आपल्या घरात या वस्तू अवश्य ठेवा; माता लक्ष्मीचा राहील सदैव वास!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो प्रत्येकाला वाटत असते की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहायला पाहिजे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि विविध प्रकारचे उपाय देखील केले जातात कोणत्या गोष्टीमुळे प्रसन्न होते व आपल्या घरामध्ये कायम तिचा वास राहील यासाठी अनेक मार्ग देखील आपण शोधत असतो

तर मित्रांनो तुमच्या घरामध्ये जगातील वस्तू असतील किंवा त्यातील गोष्टी असेल तर तुमच्या घरामधून माता लक्ष्मी कधी जाणार नाही व तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी देखील दूर होणार आहेत . त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत व त्या वस्तू कोणत्या आहेत चला तर मग आपण जाणून घेऊया.

मित्रांनो घरामध्ये नकारात्मक गोष्टी म्हणजे दुःख दरिद्री, वाईट नजर, वाईट शक्ती कायमच्या दूर होतात. तुमच्यावर बिना कारण संकट येत असतील किंवा वेगवेगळ्या वारंवार निर्माण होत असतील. मित्रांनो पहिली वस्तू आहे ती म्हणजे पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा पंचमुखी हनुमानाचा फोटो. घरामध्ये हनुमानाचा फोटो असणे खूपच आवश्यक आहे.

असे भरपूर लोक आहेत ज्यांच्या घराच्या बाहेर, मुख्य दरवाजाच्या वर पंचमुखी हनुमानाचा फोटो किंवा मूर्ती लावलेली असते आणि हा पंचमुखी हनुमानाचा फोटो तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर वरच्या बाजूला लावला तर त्याने घराचे रक्षण होते, घरामध्ये कोणतीही नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. दुःख अडचणी किंवा कोणी केलेली करणी बाधा घरात प्रवेश करत नाही.

दुसरी वस्तू आहे ती म्हणजे शंख, श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची आवडती वस्तू म्हणजे शंख, शंख देव घरामध्ये ठेवणे अत्यंत शुभ मानले गेलेले आहे तुमच्यावर ज्या काही अडचण येणार आहेत त्या अडचणी दूर होणार आहे तुम्हाला शंख देव घरामध्ये ठेवायचा आहे व त्याची दररोज नित्यनियमाने पूजा देखील करायची आहे. तो नेहमी तुमच्या देवघरामध्ये असला पाहिजी शंख हा सहज पणे मिळुन जाऊ शकतो.

पूजा सामग्री च्या दुकानांमध्ये किंवा स्वामी केंद्रामध्ये सुद्धा उपलब्ध आहे नवीन शंख आल्यांनतर दूध आणि पाण्याने अभिषेक करून हळद कुंकू अक्षदा टाकून त्याची पूजा प्रार्थना करून अगरबत्ती धूप दिवा लावून देवघरामध्ये स्थापन करायचे आहे.आणि जेव्हा तुम्ही सकाळ संध्याकाळी पूजा करता तेव्हा त्या शंखाची सुद्धा पूजा करायचि आहे.त्याने घरामध्ये सुख शांती लाभते, सकारात्मक उर्जा घरात येते.

शंख हा शांतीचा प्रतीक म्हणून सुद्धा ओळखला जातो आणि त्याचबरोबर जर शंख तुम्हाला वाजवता येत असेल तर रोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर शंख घरात नक्की वाजवायचा आहे.वाजवल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये सुख शांती चे वातावरण निर्माण होईल. आणि मित्रांनो तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे पाण्याने भरलेला माठ,

अगोदरच्या काळामध्ये सगळ्या घरांमध्ये माठ असायचे पण आता फ्रिज आल्यामुळे भरपूर लोक माठ ठेवत नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये पाण्याचा मातीचा माठ असला पाहिजे किचन मध्ये तो माठ ठेवायला पाहिजे.पाण्याचा माठ हा माता लक्ष्मीच आवडते प्रतीक सुद्धा मानले जात. तर अशा प्रकारे शंख, पाण्यासाठी वापर होणार मातीचा माठ आणि पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरामध्ये ठेवायचे आहे.यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन सदैव तुमच्यावर कृपा करेल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *