आमलकी एकादशीला तीन अद्भुत योग! अशी करा पूजा मिळेल शीघ्र फळ

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारचे सण उत्सव असतात. तसेच अनेक व्रत उपवास देखील करण्याची प्रथा परंपरा आहे. तर हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात. एक एकादशी शुक्लपक्षात तर दुसरी एकादशी कृष्ण पक्षात येते.

एकादशीचे वेगळे असे महत्त्व आहे. त्यामध्ये फाल्गुन महिन्यातील शुक्लपक्षातील एकादशीचे व्रत हे खूपच महत्त्वपूर्ण मानलं जातं. यालाच आपण आमलकी एकादशी असे म्हणतो. तर यावर्षी आमलकी एकादशी 3 मार्च 2023 रोजी असणार आहे. विशेष म्हणजे या दिवशी तीन योग जुळून आले आहेत. या दिवशी आवळ्याने भगवान विष्णुंची पूजा केली जाते.

या दिवशी आवळ्याच्या वृक्षाची विधिवत पूजा केल्यास मोक्षाकडे वाटचाल सुरु होते. होळीपूर्वी येणाऱ्या एकादशीला पार्वती देवी शिवांसोबत काशीला आली होती अशी अख्यायिका आहे. या दिवशी या जोडीचे रंगाची उधळण करत स्वागत करण्यात आले होते. या दिवशी शिवगण महादेवांसोबोत गुलालाची होळी खेळले होते. त्यामुळे आमलकी एकादशीचे महत्त्व आणखी वाढते.

तर आमलकी एकादशीला आपण जर योग्य त्या पद्धतीने पूजा केल्या तर यामुळे आपणाला अनेक शुभ फळ प्राप्त होतात. आमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णु प्रसन्न होतात. आवळ्याच्या झाडात ब्रह्मा, विष्णु आणि शिवाचा वास असतो असे मानले जाते.

त्यामुळे आमलकी एकादशीला हरी आणि शिवाची एकत्र पूजा केली जाते. यामुळे विवाहातील अडचणी दूर होतात. त्याचबरोबर वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आवळ्याच्या रसाने हरिंचा अभिषेक करावा. दुसरीकडे शिवलिंगावर गुलाल अर्पण करावा. यामुळे लग्नातील सर्व अडचणी दूर होतात.

आमलकी एकादशीला यावर्षी तीन योग जुळून येत आहेत. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, सौभाग्य आणि शोभन योग एकत्रित आले आहेत. सौभाग्य योग आपल्या नावानुसार फळ देतो. तसेच सर्वार्थ सिद्धी योगात भगवान विष्णुंची पूजा केल्याने कामात अपेक्षित यश मिळतं.

आमलकी एकादशीला सौभाग्य योग 2 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 5.51 मिनिटं ते 3 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 6.45 मिनिटांपर्यंत आहे. तर शोभन योग 3 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 6.45 मिनिटं ते 4 मार्च 2023 रात्री 7.37 मिनिटापर्यंत आहे. तसेच सर्वार्थ सिद्धी योग 03 मार्च 2023 सकाळी 6.47 मिनिटं ते दुपारी 3.43 मिनिटांपर्यंत आहे.

पारण विधी हा 4 मार्च 2023 रोजी, सकाळी 6 वाजून 48 मिनिटं ते सकाळी 9 वाजून 9 मिनिटांपर्यंत आहे. या तीन योगामुळे ही आमलकी एकादशी खूपच महत्त्वपूर्ण आहे आणि वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही या पूजा आमलकी एकादशीला अवश्य करा. यामुळे तुमची प्रगती होईल. तुम्हाला शुभ फळ नक्कीच प्राप्त होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *