आपल्या जवळची माणसं आपल्याशी वाईट वागतात तेव्हा? एक गोष्ट नक्की करून पहा

राशिभविष्य अध्यात्मिक

मित्रांनो, आपल्या आसपास भरपूर लोक असतात. त्या सर्वांचा वेगवेगळा स्वभाव असतो. कोणाचा शांत तर कोणाचा चिडखोर. आपल्या कुटुंबातील तसेच नातेवाईकांचा देखील स्वभाव हा वेगवेगळा असतो. मित्रांनो आपण प्रत्येकजण कोणा ना कोणावरही विश्वास ठेवत असतो. तो विश्वास आपला अतूट असतो. म्हणजेच आपण डोळे झाकून त्यांच्यवर विश्र्वास ठेवत असतो. कारण त्या व्यक्ती आपल्या खूपच जवळची असते.

ती व्यक्ती कधीच आपला विश्वास तोडणार नाही असा विश्वास देखील असतो. पण मित्रांनो आपल्या जवळची माणसं आपल्याशी वाईट वागतात तेव्हा आपणाला खूपच वाईट वाटते. तर मित्रांनो तुम्हाला देखील तुमची जवळची व्यक्ती जर तुम्हाला त्रास देत असेल तर त्यासाठी तुम्हाला मी उपाय सांगणार आहे. त्यामुळे तुमचा त्रास थांबेल.

तर हा उपाय कोणता ते जाणून घेऊयात. तर मित्रांनो ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये भरपूर आनंद येतो त्यावेळेस तुम्ही समजून जा की या आनंदा नंतर तुम्हाला दुःख देखील येऊ शकते. म्हणजेच सुखदुःख हे पाठशिवन्याचा चा खेळ सुरू असतो. आणि तो खेळ आपण आपल्या जीवनामध्ये अनुभवत असतो.

जेवढा आनंद आपल्याला सुख उपभोकता येतो तेवढाच त्रास आपल्याला जीवनातील दुःख देखील सहन करण्यासाठी सहन करावा लागतो. आपण एखाद्या व्यक्तीवर खूपच विश्वास ठेवलेला असतो. त्या व्यक्तीवर आपला लळा लागलेला असतो. परंतु मित्रांनो तोच व्यक्ती जर आपला घात करतो तेव्हा आपल्याला खूपच वाईट वाटते. हे सत्य आपणाला खरे देखील वाटत नाही.

मित्रांनो, धनुर्धर अर्जुनालाही रणांगणावर याच गोष्टीचा त्रास झाला होता. युद्ध तर करायचं पण कोणाशी ?आपल्याच भावंडांशी,गुरुजनांशी, नातलगांशी. ज्यांना आपण इतके दिवस आपले मानत होतो का? अशा गोंधळलेल्या स्थितीत भगवान श्रीकृष्णांनी त्याची समजूत काढत म्हटलं. अर्जुना हे जग असंच आहे.

त्यावेळेस श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले होते की, ज्यांना तू आपलं मानतोस तेच जर तुला आपले मानत असते तर ते हातात तलवार, गदा आणि धनुष्य घेऊन तुझ्यावर चाल करून आले नसते. कारण ते तुला आपले समजत नाहीत. मग तू त्यांच्याबद्दल लोभ,मोह,शोक अशा सगळ्या भावना आवर आणि केवळ कर्तव्य म्हणून धर्म रक्षणार्थ युद्ध कर.

अर्जुना सोबत तर स्वतः भगवंत होते. परंतु मित्रांनो आपलं कसं होणार. कारण आपली समजूत काढायला देव तरी येऊ शकत नाहीत. आपल्या जवळच्या व्यक्तीने जर आपला विश्वासघात केला तर त्यावेळेस आपणाला देखील खूपच दुःख होते. म्हणजेच आपली स्थिती ही अर्जुनासारखीच होते. मित्रांनो अशा वेळेस भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेला सल्ला हाच आपल्या कामी येणार आहे हे मात्र नक्की.

माझे माझे आणि झाले ओझे अशी गत होण्याआधी स्वतःला आवरा,सावरा. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि परिस्थितीशी दोन हात करा.मित्रांनो तुम्ही आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या लहान मोठ्या घटनांकडे पाहण्याचा प्रयत्न करा. बरेच लोक असे म्हणतात की मुलगा आणि सून माझ्याशी बोलत नाही. परंतु मित्रांनो ही सुद्धा तुमची काहीतरी परतफेड असणार आहे. परत फेडीचाचा हिशोब या जन्मात संपवल्याशिवाय कोणालाच मरण नाही.

कोणतीही व्यक्ती असो ती तुमच्याशी विचित्र वागली, तिने तुमचा अपमान केला, तुमच्याकडे दुर्लक्ष केलं,तुमच्या उपकाराचं कोणाला विस्मरण झालं,तर एक एक अकाउंट पूर्ण झालं अस आजपासून स्वतःला सांगायला लागा. परतफेडीचा एकही क्षण टाळू नका. पहिल्यांदा तुम्हाला जड जाईल. पण आपलं मन जेवढे बलदंड असतं तेवढंच लवचिकही असतं.

मनाला आपण सांगायचं की, आयुष्यभर तुझ ऐकलं, तुझ्या हुकुमात राहिलो आता ही गुलामी मी सोडून देत आहे. आज पासून मुक्त केल आहे स्वतःला. तर मित्रांनो हा उपाय करून बघा. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने ओळख दाखवली नाही तर तुमच्या पासबुकात त्यांची एकच एन्ट्री होती असं समजा. मग कोणी कितीही त्रास दिला तरी त्याचा त्रास तुम्हाला होणारच नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे.अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *