अधिक मास म्हणजे काय? महत्त्व व मान्यता?

अध्यात्मिक माहिती

2023 मध्ये अधिक महिना आलेला आहे, ज्याला आपण धोंड्याचा महिना म्हणतो. पण हा कधी सुरू होतोय? कधी याची समाप्ती आहे? काय आहेत या महिन्यात वैशिष्ट्य? जाणून घेऊ या.. मराठी पंचांगानुसार तर 3 वर्षांनी एक महिना अधिक मास धरला जातो. अधिक महिना येतो ते वर्षें 13 महिन्यांच असते.

तसेच अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मनमास, धोंड्याचा महिना असंही म्हणतात. अधिक मास येण्याची पद्धत पूर्णपणे खगोलशास्त्रीय आहे. यंदा म्हणजेच 2023 मध्ये श्रावण महिना अधिक असणार आहे आणि असा योग तब्बल 19 वर्षांनी जुळून आल्या तर सांगितलं जात.

तर अधिक महिना पूर्ण भारतात नसून सूर्य पंचांग पाळणाऱ्या आता आसाम, केरळ, तामिळनाडू, बंगाल या राज्यात अधिक महिना नसतो. तो परत चांद्र पंचांग वापरणाऱ्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश या सारख्या राज्यात असतो. कारण पृथ्वीवर होणारे ऋतुबदल हे।सुर्यामुळे होत असतात.

त्यामुळे सौर कालगणना महत्त्वाची ठरते पण त्याच बरोबर हेही खरे आहे की, सूर्याच्या स्थान बदलामुळे होणारे बदल लक्षात येत नाही. त्यामुळे दैनंदिन दिनचर्या ठरवत असताना बदल नोंदवता येत नाही. कालगणना करताना चंद्राचा आकार आणि जागेतल्या बदल सहज नोंद होते, त्यामुळे दैनंदिन व्यवहाराकरिता चंद्र उपयोगी ठरतो.

हे लक्षात घेऊन जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये दैनिक व्यवहारात करतात चांद्र आणि वार्षिक व्यवहारा करता सौर्य कॅलेंडर वापरले जातात, अशा प्रकारच्या कॅलेंडरला चांद्र सौर कॅलेंडर म्हणतात. 2023 मध्ये अधिक मास नक्की कोणता आहे? आणि कधी आहे? खरतर वर्ष 2023 अनेक अर्थाने अद्भुत मानले गेले.

यापूर्वी सन 2020 अधिक महिना आला होता आणि आता तर 2023 मध्ये मंगळवारी 18 जुलै 2013 पासून अधिक महिन्याला सुरुवात होणार आहे. यंदा श्रावण महिना अधिक मासाला सुरुवात होणार आहे. बुधवार ऑगस्ट 2023 रोजी हा अधिक महिना संपेल. साधारणपणे 32 महिना आणि 16 दिवसांनी अधिक मास येतो.

सर्वसाधारणपणे चैत्र महिन्यात हा अधिक मास येत असतो. तसेच कार्तिक आणि फाल्गुनमध्ये क्वचितच येतो. पण मार्गशीर्ष, पौष आणि माघ या महिन्यांमध्ये अधिक महिना कधीच येत नाही. अधिक महिन्यात वैशिष्ट्य म्हणजे अधिक महिन्यात भरपूर प्रमाणात दानधर्म केला जातो. खास करून अन्न दान करायला अधिक महिन्यामुळे सांगितले जातात.

अधिक महिन्यामध्ये तांबूल दान करणारा सुद्धा खूप महत्त्व आहे. यंदा श्रावण महिन्याच्या आधी अधिक मास आल्यामुळे यंदा चातुर्मास सुद्धा पाच महिन्यांच असणार आहे. चातुर्मासा चार महिन्यांचा असतो म्हणून त्याला चातुर्मास म्हणतात.
पण जेव्हा अधिक मास येतो तेव्हा मात्र चातुर्मास पाच महिन्यांचा असतो.

चातुर्मासाच्या सगळ्या नियमांचे पालन अधिक महिन्यामध्ये केले जातात. तसेच अधिक महिन्यामध्ये लेक-जावाईला बोलून धोंड्याचे जेवण देण्याचे प्रकार तुमच्या घरी आहे की नाही? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा…

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *