अमावस्येला काय करावे? काय करू नये? पितरांचे भरभरून आशिर्वाद असे मिळवा.

अध्यात्मिक माहिती

माणसाच्या आयुष्यात सर्व प्रयत्न करूनही पैसा जमत नसेल तर किंवा पैसे एका ना कोणत्या बाबतीत खर्च होत राहतात. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार अशा स्थितीत सोमवती अमावस्येच्या दिवशी तुळशीमातेची पूजा करावी. यासाठी प्रथम तुळशीला पाणी आणि फुले अर्पण करा. यानंतर धूप-दीप दाखवून भक्तीभावाने ‘श्री हरी श्री हरी श्री हरी’ या मंत्राचा 108 वेळा प्रदक्षिणा करा.

तुमच्या जीवनातील सर्व संकटे आणि संपत्ती आणि समृद्धीतील अडथळे दूर करण्यासाठी तुळशी मातेला प्रार्थना करा. चंद्राच्या कलेचा परिणाम आपल्या रोजच्या जीवनावर होत असतो. विशेषतः पौर्णिमेला आणि अमावस्येला हा प्रभाव जास्त असतो.
या सृष्टीतील अनेक घटक त्यावेळी जागृत असतात जे आपल्या काही गोष्टींवर खोलवर परिणाम करतात.

अनेक चमत्कारिक उपाय हे यादिवशी केल्यास आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येते. त्यामुळे उद्याची म्हणजेच सोमवारी असणारी सोमवती अमावस्या फार महत्वाची आहे. त्यादिवशी हा उपाय नक्की करा ज्यामुळे तुमचं घर धनलाभाने भरून जाईल.
काही अडचणी या दूर होत नसतात तसेच काही दोष सुद्धा. कधी नोकरीत अडचण येते तर कधी घरातील पैसा टिकत नाही.

या सर्व गोष्टींवर एकच उपाय तो म्हणजे अमावस्येला एक असा उपाय करणे जो या सगळ्याच निराकरण करेल. अमावस्येला शिवपूजेचे विशेष महत्व आहे. तसेच या दिवशी गोपूजन केले जाते. गोमाता आपल्या मनातील इच्छा पूर्ण करते. तसेच भोळे सदाशिव आपल्याला आशीर्वाद देतात. कुंडलीत असणारे पितृदोष दूर करण्यासाठी हा उपाय फलदायी ठरेल.

त्यामुळे तुमचे पितर तुम्हाला आशीर्वाद देतील व तुमची अडलेली कामे त्यामुळे पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्या कामात सफलता मिळेल. यादिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करावे, त्यानंतर उगवत्या सूर्याला व तुळशीला अर्घ्य द्यावे. सोमवार असलेने भगवान शंकराची जलाभिषेक करून पूजा करा व शिवाला प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू शिवलिंगावरती अर्पण करा.

माता लक्ष्मीचा आपल्या घरी सदैव वास होण्यासाठी, दोष, पिडा दूर होऊन तुमच्या आयुष्यात सफलता येण्यासाठी हा उपाय नक्की करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत 108 प्रदक्षिणा तुळशी मातेला घालाव्यात. सायंकाळी तुळशीमध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावल्यास आपली भरभराट होते.

तुळशीला प्रदक्षिणा घालताना तुम्ही तुमच्या इष्ट देवतेचे सुद्धा स्मरण करू शकता. हा उपाय इतका प्रभावशाली आहे की तुमच्या घरातील गरिबी समूळ नष्ट होईल. हा उपाय आपल्या हिंदू पुराणात सांगितला आहे, तुळशीमाता आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते. या विशेष अमावस्येला हा विशेष उपाय करून तुमच्या आयुष्यातील सर्व गरिबी दूर करा.

शास्त्रा नुसार तुळशीला 108 प्रदक्षिना घातल्याने तुमच्या आयुष्यात असणारी सर्व दुःख, अडचणी देवी तुळसी दूर करते अशी मान्यता आहे. सायंकाळी तुळशीला दिवा लावल्यास घरात नकारात्मक गोष्टी प्रवेश करत नाहीत. ज्यामुळे घरातील आनंद टिकून राहतो व घरात सुख समृद्धी येते. सर्व वाद, द्वेष, दुःख दूर होते. शिवपूजन केल्याने सर्व पापे नष्ट होतात. या दिवशी मांस मद्य सेवन करू नये. सत्य बोलावे. तसेच कोणाच्या घरी अन्न ग्रहण करू नये. घरी अभद्र बोलू नये. शक्य तितके जीवन साधे जगावे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *