26 डिसेंबर दत्त जयंती पर्यंत दररोज 21 वेळा बोला हा स्वामी मंत्र! अडचणी, समस्या होतील दूर !

अध्यात्मिक

मित्रांनो आपण प्रत्येक जणच कोणत्या कोणत्या देवी देवतांचे भक्त हे असतोच आणि आपण अगदी मनोभावे श्रद्धेने ज्या ज्या देवी देवतांची विधिवतपणे पूजा देखील करीत असतो. तर मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा हा श्री दत्तात्रयांचा अवतार म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. आपल्यापैकी बरेच जण हे दत्तात्रयांचे भक्त आहेत आणि ते अगदी मनोभावे श्रद्धेने उपवास करीत असतात. तसेच आपल्या जीवनातून अडचणी दूर व्हाव्यात यासाठी प्रार्थना देखील करीत असतात. स्वामी समर्थ यांचे दत्तात्रय हे एक अवतार आहेत.

तर यावर्षी श्री दत्त जयंती 26 डिसेंबर म्हणजेच मंगळवारच्या दिवशी साजरी करण्यात येणार आहे. म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती असते आणि या दिवशी विधिवतपणे भगवान दत्तात्रेयांची पूजा उपवास केले जातात. जेणेकरून आपल्या मनातील इच्छा या पूर्ण होतात तसेच आपल्या सर्व संकटातून आपली मुक्ती होते.

भगवान श्री दत्तात्रेयांचे तीन चेहरे आणि सहा हात आहेत आणि एका बाजूला एक गाय आणि दुसरीकडे एक कुत्रा दिसतो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रेयांचे व्रत ठेवून त्याची उपासना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. आपल्यातील बरेच जण म्हणजेच दत्त सेवेकरी अगदी दत्त जयंतीची आतुरतेने वाट पाहत असतात.

हा दिवस सर्व सेवेकऱ्यासाठी खूपच विशेष मानला जातो. मित्रांनो गुरुपौर्णिमा, स्वामींची पुण्यतिथी आणि त्याचबरोबर दत्त जयंती हे काही विशेष दिवस आहे. या दिवसाची आपल्यातील अनेक जण खूप आतुरतेने वाट पाहत असतात कारण मित्रांनो हा दिवस स्वामींचा दिवस असतो गुरु दत्ताचा दिवस असतो.

आपण स्वामी समर्थांची तसेच गुरुदत्त यांची विशेष सेवा पूजा तसेच मंत्र जप करीत असतो. कारण स्वामींचा आशीर्वाद तसेच दत्तगुरूंचा आशीर्वाद आपणाला प्राप्त व्हावा. तसेच जीवनामध्ये आपल्या सुख उपभोक्ता यावे. तर आज मी तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे हा मंत्र जप तुम्हाला दत्त जयंती येईपर्यंत दररोज न चुकता आपल्या घरामध्ये बोलायचा आहे.

स्वामींचा गुरुदत्तांचा हा खूपच प्रभावशाली असा मंत्र आहे आणि हा मंत्र तुम्ही दररोज 21 वेळा बोलायचं आहे. म्हणजेच 26 डिसेंबर दत्त जयंती येईपर्यंत दररोज तुम्हाला अगदी मनोभावे, श्रद्धेने हा मंत्र जप बोलायचा आहे. मित्रांनो 26 डिसेंबर मंगळवारच्या दिवशी दत्त जयंती आहे आणि दत्त जयंती येईपर्यंत तुम्ही उद्यापासून आजपासून किंवा परवापासून हा दत्तगुरूंचा मंत्र जप अवश्य बोलायचा आहे.

सकाळी बोला किंवा संध्याकाळी बोला तुम्हाला ज्या वेळेस दिवसभरात शक्य होईल त्यावेळेस तुम्ही 21 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. घरातील कोणतीही व्यक्ती या मंत्राचा जप करू शकतात. तुम्ही सकाळची देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवा लावत असताना जरी हा मंत्र जप 21 वेळा बोलला तरी देखील चालेल. तर मित्रांनो आपण जी काही स्वामींची सेवा करतो किंवा घरामध्ये जी काही देवपूजा करतो ती झाल्यावर आपल्याला फक्त 21 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. तर हा प्रभावशाली मंत्र नेमका कोणता आहे ते आता आपण जाणून घेऊयात.

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ नमः
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ नमः

तर हा प्रभावशाली मंत्र जप तुम्ही दत्त जयंती येईपर्यंत दररोज न चुकता 21 वेळा बोलायचं आहे. तुम्ही कोणत्याही दिवसांपासून या मंत्राचा जप करायला सुरुवात करू शकता. परंतु 26 डिसेंबर मंगळवारच्या दिवशी दत्त जयंती येईपर्यंत तुम्हाला हा मंत्र जप आपल्या घरामध्ये 21 वेळा अवश्य बोलायचा आहे. यामुळे गुरुदत्तांचा श्री स्वामी समर्थांचा कृपाशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. तुमच्या घरामध्ये सुख-समृद्धी नांदेल आणि ज्या काही तुमच्या मनामध्ये अपूर्ण राहिलेल्या इच्छा असतील त्या देखील नक्कीच पूर्ण होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *