असा आहे का तुमचा मुल्यांक? जाणून घ्या सविस्तर

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा स्वरूपाचा असतोच. आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या स्वभावाचे लोक आपल्याला पाहायला मिळतातच. कोण स्वभावाने कठोर तर कोण प्रेमळ असतो. तर काही या खूपच आकर्षित करणाऱ्या असतात. आपल्याला ज्योतिष शास्त्रांमध्ये खूप सारी अशी माहिती पाहायला मिळते.

जेणेकरून त्या माणसांचा आपणाला स्वभाव तसेच त्यांच्याविषयी सविस्तर माहिती पाहायला मिळते. प्रत्येकाची एक जन्मतारीख ही असते आणि जन्मतारखेवरून म्हणजेच जन्मतारखेच्या मूल्यांकडून आपण त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे? त्यांच्यामध्ये कोणती गुणवैशिष्ट्ये आहेत हे पाहू शकतो.

तर मी आज तुम्हाला अशाच एका मूल्यांकविषयी सांगणार आहे ज्यांचा हा मूल्यांक असेल तर अशा प्रकारे त्यांचा स्वभाव तसेच गुणवैशिष्ट्ये तसेच त्यांच्या जीवनामध्ये त्यांना शुभ आणि अशुभ काय आहे याविषयी सांगणार आहे. जर तुमच्या जन्म दिवसाची बेरीज 6 येत असेल म्हणजेच तुमचा जन्म हा कोणत्याही महिन्याच्या 6 ,15 ,24 या तारखेला येत असेल तर ही माहिती त्यांच्यासाठी लाभदायक ठरू शकते.

ज्यांच्या जन्मतारखेचा मूल्यांक हा सहा असतो. तर सहा या अंकाचा ग्रह शुक्र आहे. तर यांची जी गुणवैशिष्ट्ये असतात ती म्हणजे यांना भौतिक सुखांचे आकर्षण असते तसेच विरुद्ध लिंगी आकर्षण, पर्यटन प्रेमी आणि यांना ट्रेकिंगची आवड असते. कलाप्रेमी असल्याने हे लोक अभिनय, मीडिया, जाहिरात या क्षेत्राकडे या लोकांचा कल जास्तच असतो.

हे लोक प्रेमाच्या आणि विवाहाच्या बाबतीत खूपच घाई करतात आणि नंतर त्यांना आपल्या निर्णयावर पश्चाताप करावा लागतो. म्हणजेच ते दुःखी होतात. सहा मूल्यांकचे माणसे हे आपल्या जीवनामध्ये खूप सारा पैसा कमवीत असतात. तसेच ते अनोळखी लोकांबरोबर लगेचच मैत्री करतात.

जीवनाकडे सकारात्मकतेने पाहतात. तसेच यांना राग खूप येतो. रागावर नियंत्रण करणे खूप गरजेचे आहे. हे लोक लवकर दुखी होतात. तसेच या व्यक्ती खूपच पैसे खर्च करीत असतात. प्रसिद्धी संदर्भातील कोणत्याही क्षेत्रांमध्ये हे अग्रेसर असतात काही वेळा या व्यक्ती खूपच आळस दाखवतात.

तसेच ते वाद-विवाद करण्यात देखील खूपच पटाईत राहतात.
सहा मूल्यांक असणाऱ्या व्यक्तींनी शुक्रवारी सफेद म्हणजेच पांढरे वस्त्र धारण करावे. कारण यामुळे यांना विशेष लाभ मिळू शकतो. हलक्या रंगाचे वस्त्र परिधान करणे यांच्यासाठी लाभकारी ठरते.

सहा मूल्यांक असणाऱ्या व्यक्तींचा एक, पाच आणि दोन हे शुभ अंक आहेत. तर आठ हा अशुभ अंक आहे . बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हा शुभ वार तर मंगळवार हा त्यांच्यासाठी अशुभ मानला जातो. यांच्यासाठी सफेद रंग शुभ तर निळा रंग अशुभ मानला गेलेला आहे. यांनी देवीची उपासना तसेच लक्ष्मीचे स्तोत्र पठण करावे.

अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *