अधिक श्रावण मासात कोणत्या देवांचा जप करावा??

अध्यात्मिक माहिती

यंदा 18 जुलै 2023 पासून सुरू होतोय. अधिक श्रावण मास त्यानिमित्ताने कोणता जप करायचा आणि कोणत्या देवाची उपासना करावी? अधिक श्रावण मासात भगवान श्री विष्णूंचा जप करायचा की महादेवाचा जप करायचा? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर ही माहिती नक्की पहा.

यंदा श्रावणाआधी अधिक मास येत आहे. 18 जुलै ते 16 ऑगस्ट हा कालावधी असणार आहे. हा महिना श्रावणा आधी आला म्हणून त्याला अधिक सावन म्हटलंच आहे. असा असला तरी श्रावणातील पूजा विधींचा अधिक श्रावणाचे संबंध नसतो. सालाबाद प्रमाणे येणारा श्रावण ज्याला नीज श्रावण म्हणतात 17 ऑगस्टपासून सुरू होईल,

त्यामुळे स्वाभाविकच आहे श्रावण मासातील महादेवाची पूजा ही अधिक श्रावणात करायची नसून तिने नीज श्रावणातच केली पाहिजे. तर अधिक मास हा भगवान विष्णूंना असल्यामुळे त्याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात. त्यामुळे या काळात भगवान श्रीविष्णूची उपासना केली जाते. भगवंताच्या नामस्मरणाचे जिभेला वळण लागावे म्हणून जप केला जातो.

भगवंताच्या नामाचा पुनरुच्चार आणि मन एकाग्र करायला लावने, हा त्यामागील विचार असतो. याचबरोबर, जप केल्यामुळे या आचर शुद्ध होतात आणि अधिक मासात मुख्यत्वे भगवान श्रीहरी महाविष्णूचे श्लोक, मंत्र आणि नाम यांचं पारायण केले जातात आणि एक जण रोज एक जपाची माळ ओढायची असा संकल्प करतात. तसेच अधिक मासात “ओम नमो भगवते वासुदेवाय” हा मंत्र 108 वेळा म्हणतात.

याशिवाय अनेक जण आपल्या उपास्य देवतेचे स्मरण करतात.
चांगल्या गोष्टी आपोआप घडत नाही, त्या चांगल्या लागतात. तशा चांगल्या सवयी आपोआप लागत नाही त्या लावाव्या लागतात. प्रापंचिक माणसाच्या मुखात नामस्मरण सहजासहजी येत नाही, ते जाणीवपूर्वक घ्यावे लागते. ती सवय लावण्याचे माध्यम म्हणजे जप.

जपाच्या माळेत 108 मनी असतात. त्या संख्या गणित नाम घेत असताना किमान एखादे वेळेस तरी मनापासून नाम निघावं असा उद्देश असतो. आता जप कसा करावा? जप करताना उजव्या हाताच्या मधल्या पेरावर माळ धरून आपल्याकडे ओढायची असतात. माळेचे झीज होऊ नये म्हणून ते अपटणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

मेरुमणी येताच माळा विरुद्ध बाजूने मोजण्यास सुरू करावी. माळ जप करण्यापूर्वी आणि वापरून झाल्यावर माळेला नमस्कार करावा. ती कायम पवित्र ठिकाणी ठेवावी. शक्यतो एखाद्या कापडी पिशवीत किंवा एखाद्या डबीत जपमाळ ठेवावी. मन केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा. शुद्ध मनानं नामस्मरण घ्यावं. जप करतांना मन शांत व्हावं यासाठी शांत परिसरात निवड करावी..

सुखासनात बसून डोळे मिटूनच जप करावा. आपल्याला एक वाईट खोड असते ती म्हणजे नामस्मरण सुरू करतात जपमाळेकडे लक्ष देण्याची त्याचा अर्थ आपलं मन नामस्मरणात नव्हतो केवळ सोपस्कारात अडकलेला आहे. जपमाळाचा संबंध पापपुण्यशी नसून आपल्या विचारांशी निगडीत आहे,

म्हणूनच त्या सरावाला जप साधना म्हटल्या जात. ज्याप्रमाणे एखाद्या सुभाषित, श्लोक, कविता किंवा गाणे पाठ करण्यासाठी आपण 100 वेळा घोकंपट्टी करतो तसंच मन प्रसन्न करण्यासाठी 108 संख्या सुनिश्चित केले पाहिजे.

त्यामुळे आपणही संकेमध्ये अडकून न राहता मेरुमणी हाताला लागेपर्यंत अखंड नामस्मरण घेत राहव. तर अशा प्रकारे अधिक मासात भगवान श्रीहरी विष्णूची उपासना करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः..

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *