आपल्या बोटांवरून ओळखा आपला स्वभाव आणि भाग्य!

अध्यात्म राशिभविष्य

मित्रांनो,आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगवेगळे स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच कोणाचा मनमिळावू तर कोणाचा रागिट असा हा स्वभाव प्रत्येकाचा वेगळा असतोच. मित्रांनो आपण जन्मतारखेवरून आपली कुंडली काढत असतो. जेणेकरून आपल्याला आपल्या भविष्यामध्ये काय घडणार आहे.

म्हणजेच आपले जीवन कसे राहणार आहे आपले जीवनात कोणत्या अडचणी येणार असे अनेक प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी आपण जन्म कुंडली ही काढतच असतो. तसेच मित्रांनो आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची लोक असतातच. परंतु आपण काही वेळेस अनेक लोकांवरती मनापासून विश्वास ठेवतो परंतु तीच लोकं आपल्या विश्वासघात देखील करीत असतात.

म्हणजेच लोकांचा स्वभाव आपल्या लक्षात न आल्या कारणाने आपणाला निर्णय घेताना खूपच अवघड जाते. म्हणजेच त्या व्यक्तीच्या स्वभाव कसा आहे हे आपल्याला कळत नसल्या कारणाने अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. तर मित्रांनो शरीरातील अनेक अवयवावरून आपण समोरच्या व्यक्तींचा स्वभाव कसा आहे हे जाणून घेऊ शकतो.

तर आज मी तुम्हाला हाताच्या बोटांवरून त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो हे सांगणार आहे. तर जाणून घेऊयात हाताच्या बोटावरून त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो ते. हस्त रेखा तज्ज्ञांप्रमाणे, व्यक्तीची प्रकृती त्याच्या हातच्या बोटांनी स्पष्ट होते. केवळ आपली तर्जनी अर्थात अंगठ्याजवळचे बोट देखील आपल्या स्वभावाबद्दल खूप काही संकेत देते.

तर आपल्या हाताच्या तर्जनी वरून आपण स्वभाव जाणून घेऊ शकतो. चला तर मग कोणत्या प्रकारच्या तर्जनी असलेल्या व्यक्तींचा स्वभाव कशा प्रकारचा असतो ते जाणून घेऊया. जर तुमच्या तर्जनी मध्यमा बोटाएवढी लांब असेल तर अशा व्यक्ती दुसऱ्यावर खूपच भारी पडतात. म्हणजेच या व्यक्ती खूपच अहंकारी असतात.

तसेच आपले म्हणणे प्रत्येकाने ऐकावे असे त्यांना वाटत असते. म्हणजेच समोरच्या व्यक्तीचे ते काहीच ऐकत नसतात. असे लोक स्वतःला खूपच शहाणे समजतात. तसेच जर तर्जनी ही मध्यमा होऊन मोठी असेल म्हणजेच आकाराने मोठी असेल तर असे लोक देखील खूपच अहंकारी असतात आणि ते स्वतःला खूपच महान समजतात.

प्रत्येक निर्णयांमध्ये ते आपलेच खरे करत असतात. समोरच्या व्यक्तीला ते जास्त मानत देखील नाहीत. जर तुमची तर्जनी ही मध्यमा बोटापेक्षा लहान असेल तर अशा व्यक्ती खूपच महत्त्वाकांशी स्वभावाच्या असतात. म्हणजेच त्यांच्या मध्ये एक प्रकारचा उत्साह असतो. म्हणजेच प्रत्येक काम ते खूपच आनंदाने करीत असतात आणि त्या कामांमध्ये त्यांना यश देखील प्राप्त होत असते. प्रत्येक नवीन कार्यामध्ये ते आपला उत्साह घालत असतात.

तसेच तुमची जर तर्जनी ही अनामिका होऊन लांब असेल तर अशा व्यक्ती खूप वेळा घाई गडबडीमध्ये काम करतात आणि कामात व्यत्यय देखील आणतात. म्हणजेच घाईगडबडीने ते त्या कामांमध्ये अपयशी होतात. तसेच या व्यक्ती महत्त्वकांक्षी देखील स्वभावाच्या आपणाला पाहायला मिळतात. तसेच तर्जनी ही अनामिकाच्या समान असेल म्हणजेच अनामिका आणि तर्जनी या समान असतील तर या व्यक्ती खूपच आपल्या जीवनामध्ये धन कमवत असतात.

त्यांना समाजामध्ये मानसन्मान आणि प्रतिष्ठा देखील भरपूर असते. तसेच या व्यक्ती शांत स्वभावाच्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच कोणत्याही अडचणीच्या भांडणांमध्ये किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये या व्यक्ती शांत मार्गाने सर्व काही व्यवस्थित करीत असतात. अशा व्यक्ती खूपच भाग्यवान देखील समजल्या जातात.

तसेच तुमची जर करंगळी तर्जनीच्या नखापर्यंत पोहोचत असेल तर अशा व्यक्ती देखील खूपच भाग्यवान समजल्या जातात. या व्यक्ती एखादा महान लेखक किंवा कलाकार असतात. त्यांची बुद्धी खूपच तल्लख असते आणि इतरांना कायम ते मदत करण्यासाठी तत्पर राहतात. जर तुमची तर्जनी आणि करंगळी ही समान असेल तर असे लोक खूपच बुद्धिमानी आपल्याला पाहायला मिळतात.

म्हणजेच या व्यक्ती ज्या योजना आखतात त्या सर्वांसाठीच फायदेशीर ठरतात. तसेच योग्य तो निर्णय घेऊन ते प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असतात. अशा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये खूपच धन कमवतात. त्यांना कशाचीच कमतरता राहत नाही. ते प्रत्येक पाऊल टाकीत असताना खूपच विचारपूर्वक टाकत असतात. जेणेकरून त्यामध्ये त्यांना यशच प्राप्त होईल.

अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *