अंत्यसंस्कारात चंदनाचा, तर लग्नात का वापरले जाते आंब्याचे लाकूड ?

अध्यात्मिक वायरल

मित्रांनो,आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारच्या रूढी, परंपरा या वर्षानुवर्षे चालत आलेल्या आहेत. या परंपरेचे अनेक लोक पालन करतात. तर बरेच जण हे अंधश्रद्धा म्हणून देखील सोडून देतात आणि ते पाळतही नाहीत. परंतु मित्रांनो अशा काही परंपरा आहेत यांना विशेष असे महत्त्व देखील दिले गेलेले आहे.

आपल्या हिंदू धर्मात चंदन आणि आंब्याच्या लाकडाला विशेष असे महत्त्व दिले गेलेले आहे महाभारत आणि इतर पुराणांमध्ये देखील स्वतंत्र असा उल्लेख या लाकडांचा केलेला आहे. मित्रांनो आंब्याचे लाकूड हे देवत्वाचे प्रतीक आहे.

तर चंदनाच्या लाकडामुळे थंडावा मिळतो. मित्रांनो धार्मिकतेबरोबरच आंबा आणि चंदनाला वैज्ञानिक असे महत्त्व आहे. अनेक वेगवेगळ्या विधींमध्ये चंदनाचे तसेच आंब्याचे लाकूड वापरले जाते. परंतु मित्रांनो इतर कोणतेही लाकूड न वापरता चंदनाचे आणि आंब्याचे लाकूड का वापरले जाते? यामागचे कारण नेमके कोणते आहे? हे तुम्हाला माहित आहे का?

तर मित्रांनो अंत्यसंस्कारात चंदनाचे आणि लग्नामध्ये तसेच अनेक हवन पूजेमध्ये देखील आंब्याचे लाकूड का वापरले जाते या मागचे कारण आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आंब्याच्या लाकडाची विशेष अशी धार्मिक श्रद्धा आहे.

शास्त्रानुसार मुलाचा जन्म, लग्न किंवा इतर शुभ कार्यात आंब्याच्या लाकडाचा वापर केल्याने सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि सुख, समृद्धी आणि शांती मिळते. तसेच नवविवाहित जोडप्याच्या जीवनात येणाऱ्या सर्व समस्या दूर नष्ट होतात. आंब्याचे लाकूड तसेच इतर हवन साहित्यामुळे हानिकारक जीवाणू नष्ट होतात.

मित्रांनो, पूर्वीच्या काळापासून अंत्यसंस्कारात चंदनाचा वापर केला जात आहे. सध्याच्या काळात चंदन महाग झाल्याने लोक प्रेताच्या तोंडाला चंदन लावतात. त्यामुळे परंपरेचे पालन केले जाते. यामागील तर्क असा आहे की, असे केल्याने आत्म्याला शांती मिळते आणि यमलोकालाही चंदनाची शीतलता मिळत राहते.

मित्रांनो, हवन-पूजा आणि लग्नात फक्त आंब्याचे लाकूड वापरले जाते. याचे शास्त्रीय कारण म्हणजे हे लाकूड कमी कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित करते. अत्यंत ज्वलनशील असल्याने ते खूप लवकर जळते आणि पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही.

तसेच विशेष बाब म्हणजे आंब्याच्या लाकडातून फॉर्मिक अल्डीहाइड नावाचा वायू बाहेर पडतो. ज्यामुळे धोकादायक जीवाणू नष्ट होतात. आंब्याच्या लाकडापासून बनवलेल्या हवनासमोर अर्धा तास बसल्याने अनेक रोग दूर होतात असे शास्त्रीय मत आहे.

त्यामुळे अंत्यसंस्कारात चंदनाचा वापर केला जातो. जेणेकरून मृतदेह जाळल्यामुळे येणारी दुर्गंधी थांबवता येते. खरं पाहायला गेले तर मृत शरीरावर अंत्यसंस्कार केल्यावर, शरीराचे मांस आणि हाडे जाळल्याने तीव्र गंध निघतो. चंदनामुळे या गंधाचा प्रभाव कमी होतो.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *