अंगावर शहारे आणणारा स्वामींचा थरारक अनुभव..

राशिभविष्य

श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो. दत्तसंप्रदायात ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे. वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही विभूती होऊन गेली. अत्रिऋषी आणि अनसूया यांचा पुत्र म्हणजे श्रीदत्तगुरू हे होत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्तपरंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होत.

या भगवान श्री दत्तयांचे अवतार श्री स्वामी समर्थ याच्या भक्ताची एक अविस्मरणीय अनुभवकथा आहे. स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात याचा एक अनुभव आहे . हा अनुभव मिरज येथे स्वामीभक्त अनुप कुलकर्णी या दादांचा आहे ते बोलतात की 2014 वर्ष, मी जस्ट बीकॉम मध्ये प्रवेश घेतला आणि त्याच वर्षी माझ्या बाबांना कॅन्सर झाला पण स्वामींच्या आशीर्वाद म्हणून ते त्यातून बाहेर पडले आणि तसेच लगेच 1 वर्ष होत नाही तोपर्यंत माझा बाबांना हृदविकाराचा झटका बसला , त्यांना ताबडतोब 42 हजार रुपयेचे इंजेक्शन दिले गेले.

यातुन ते बरे झाले पण त्यांना दहा पावलं पण नीट चालता येत नव्हतं त्यामुळे डॉक्टरांनी बाबांची ऍन्जिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला. ऍन्जिओग्राफीत समजले की 100% ब्लॉकेजेसच्या समस्या असल्याने, लगेच आम्ही केएलई बेळगाव येथे उपचारासाठी घेऊन जायचे ठरवले. तेव्हा मी खूप लहान व माझ्या दोन बहिणी सुद्धा आहेत.

त्यातच लोकांनी हॉस्पिटलचा खर्च खुप आहे अशी भीती घातली होती. मी वीस हजार रुपये घेऊन बेळगावला रेल्वेने निघालो आणि स्वामी तुम्ही पाठीशी असेल तर ऑपरेशन होऊ देऊ नका असे स्वामींना बोललो. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर माधव दीक्षित म्हणून डॉक्टर होते त्यांची भेट झाली आणि ऑपरेशन करायचं ठरलं.

त्यांनीही खर्च सांगितला आणि मी पैसे भरले आणि मला खूप भीती वाटत होती म्हणून तिथे भाऊजींना थांबवून मिरजला आलो. दुसऱ्या दिवशी बाबांच्या सर्जरीची सर्व तयारी झाली आणि बाबांना आज ऑपरेशनला घेतलं. सर्व मशीन लावले आणि डॉक्टर अँजिओग्राफी केलेली सीडी पाहुन ऑपरेशन करणार नाही असा निर्णय घेतला.

तेव्हा डॉक्टर म्हणाले माझ्या 40 वर्षांचा अनुभव सांगतोय या माणसाच ऑपरेशन सुरू केलं, तर माणूस जागेवर मरणार आहे असे सांगून डॉक्टरांनी नकार दिला. नंतर भाऊजींचा फोन आला व त्यांनी सर्व प्रकार मला सांगितला त्यावर मी खुप दुःखी होऊन रडायला लागलो, स्वामींसमोर रडू लागलो. तुम्हीच केलाय का असे बोललो तेव्हाच स्वामींच्या फोटोवरून फुल पडलं.

तेंव्हापासून एक 6 महिने बाबांनी औषध घेतलं त्यावर बाबांनी एकही कसली गोळी घेतली नाही व दोन किलोमीटर रोज चालतात आणि त्याना कसलाही थकवा जाणवत नाही. तसेच रोज न चुकता स्वामी समर्थ महाराजांची पूजा आणि जप करतात.आता त्यांचे आरोग्य चांगले आणि निरोगी आहे.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *