२०२३ च्या रामनवमीला अत्यंत शुभ योग; ‘या’ राशींना होणार धनलाभ?

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी आनंदाने आपण साजरे करत असतो. या सणाच्या वेळी प्रत्येक घरामध्ये आनंदाचे वातावरण हे असते आणि गोड पदार्थांचा नैवेद्य देखील केला जातो. म्हणजेच आपल्या घरामध्ये प्रसन्नतेचे वातावरण असते. तसेच आपल्या कुंडलीतील गृह नक्षत्रांची स्थिती बदलल्यामुळे देखील आपल्या आयुष्यामध्ये अनेक आपल्याला चढउतार पाहायला मिळतात.

तर 2023 या वर्षीची रामनवमी ही 30 मार्चला साजरी होणार आहे आणि या राम नवमीला अत्यंत शुभ योग काही राशींना होणार आहे. म्हणजेच या राशीतील लोकांना अनेक धनलाभाच्या गोष्टी घडणार आहेत. तर या भाग्यशाली राशी नेमक्या कोणत्या आहेत ज्यांच्या जीवनामध्ये धनलाभाचा योग संभवतो चला तर मग जाणून घेऊयात.

हिंदू पंचांग नुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला प्रभू श्रीरामाचा जन्म झाल्याचे मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार श्रीरामाचा जन्म त्रेतायुगात झाला तेव्हा चैत्र शुक्ल नवमीला पुनर्वसु नक्षत्रात कर्क राशीचा उदय झाला आणि मंगळ, शुक्र, सूर्य, शनि आणि गुरु हे पाच ग्रह उच्च स्थानात होते आले. यंदा शेकडो वर्षांनी रामनवमीच्या निमित्ताने अनेक शुभ योग सुद्धा जुळून आले आहेत. येत्या रामनवमीला काही राशींच्या भाग्योदयाचे संकेत आहेत. या राशींना नेमका कसा लाभ होणार हे ही जाणून घेउया.

ज्योतिषशास्त्रानुसार राम नवमीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी व अमृत सिद्ध योग जुळून आला आहे. यंदा पहिल्यांदाचा या दोन्ही योगांची तिथी गुरु पुष्य योग काळात जुळून येणार आहे. ३० मार्चला सकाळी ६ वाजून ६ मिनिटांनी या दोन्ही योगांची तिथी सुरु होईल तर रात्री १० वाजून ५९ मिनिटांपर्यंत शुभ काळ कायम असणार आहेत.

सिंह राशी
चैत्र नवरात्रीपासून ते राम नवमी पर्यंत सिंह राशीच्या कुंडलीत केवळ आनंदच आनंद लिहिलेला दिसत आहे. श्री रामाच्या कृपेने सिंह राशीच्या भाग्यामध्ये अनेक शुभ योग घडणार आहेत. या राशीतील लोकांना ज्या काही कर्जाच्या अडचणी होत्या म्हणजेच यांना भरपूर कर्ज झालेले असेल आणि यांची सुटका होत नसेल तर येत्या रामनवमीच्या या शुभ योगाने यांची कर्जातून मुक्ती होणार आहे. तसेच यांचे आर्थिक मिळकतीचे अनेक स्त्रोत सुद्धा यांना उघडू शकतात. यांना व्यवसायातून प्रचंड धनलाभाची प्राप्ती देखील होणार आहे.

वृषभ राशी
वृषभ राशीच्या मंडळींसाठी चैत्र रामनवमीचा दिवस अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. जर तुम्ही एखाद्या नव्या कामाची सुरुवात करणार असाल तर तुम्ही या काळामध्ये करायची आहे. जेणेकरून हा काळ तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. जर तुम्ही एखादी गुंतवणूक देखील करणार असाल तर या काळामध्ये नक्कीच करा. प्रत्येक पाऊल टाकताना तुम्ही अगदी सावधपणे टाकायचे आहे. यांना वडीलधाऱ्या लोकांनी केलेल्या गुंतवणुकीतून प्रचंड धनलाभ देखील होऊ शकतो. सर्व कोर्टाचे प्रश्न मार्गी लागणार आहेत.

तूळ राशी
तूळ राशीच्या मंडळींसाठी यंदाची रामनवमी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकते. या रामनवमीला तुम्ही कुटुंबाबरोबर मोलाचे काही खास क्षण अनुभवणार आहात. तसेच अविवाहित व लग्नासाठी उत्सुक असणाऱ्या मंडळींचे विवाह योग जुळून येतील. त्यांना मनपसंत स्थळे मिळू शकतात. तसेच समाजातील प्रतिष्ठेमध्ये देखील भर पडेल. आर्थिक फायद्यासाठी अत्यंत मोठी संधी प्राप्त होईल. पण या काळामध्ये तुम्ही निर्णय घेताना अगदी काटेकोरपणे घेणे गरजेचे आहे.

अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *