आंघोळीचे हे नियम लक्षात ठेवा : मिळेल सुख, शांती ऐश्वर्य, आरोग्य, ज्ञान प्राप्त होईल !

अध्यात्म माहिती

मित्रांनो आपण दररोज सकाळी नियमितपणे आंघोळ करत असतो. कारण आंघोळ केल्यानंतर ना आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळत असतील किंवा आपला दिवस पूर्णपणे चांगला जातो. आनंदी व सुखमय जात असतो. कारण आंघोळ केला नंतर आपला मूड देखील फ्रेश होतो.आपल्यामध्ये जी नकारात्मक शक्ती आहे ती आंघोळीमुळे दूर होते.

आपल्याला जर आपले अंग दुखत असेल किंवा काहीतरी होत असेल तर आपण आंघोळ केल्यानंतर एकदमच आपण फ्रेश होऊन जातो. अंघोळ केल्या नंतर ना आपल्याला एक सकारात्मकपणा वाटत असतो.आपला चेहरा तजेलदार दिसत असतो. तर मित्रांनो मी आज तुम्हाला काही अंघोळीचे नियम सांगणार आहे.

ते तुम्हाला आज पर्यंत कधी माहित नसतील. कधीही आंघोळ केली तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. चला तर आता आपण जाणून घेऊया की आंघोळ नेमक्या कोणत्या वेळेमध्ये करायला पाहिजे.चला तर मग आंघोळीची काही नियम जाणून घेऊया.

मित्रांनो आपण दररोज घरामध्ये आंघोळ करत असतो पण कोणतेतरी सणाला किंवा आपल्या घरामध्ये कोणता जरी कार्यक्रम असला तर आपण नदीमध्ये किंवा तलावामध्ये विहिरीमध्ये आपण आंघोळ करायला जातो. कारण नदीचे तलावाचे विहिरीचे पाणी हे खूप पवित्र आहे असे म्हणले जाते.

त्याच्यामध्ये आपण आंघोळ केल्यानंतर आपल्या मनामध्ये जे काही नकारात्मक शक्ती असेल त्या शक्तीचा नाश होतो. व आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. आजकाल माणसे आपल्या वेळे नुसार अंघोळ करत असतात पण ते तसे ते केलास त्यांना त्याचे परिणाम हे वेळेनुसार भोगावेच लागतात.

शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की ब्रह्म मुहूर्तावर स्नान करण्याचे मोठे महत्त्व आहे. आपल्याला जर शक्य होत असेल तर आपण रोज सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजेच की पहाटे चार ते पाच वाजता आपण आंघोळ करायची आहे. असे असे जर आपण केलं तर आपल्या दिवसाची सुरुवात ही खूप चांगली होणार आहे व आपण दिवसभर सकारात्मक विचारच करणार आहोत.

तर सकाळी चार ते पाच या दरम्यान जे स्नान केलं जातो त्या स्नानाला मुनी स्नान असे म्हणतात. कारण या वेळेस ऋषीमुनी स्नान करत असतात आणि त्याचबरोबर साधना देखील करत असतात. दुसरी वेळ आहे ती म्हणजे सूर्योदयापूर्वीची वेळ पहाटे पाच ते सहा पर्यंत जे स्नान केले जाते त्या. स्नानाला देवस्नान असे म्हणले जाते.

यावेळेस केलेल्या आंघोळ एकदम उत्तम मानली जाते. व ती एकदम चांगली देखील असते .सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयाच्या नंतर जर आपण आंघोळ केलं तर आपल्याला चांगले परिणाम मिळतात.म्हणजे त्याचे आपल्याला चांगले फायदे होतात. तिसरे स्नान आपल्याला सकाळी सहा ते आठ या वेळेस करायचे आहे.

जास्त करून सगळे लोक या वेळेमध्येच आंघोळ करत असतात. या वेळेला मानवी स्नान असे म्हणले गेले आहे. सहा ते आठ या वेळेमध्ये शाळेला जाणारी मुले किंवा कामाला जाणारी माणसे या वेळेमध्ये आंघोळ करत असतात व ती वेळ एकदम योग्य आहे. एक लक्षात ठेवा जर तुम्ही सकाळी आठ नंतर अंघोळ करत असाल तर ते स्नान राक्षसी स्नान म्हणून ओळखले जाते.

शास्त्रानुसार असे सांगण्यात आलेले आहे की मुनी स्नान हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. देवस्थान सुद्धा श्रेष्ठ आहे. आणि मानव स्नान हे सामान्य आहे. तर राक्षसी स्नान हे धर्माने निषिद्ध मानले गेलेले आहे. सकाळी आठ नंतर अंघोळ करू नये. शास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे की पवित्र स्नान केल्याने आपल्याला सुख शांती समृद्धी ऐश्वर्या व आरोग्य ज्ञान प्राप्त होते.

त्याचबरोबर आपल्याला जर आपल्या घरावर जर कोणते संकट असेल तर त्या संकटातून देखील आपल्याला बाहेर काढत असते.आपल्याला कीर्ती मान व वैभव प्राप्त होतं. मानव स्नान केल्याने कुटुंबामध्ये आनंद सत्कर्माचे ज्ञान बरोबर आपण कोणतेही काम करायला गेलो तर त्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होतो.

त्याचबरोबर सकाळी वेळेवर अंघोळ केल्यानंतर सुद्धा दिवसातून आपल्याला तीन वेळा आंघोळ करता येते. पहिले स्नान हे आपण सकाळी करत असतो. तर आपल्याला सकाळी वेळ मिळत नसेल किंवा आपण कोणत्यातरी कामांमध्ये असलो तर आपण दुपारी स्नान करतो .जर आपल्याला उठायचं किंवा कोणत्याही कामाचा आपल्याला त्रास होत असेल.

तर आपण दुपारी आंघोळ करत असतो. आणि शेवटचेच स्नान आपल्याला संध्याकाळी म्हणजेच की सहा वाजता करायचे आहे. जर तुम्हाला थंडी वाजत असेल किंवा तुम्हाला अंघोळ करायचा कंटाळा आला असेल तर तुम्हाला दररोज नियमितपणे आंघोळ करायची आहे.

तुम्ही दररोज नियमितपणे आंघोळ केल्यानंतर ना तुमच्या अंगामध्ये सकारात्मक ऊर्जा येणार आहे.त्याचबरोबर तुमचे आरोग्य देखील चांगले राहणार आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला अंघोळीचे नियम सांगितले आहेत. त्या नियमानुसारच तुम्ही आंघोळ करायची आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *