19 वर्षांनी श्रावणा दुर्मिळ योग.

अध्यात्म माहिती

मित्रांनो प्रत्येक वर्षी हे श्रावण सोमवार येतच असतात पण यावर्षी असे काही दुर्मिळ योग घडून आले आहेत त्याच्यामुळे श्रावण सोमवार हे चार किंवा पाचच्या ऐवजी आठ श्रावण सोमवार यावर्षी आलेले आहेत तुम्हाला हे माहीतच असेल की अधिक महिना असल्यामुळे जास्त सोमवार यावर्षी आलेले आहेत.तर हा श्रावण महिना जो आहे.

तो एकूण दोन महिन्याचा असणार आहे तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की दोन महिन्याचा श्रावण सोमवार तर आजपर्यंत कधी आलेला नाही व दोन महिने श्रावण सोमवार करायचा का नक्की काय करायचं चला तर मग आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे यावर्षीचा चातुर्मास हा अत्यंत विशेष मानला गेलेला आहे.

कारण यावर्षीच्या चातुर्मासाला एक महिना अधिक आलेला आहे साधारणतः चार महिन्यांचा चातुर्मास असतो पण यावर्षी पाच महिन्यांचा चातुर्मास आलेला आहे मराठी पंचांगानुसार दर तीन वर्षांनी एक महिना अधिक धरला जातो आणि तेव्हा ते वर्ष तेरा महिन्यांचे होऊन जाते असेही यावर्षी देखील घडल आहे.

यावर्षी आपल्याला तेरा महिने बघायला मिळणार आहेत अधिक मासाला पुरुषोत्तम मास किंवा मला मास असे देखील म्हटले जाते आपल्या भाषेमध्ये धोंड्याचा महिना असे देखील म्हटले जाते आताही अधिक मास येण्याची पद्धत ही पूर्णपणे खगोल शास्त्री आहे असं म्हटलं जातं. 19 वर्षांनी श्रावण महिन्यामध्ये असा हा दुर्मिळ योग आलेला आहे.

चातुर्मास सुरू झाल्यानंतर सर्वात अगोदर श्रावण सोमवार चालू होतात आणि श्रावण महिना पूर्णपणे महादेवांना समर्पित केला जातो. भगवान शंकरांच्या पूजेसाठी श्रावण महिना हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि महत्त्वाचं म्हणजे यावर्षीचा श्रावण महिना हा खूप खास आहे दरवर्षी श्रावण महिना हा चार ते पाच सोमवारांचा असतो.

पण यावर्षी आठ सोमवार आलेले आहेत यावर्षी महादेवाचे नामस्मरण करणे पूजा करणे हे जास्त काळासाठी होणार आहे याच्यामुळे महादेव प्रसन्न होणार आहेत व त्यांची श्रद्धा आपल्यावर कायम राहणार आहे. आधिक महिन्याची सुरुवात ही 18 जुलै 2023 पासून होणार आहे 16 ऑगस्ट 2023 ला अधिक महिना संपणार आहे.

आणि त्याच्यानंतर नीज म्हणजे नियमित श्रावण महिना चालू होणार आहे. 17 ऑगस्ट पासून नियमितपणे श्रावण महिना चालू होणार आहे आणि तो 15 सप्टेंबर पर्यंत असणार आहे.निज अधिक महिना आल्यामुळे श्रावण महिना हा 59 दिवसांचा असणार आहे असं सांगितलं जातं.

वास्तविक मध्ये अधिक मास असणाऱ्या श्रावण महिन्याच्या पहिल्या महिन्यामध्ये श्रावणाच्या संबंधांमध्ये  जे काही शुभ कार्य असतात ते होणार नाहीत श्रावण महिन्याच्या दुसऱ्या महिन्यामध्ये जी काही तुमचे शुभ कार्य आहेत ते होणार आहेत. मात्र शिवशंकराची आराधना उपासना प्रार्थना अधिक श्रावण महिन्यात देखील गेलो जाऊ शकतो.

श्रावण महिना जरी दोन महिन्यांचा आला असला तरी पहिला महिना अधिक असणार आहे. पहिल्या महिन्यामध्ये जे श्रावणी सोमवार येतात ते त्याचे व्रत करण्याची गरज नाही जे श्रावणीचे उपवास करायचे आहेत. तर जो दुसरा महिना मध्ये निज श्रावण येतो त्याच्यामध्ये श्रावण सोमवारचे उपवास करायचे आहेत नेहमीचा जो श्रावण महिना येतो त्याच्यामध्ये श्रावणीची सोमवार करायचे आहेत त्याच्या तारखा काहीशा अशा आहेत निज श्रावणी सोमवारी मधला पहिला श्रावण सोमवार आहे .

तो म्हणजे 21 ऑगस्टला पहिला असणार आहे दुसरा श्रावणी सोमवार आहे तो म्हणजे 28 ऑगस्टला तिसरा श्रावणी सोमवार आहे तो म्हणजे चार सप्टेंबरला आणि चौथा श्रावणी सोमवार आहे तो म्हणजे 11 सप्टेंबरला या चार सोमवारी तुम्हाला श्रावन सोमवारचे व्रत करायचे आहे तुम्हाला त्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे व श्रावण सोमवार मध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला त्यांची पूजा करायची आहे व बेलपत्र अर्पण करायचे आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *