अधिक महिन्यात वान देताना ‘ही’ एक वस्तू अवश्य दान करा!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो अधिक श्रावण महिना हा चालू झालेला आहे. तीन वर्षानंतर अधिक महिना येत असतो. तर यावर्षी 18 जुलैपासून अधिक श्रावण चालू झालेला आहे. तो 16 ऑगस्ट पर्यंत असणार आहे. अधिक श्रावण महिन्याला हिंदू धर्मामध्ये अननसाधारण असे महत्त्व आहे. तर अधिक श्रावणामध्ये अनेक पूजा विधी व्रत उपवास हे करीतच असतात.

तसेच अधिक महिन्यांमध्ये जावयाला वान देण्याचे खूपच महत्त्व आहे.ही पूर्वीपासूनच प्रथा चालत आलेली आहे म्हणजेच जावयाला घरी बोलावून त्यांना कपडे घेऊन गोडधोड पदार्थ तयार करून तसेच अनेक प्रकारचे वाण देखील दिले जाते. त्याचप्रमाणे 33 अनारसे देखील जावयाला दिले जातात. तसेच अनेक जण हे सोन्या चांदीचे दागिने देखील आपल्या जावयाला देत असतात.

तर अधिक महिन्यांमध्ये वाण देताना तुम्ही त्यासोबत ही एक वस्तू आवश्य दान करायची आहे. यामुळे आपल्याला शुभ फळ मिळते. तर जावयाला अधिक महिन्यांमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तसेच अनेक स्त्रिया या अधिक महिन्यांमध्ये नवीन जोडवी देखील करीत असतात.

तर तुम्ही जर आपल्या घरामध्ये जावयाला बोलावून वाण देणार असाल तर त्यावेळेस तुम्ही कोणत्याही प्रकारचे वाण देत असताना त्यासोबत ही वस्तू अवश्य द्यायची आहे. तर ती वस्तू कोणती तर मित्रांनो तुम्ही चांदीचा किंवा तांब्याचा एक दिवा अवश्य जावयाला दान करायचा आहे. मग हा दिवा छोटा असो किंवा मोठा असो परंतु तुम्ही एक दिवा अवश्य आपल्या जावयाला द्यायचा आहे.

कारण अधिक श्रावण महिन्यामध्ये दीपदानाला खूपच महत्त्व आहे आणि तुम्ही एक दिवा खरेदी करून जावयाला अवश्य द्यायचा आहे.यामुळे आपल्या मुलीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल. तसेच आपले जीवन देखील सुखाचे होते. त्यामुळे तुम्ही देखील आपल्या जावयाला वाण देणार असाल तर त्यामध्ये चांदीचा किंवा तांब्याचा एक छोटासा दिवा अवश्य द्यायचा आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *