आर्थिक संकटाने त्रस्त असाल तर हे उपाय नक्कीच करा…

अध्यात्मिक

ज्योतिष शास्त्रात असे अनेक उपाय सांगितले आहेत, जे लोक आपले नशीब बदलण्यासाठी प्रयत्न करू शकतात. या उपायांचे योग्य प्रकारे पालन केल्याने धन-दौलत मिळण्याची शक्यता वाढू शकते. आपल्यापैकी जवळपास सर्वच व्यक्तीना भरपूर पैसा हवा असतो. तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव त्याच्या पाठीशी राहावी असे वाटत असते. पण अनेक वेळा खूप मेहनत करूनही यश मिळत नाही.

मग अश्या कठीण परिस्थितीत अनेक लोक ज्योतिषाची मदत घेतात. ज्योतिष शास्त्रात असे अनेक उपाय सांगितले आहेत जे लोक त्यांचे नशीब बदलण्याचा प्रयत्न करू शकतात. या उपायांचे पालन केल्याने धन मिळण्याची शक्यता वाढू लागते. तसेच काही अडथळा असेल तर तो दूर होतो. चला तर मग जाणून घेऊया पैसे मिळवण्याचे काही उपाय जे केल्यास बक्कळ धनलाभ होईल..

हिंदू शास्त्रानुसार काळ्या मिरीचा उपाय धनाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी प्रभावी मानला जातो. यासाठी 5 दाणे काळी मिरी घ्या आणि 7 वेळा डोक्यावरून ओवाळून घ्या. यानंतर, यापैकी 4 दाणे चारही दिशांना फेकून द्या आणि पाचवे दाणे आकाशाकडे फेकून द्या. तसेच ज्योतिष शास्त्रानुसार धनाशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी दररोज ब्रह्म मुहूर्तावर स्नान केल्यानंतर सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मी सूक्त आणि श्री सूक्ताचे 11 वेळा पठण करावे. असे म्हणतात की, असे 108 दिवस सतत केल्याने धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.

तसेच धर्मग्रंथानुसार धनाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करावी. तसेच पूजेनंतर 11 हळदीच्या गुठळ्या घेऊन लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवाव्यात. तसेच असे म्हटले जाते की, याने तिजोरी कधीही रिकामी राहत नाही. तसेच शास्त्रानुसार श्रीयंत्र मंदिरात किंवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवावे आणि त्याची रोज पूजा करावी.

असे म्हणतात की, यामुळे घरात लक्ष्मीचा कायम वास होतो. शुक्रवार देवी लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी अशोकाच्या झाडाचे थोडेसे मुळे आणून घराच्या तिजोरीत ठेवा. त्यामुळे घरात पैशांची कमतरता भासत नाही आणि पैशाची आवक सुरूच राहते, असे सांगितले जाते.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *