12 नोव्हेंबर लक्ष्मीपूजनात ‘या’ एका वस्तूचे पूजन अवश्य करा सुख समृद्धी नांदेल घरात बरकत होईल!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो दिवाळी हा हिंदू धर्मातील खूपच मोठा सण आहे आणि हा सण अगदी सर्वजण आनंदाने उत्साहाने साजरे करीत असतात. प्रत्येक जण आपापसातील मतभेद विसरून आनंदाने हा सण साजरी करतात. तसेच अनेक गोडधोड पदार्थ देखील आपल्या घरामध्ये दिवाळीच्या सणांमध्ये केली जातात. प्रत्येक जण हा दिवाळीची खूपच आतुरतेने वाट पाहत असतात. तर दिवाळीच्या या दिवसांमध्ये लक्ष्मीपूजनाचा दिवस देखील खूपच महत्त्वाचा असतो.

लक्ष्मीपूजनामुळे आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास राहतो आणि घरामध्ये सुख-समृद्धी नादते घरामध्ये बरकत येते. तर मित्रांनो लक्ष्मीपूजनामध्ये आपण अनेक वस्तूंचा वापर करीत असतो. तर तुम्ही येणाऱ्या लक्ष्मीपूजना दिवशी म्हणजेच बारा नोव्हेंबर रविवारच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही एक वस्तू आपल्या लक्ष्मीपूजनात अवश्य ठेवायला हवी. म्हणजेच या वस्तूचे पूजन करायला विसरू नका. या वस्तूचे जर तुम्ही पूजन केले तर तुमच्या घरामध्ये बरकत राहील लक्ष्मी सदैव तुमच्या घरामध्ये वास करील.

तुम्ही जर मनापासून आणि श्रद्धेने या वस्तूची पूजा केल्या तर यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होईल ज्या काही आपल्या अडचणी असतील समस्या असतील त्या नक्कीच दूर होणार आहेत तर मित्रांनो तुम्ही लक्ष्मीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरामध्ये लक्ष्मीपूजन करतात.
लक्ष्मीपूजन करत असताना जे आपण आपल्या घरामध्ये असणारे पैसे, धन आणि लक्ष्मी मातेची मूर्ती यांचे पूजन करत असतो. त्यावेळी आपल्याला आणखीन एका वस्तूची पूजन करायचे आहे.

मित्रांनो जर आपण या सर्व वस्तूंबरोबरच या वस्तूचे पूजन केले त्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर नक्की प्रसन्न होईल. तर मित्रांनो ही वस्तू म्हणजे मोरपंख. मित्रांनो मोरपंख आपल्यातील बऱ्याच जणांच्या घरामध्ये असतो आणि नसेल तर तुम्ही या दिवशी दुकानातून किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून मोरपंख विकत घेऊन आणायचा आहे आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळी लक्ष्मीपूजन करत असताना त्याची सुद्धा पूजन आपल्याला करायचे आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण लक्ष्मीपूजनाच्या वेळी मोरपीस सुद्धा आपल्याला आपल्या देवघरांमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही लक्ष्मी मातेचे पूजन करणार आहात त्या ठिकाणी बाजूला ठेवायचे आहे आणि या मोर पंखाला आपल्याला हळद कुंकू वाहून थोड्याशा अक्षदा सुद्धा व्हायचे आहेत आणि त्यानंतर जो नैवेद्य असेल तो आपल्याला याला दाखवायचा आहे.

तर तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्रभर तो मोरपीस त्या पूजे शेजारीच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण ज्या वेळेस पूजा काढणार आहोत त्यावेळी मोरपंख हे आपल्या घराच्या तिजोरीमध्ये किंवा व्यवसायाच्या गल्ल्यांमध्ये पैसे दागिने ठेवता त्या ठिकाणी तुम्ही ठेवायचे आहे. यामुळे मित्रांनो जी काही आपली अडचण असेल, पैशासंबंधीत अडचण असतील, अपूर्ण कामे राहिलेली असती ती लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होते. तसेच माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *