17 जूनला शनी होणार वक्री; या राशीतील लोकांच्या अडचणी वाढणार!

अध्यात्म राशिभविष्य

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार कोणताही ग्रह एका काळापर्यंत कोणत्याही राशीमध्ये राहत नाही आणि ते एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये ते बदलत देखील असतात तर कधी ते वक्री होतात तर कधी मार्गी होतात कधी अस्तंगत होतात तर कधी उदय होतात या ग्रहांच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत.

या सर्व ग्रहांचा परिणाम सर्व राशींवर होतो पण जून महिन्यामध्ये फक्त या ग्रहाचा पाच राशीवर मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होणार आहे व त्यांना आर्थिक अडचणी देखील वाटणार आहे तर मित्रांनो त्या पाच राशी कोणत्या आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो 17 जूनला शनि महाराज वक्री होणार आहेत. तर याचा परिणाम बाराही राशींना होणार आहे त्याचबरोबर पाच अशा महत्त्वाच्या राशी आहेत त्यांच्यावर त्यांचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये दिसायला मिळणार आहे. आणि त्यांना सावधानतेचा इशारा देखील दिला जात आहे कारण त्यांच्या समस्या वाढण्याची शक्यता दिसून येते शनिमहाराजांचे वक्री होण त्यांच्यासाठी अत्यंत नुकसानकारक ठरणार आहे.

मित्रांनो शनि महाराज सध्या कुंभ राशीमध्ये प्रवेश केले आहे आणि 17 जूनला ते कुंभ राशी मध्येच वक्री देखील होणार आहेत. तर ते चार नोव्हेंबर पर्यंत कुंभ राशीमध्येच राहणार आहेत त्यानंतर ते मार्गी होण्याची शक्यता आहे. आणि ते त्यांच्या कर्मानुसार फळ देखील देणार आहे तर शनि महाराज काही राशींसाठी अत्यंत नुकसानकारक ठरणार आहे अडचणी वाढवणारे देखील आहे.

पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास:- मेष राशींच्या व्यक्तींना शनिमहाराजांचे वक्री होणं समिश्र ठरणार आहे म्हणजेच की जास्त अडचणी देखील नाही आणि जास्त चांगलं देखील नाही. नोकरीमध्ये तुम्हाला जास्त मेहनत घेण्याची शक्यता आहे अचानक तुम्हाला आरोग्याच्या समस्या देखील जाणवणार आहे कामाचा भार तुम्हाला जास्त असल्यामुळे मानसिक तान देखील तुमचा वाढणार आहे. व्यवसायिकांसाठी हा काळ थोडा फार अनुकूल राहणार आहे धनलाभ वाढण्याची शक्यता या काळामध्ये दिसून येते जे विद्यार्थी आहेत त्यांना अधिक मेहनत करावी लागणार आहे.

दुसरी रास आहे ती म्हणजे कर्क रास:- कर्क राशींच्या व्यक्तींना देखील शनी महाराजांचा वक्री होणं संमिश्रच ठरणार आहे मोठी गुंतवणूक जर तुम्ही करत असाल तर ते करणे तुम्हाला टाळायच आहे. कारण हा तुमच्यासाठी अनुकूल काळ राहणार नाही नवीन काम सुरू करण्याचं जर तुमची इच्छा असेल तर ते काम तुम्ही आता सुरू करू नका तुमचे जे काही काम आहे ते तुम्ही पूर्ण करा पूर्ण झाल्यानंतर मग जे नवीन काम करणार आहात ते करायचा विचार तुम्ही करु शकता.आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका तुम्ही वाहन चालवत असाल तर ते काळजीपूर्वक चालवायच आहे कार्यक्षेत्रांमध्ये कठोर परिश्रम करावे लागणार आहेत वेळेनुसार सर्व काही ठीक देखील होणार आहे.

तिसरी रास आहे ती म्हणजे तुळ रास:- तूळ राशींच्या व्यक्तींना देखील हा काळ संमिश्र राहणार आहे ज्या व्यक्ती प्रेमामध्ये आहे त्या व्यक्तींचे गैरसमज वाढणार आहेत आर्थिक बाबतीत हा काळ आव्हानात्मक ठरणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये थोडीफार अडचण येऊ शकते जर तुम्हाला शक्य असेल तर शनिवारी रुद्राभिषेक जरूर करा तसे केल्याने तुम्हाला निश्चितच त्याचा लाभ मिळणार आहे.

चौथी रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास:- वृश्चिक राशींच्या लोकांना देखील हा काळ संमिश्रच राहणार आहे पण याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुटुंबातील व्यक्तींकडे लक्ष द्यायचे आहे त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे त्यांची धावपळ देखील खूप वाढणार आहे मालमत्तेवरून वाद देखील होण्याची शक्यता आहे मात्र कामाच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल राहणार आहे तुम्ही आज पर्यंत जे काही प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नांना तुम्हाला यश देखील मिळणार आहे जर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करणारा असाल किंवा वाहन खरेदी करणारा असाल तरी हा काळ तुमच्यासाठी योग्य नाही जर तुम्हाला शक्य असल्यास दर शनिवारी तुम्हाला बजरंग बलीची पूजा करायची आहे.

पाचवी रास आहे ती म्हणजे कुंभ रास:-  कुंभ राशींच्या व्यक्तींना देखील हा काळ संमिश्र राहणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शनि महाराज या राशींमध्येच वक्री झाले आहेत आर्थिक आघाडीवर तुम्हाला सावधगिरी बाळगूनच व्यवहार करायचा आहे तुम्ही या काळामध्ये मोठे मोठे व्यवहार करणे जास्त करून टाळायचे आहेत.अपेक्षेप्रमाणे यश मिळेल असे काही होणार नाही जोडीदारासोबत मतभेद देखील होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर नोकरी आणि व्यवसायामध्ये लाभ होण्याची शक्यता आहे यश आणि प्रगतीची संधी तुम्हाला मिळणार आहे नवीन कामांमध्ये तुम्हाला जोडीदाराचं सहकार्य लाभणार आहे तुम्हाला कोणती गोष्ट करायची झाली तर त्यासाठी थोडा तुम्हाला धीर धरावाच लागणार आहे.

अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *