14 जून 2023 योगिनी एकादशीला धनप्राप्तीसाठी करा हे पाच उपाय

अध्यात्म माहिती

मित्रांनो आपण धनप्राप्तीसाठी वेगवेगळे प्रकारची मेहनत घेत असतो पण आपल्याकडे पैसा टिकत नसेल आपण खूप कष्ट करून देखील आपल्याला हवा तसा पैसा मिळत नसेल किंवा आपल्या हातामध्ये जर बरकत नसेल म्हणजेच की आपल्याजवळ जर पैसा टिकत नसेल तर आपण वेगवेगळे उपाय देखील करत असतो.

तर त्याचबरोबर मित्रांनो आज आपण 14 जून 2023 ला योगिनी एकादशी आलेली आहे त्या एकादशी दिवशी असे काही पाच उपाय करायचे आहेत त्या उपायाने तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे तर ते कोणते उपाय आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो योगिनी एकादशीला श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा केली जाते तर ती एकादस 14 जूनला आहे उपवास देखील करतात व उपवास करून मोक्ष देखील मिळावा अशी प्रार्थना देखील देवाकडे करत असतात. योगिनी एकादशीच्या व्रतामुळे पुण्य प्रभावामुळे पाप नाहीस होतं.

संसारिक जीवनामध्ये व्यक्तीच्या अनेक अडचणी देखील निर्माण होतात तर त्या अडचणी दूर करण्यासाठी देखील काही जण हे व्रत करत असतात आणि त्याचबरोबर योगिनी एकादशी दिवशी तुम्ही काहीतरी खास उपाय देखील करू शकता त्या उपायाने तुमचे सर्व अडचणी नाहीशी होऊन जाणार आहे.

मित्रांनो योगिनी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंना खीर अर्पण करायचे आहे म्हणजेच की त्या दिवशी खिरीचा नैवेद्य विष्णूंना दाखवायचा आहे त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत आणि ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण देखील करतात लक्षात ठेवा एकादशी दिवशी तुळशीची पाने तोडायची नाहीत आदल्या दिवशी तुम्हाला तुळशीचे पाने तोडून एका वाटीमध्ये ठेवायचे आहेत.

पंचामृत देखील भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे एकादशी दिवशी भगवान विष्णूंना पंचामृताने अभिषेक घालायचा आहे प्रसाद म्हणून देखील पंचामृत द्या त्यामुळे तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद मिळणार आहे योगिनी एकादशीला हे केल्यामुळे धनधान्यामध्ये वाढ होणार आहे. आणि मनोकामना देखील पूर्ण होतात.

योगीनी एकादशीच्या दिवशी पूजा करताना शंखाची देखील पूजा करायची आहे पूजेनंतर हरभरा डाळ केळी गुळ पिवळे कपडे या वस्तू दान करायचे आहेत. भगवान श्रीहरी विष्णूंच्या आशीर्वादाने घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे. एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायच आहे आणि त्या ठिकाणी एक दिवा देखील लावायचा आहे.

भगवान विष्णू हे पिंपळाच्या झाडांमध्ये वास करतात. आणि त्याचबरोबर जर भगवान विष्णूंची पूजा करायची असेल तर पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करायला पाहिजे. योगिनी एकादशीला पिंपळाच्या झाडाची सेवा केल्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद मिळतो आणि आर्थिक समस्या देखील दूर होतात.

एकादशी दिवशी संध्याकाळी तुळशीची पूजा ही न चुकता करायची आहे तुळशी जवळ तुपाचा दिवा देखील लावायचा आहे. तुळशीला पाच किंवा अकरा प्रदक्षिणा देखील घालायचे आहेत तुमची संपत्ती वाढणार आहे. आणि त्याचबरोबर जीवनामध्ये आनंद देखील येणार आहे.

इतरांना फसवायचे देखील नाही व इतरांशी खोटं तर कधीच बोलायचं नाही स्वार्थासाठी इतरांशी नातं कधीही तयार करायचं नाही तर मित्रांनो तुम्हाला हे सर्व उपाय जर करायला जमत नसेल तर त्यापैकी कोणताही एक उपाय केला तरी देखील तुम्ही चालू शकता.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *