अधिक मासात शुक्रवारी “ह्या “वस्तू करा दान

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो गरजू व्यक्तीला मदत करणे हे खूप गरजेचे असते कारण गरजू व्यक्तीला मदत केल्यामुळे त्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो हिंदू धर्मशास्त्रानुसार शुक्रवारी च्या दिवशी माता लक्ष्मी व देवी सरस्वती देवीची मनोभावे पूजा केली जाते असे मानले जाते की लक्ष्मीची पूजा अर्चना केल्यामुळे जीवनामध्ये सुख समृद्धी येते.

आणि त्याचबरोबर शुक्रवारी दान केल्यामुळे याला विशेष महत्त्व दिले गेलेले आहे मात्र ते दान तुम्ही अधिक मासातील शुक्रवारी केला तर त्याचे तुम्हाला निश्चितच योग्य फळ मिळणार आहे व त्याचे फायदे देखील तुम्हाला होणार आहे अधिक मासा मध्ये शुक्रवारी दान केल्यामुळे काय फायदा होतात व कोणत्या वस्तू दान करायच्या चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

दान किंवा पुण्य केलं तर ते दुप्पट होतं असं देखील म्हटलं जातं आणि ते आपल्या संपूर्ण कुटुंबाला फायदेशीर असतं त्याच बरोबर अधिक मासांमध्ये जो व्यक्ती व्रत उपवास पूजा आधी करतो तो संपूर्ण कुटुंबासोबत श्रीकृष्ण यांच्या आशीर्वादास पात्र ठरतो असे म्हटले जाते.

असं म्हटलं जातं की अधिकमासांमध्ये व्रत उपवास पूजा दान करण्याचे अत्याधिक महत्त्व असत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिक मासांमध्ये शुक्रवारच्या दिवशी विशेष दान केल्यामुळे सुख आणि समृद्धी मिळते आणि त्याचं बरोबर शुक्र ग्रहाला बळ देखील मिळत.

ज्योतिष शास्त्रामध्ये असे सांगितले गेलेला आहे की ज्या मुलांच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह बळवण असेल तर त्यांची लग्न लवकर जुळतात याचबरोबर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. त्यासाठी अधिक मासामध्ये शुक्रवारच्या दिवशी काही वस्तूंचा दान नक्की करायचा आहे .

अधिक मासामध्ये शुक्रवारच्या दिवशी विवाहित महिलांनी लाल कपडे बांगड्या सिंदूर दान करायचे आहेत असे केल्याने महालक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतात असं म्हणतात आणि त्याचबरोबर आयुष्यामध्ये जी काही अडचणी असतील संकटे असतील ते संकटे देखील दूर होतात अधिक मासामध्ये शुक्रवारच्या दिवशी गरिब व्यक्तींना व गरजू व्यक्तींना पुस्तके दान करायचे आहेत

किंवा जोडे चपला दान करायचे आहेत आणि ते दान केल्यामुळे आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो व ते शुभ देखील मानले जाते.त्याच दिवशी मीठ देखील दान करायचे आहे शुक्र ग्रहाची संबंधित असलेले सर्व संकटे दूर होतात अधिक मासामध्ये शुक्रवारच्या दिवशी रेशमी कपडे जुने चादर इत्यादी वस्तूंचा दान केल्यामुळे घरामध्ये आनंदच वातावरण तयार होतं

आणि याचबरोबर वैवाहिक जीवनामध्ये गोडवा देखील निर्माण होतो अधिकमासामध्ये विधवा महिलांना पांढरे वस्त्र दान केल्यामुळे सौभाग्य प्राप्त होते असे देखील म्हटले जाते तर मित्रांनो अधिक मासामध्ये शुक्रवारी या सर्व वस्तू दान केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर बदल होणार आहेत

व तुमच आयुष्य बदलून जाणार आहे तुम्हाला या सर्व वस्तू जर दान करणे शक्य होत नसतील तर यापैकी तुम्ही कोणतीही एक वस्तू दान केला तरी देखील चालू शकत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *