणि आजच्या काळामध्ये देखील काही जण हे मानतात देखील तर काहीजण हे अंधश्रद्धा आहे असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करीत असतात. तर मित्रांनो मुलांना तसेच मुलींना देखील पायामध्ये काळा धागा बांधल्याने त्यांना नजर लागत नाही असे मानले जाते.

परंतु हा जो काळा धागा आहे हा मुलींच्या पायामध्ये नेमक्या कोणत्या पायात बांधावा याविषयीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. काळा धागा योग्य वेळी आणि योग्य ठिकाणीच घालायला हवा असे ज्योतिषशास्त्रात मानण्यात येते.

मित्रांनो,काळा धागा हा शनि देवतेचे प्रतिनिधित्व करतो. आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही नकारात्मक शक्तीचा प्रभाव असेल किंवा वाईट नजर दोष असेल हा जर आपल्याला दूर करायचा असेल तर हा काळा दोरा हात, दंड अथवा पायावर बांधला जातो. तुम्ही जर पायात काळा दोरा बांधणार असाल, तर तुम्ही शनिवारच्या दिवशी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन हा काळा दोरा बांधायला हवा.

तर मित्रानो,काळा दोरा हा नजरदोष आणि आयुष्यातील संकटे दूर करण्यासाठी बांधण्यात येतो. त्यामुळे कोणत्याही शनिवारी हा दोरा बांधावा. कोणताही काळा दोरा उचलून तुम्ही पायाला बांधू शकत नाही. मंदिरातील पुजाऱ्याकडून घेतलेला अभिमंत्रित काळा धागाच तुम्ही पायावर बांधायचा आहे.

तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही काळा धागा बांधत असता त्यावेळेस तुम्ही गायत्री मंत्राचा जप करायला हवा. मुलींनी काळा दोरा पायाला बांधताना 7 गाठी माराव्यात आणि प्रत्येक गाठ बांधताना ॐ शनये नमः हा मंत्र करावा. तर हा काळा धागा जेव्हा बदलायचा असेल तेव्हादेखील शनिवारच्या दिवशीच हा बदलावा. आपल्या पायातील पहिला काळा धागा हा वाहत्या पाण्यात सोडावा. एका वर्षात तुम्ही एक वेळ आपल्या पायातील काळा दोरा बदलू शकता.

तर मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार, महिलांनी आणि मुलींनी आपल्या डाव्या पायात काळा धागा बांधावा. महिलांचे डावे अंग हे शास्त्रामध्ये अशुभ मानण्यात येते. त्यामुळे मुलींनी नेहमी डाव्या पायावर काळा धागा बांधावा असे सांगण्यात येते.

अशा प्रकारे तुम्ही जर काळा धागा बांधणार असाल तर या दिवशी अवश्य बांधायचा आहे. मुलींनी आपल्या डाव्या पायावरच काळा धागा बांधावयाचे आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *