अन्नपूर्णा जयंतीला ‘या’ गोष्टी टाळा अन्यथा येईल दारिद्र्य!

अध्यात्मिक

मित्रांनो, आपल्या घरामध्ये म्हणजेच आपल्या देवघरांमध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असणे खूपच लाभदायी मानले जाते. अन्नपूर्णा मातेची मूर्ती असल्याने आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही. तर मित्रांनो या अन्नपूर्णा मातेची जर तुम्ही मनोभावे पूजा केली तर यामुळे आपल्या सुख समृद्धीमध्ये वाढ होते.

तर मित्रांनो आज मी तुम्हाला अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत म्हणजे त्या गोष्टी अजिबात करायच्या नाहीत जेणेकरून या गोष्टी जर तुम्ही केल्या तर आपल्याला दारिद्र्य येऊ शकते. तर मित्रांनो या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत ज्या आपल्याला टाळायच्या आहेत हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

तर हिंदू कॅलेंडरनुसार, अन्नपूर्णा जयंती ही मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी करतात. अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपण अनेक गोष्टींकडे विशेष असे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण मित्रांनो आपल्या हातून अशा काही चुका झाल्या तर यामुळे त्याचा वाईट परिणाम हा आपल्या जीवनावर होऊ शकतो.

पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी देवी पार्वती अन्नपूर्णेच्या रूपात पृथ्वीवर अवतरली. या दिवशी जे देवी पार्वतीची खऱ्या भक्तीभावाने पूजा करतात. त्यांच्या जीवनात अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही . यासोबतच घराचे स्वयंपाकघर अन्नधान्याने भरलेले असते आणि कोणीही उपाशी झोपत नाही.

तर मित्रांनो हे आपल्याला शुभ फळ त्यावेळेसच प्राप्त होते ज्यावेळेस तुम्ही या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी योग्य त्या नियमांचे पालन करतात. मित्रांनो अन्नपूर्णा देवीला अन्नाची देवी मानले जाते. त्यामुळे मित्रांनो या दिवशी स्वयंपाक घराची साफसफाई करून अन्न आणि चुलीची पूजा बरेच जण करीत असतात. तसेच मित्रांनो आपल्या घरातील गृहिणीलाही अन्नपूर्णेचे एक रूप मानले गेलेले आहे.

त्यामुळे मित्रांनो या दिवशी घरातील महिला स्वयंपाक घरात तांदळाची खीर बनवून अन्नदान करतात. कारण जर असे केले तर यामुळे आपल्या घरातील धान्य हे कायमच भरलेले राहते. त्याची कमतरता कधीच मग आपणाला जाणवत नाही. तर मित्रांनो अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपले स्वयंपाक घर आहे ते स्वयंपाक घर गंगाजलाने शुद्ध करावे. तसेच आपल्या घरातील स्टोव्ह, गॅस इत्यादींची आपण पूजा करायची आहे.

तसेच मित्रांनो जर तुम्ही अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्न तसेच धान्य दान केले तर देवी अन्नपूर्णा ही प्रसन्न होते. तसेच मित्रांनो या दिवशी लाल, पिवळी आणि पांढऱ्या रंगाचे कपडे घालणे खूपच शुभ मानले गेलेले आहे. अन्नपूर्णा मातेची पूजा ही सकाळी आणि संध्याकाळी करायची आहे. यामुळे अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबीयांना प्राप्त होतो.

तर मित्रांनो अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपण काही गोष्टी करणे टाळायचे आहे. कारण या जर गोष्टी तुम्ही केल्या तर यामुळे तुम्हाला दारिद्र्याचा सामना देखील करावा लागू शकतो. तर मित्रांनो या दिवशी तुम्ही आपल्या घरातील जे स्वयंपाकघर आहे ते स्वयंपाक घर कधीही अस्वच्छ ठेवायचे नाही. तसेच मित्रांनो अन्नपूर्णा देवीच्या पूजेमध्ये दुर्वा देखील आपण अर्पण करायच्या नाहीत.

तसेच या दिवशी खारट अन्न अजिबात सेवन करायचे नाही. तसेच या दिवशी आपल्या स्वयंपाक घरामध्ये मास, मासे किंवा तामसिक अन्न अजिबात शिजवायचे नाही. तसेच आपल्या घरातील अन्न हे वाया देखील घालवायचे नाही. कारण या गोष्टी जर तुम्ही अन्नपूर्णा जयंतीला केल्या तर यामुळे अन्नपूर्णा माता आपल्यावर नाराज होते आणि मग आपल्या घरामध्ये ती वास्तव्य करत नाही.

यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. तसेच आपल्याला दारिद्र्याचा सामना देखील करावा लागू शकतो. त्यामुळे मित्रांनो या दिवशी वरील सांगितल्याप्रमाणे या गोष्टी तुम्ही टाळायचे आहे.जेणेकरून आपल्याला याचे शुभ प्राप्त होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *