भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी मासिक शिवरात्रीला करा हे सोपे उपाय..

अध्यात्मिक माहिती

मासिक शिवरात्रीला रात्रीच्या वेळी भगवान शिव शंकराची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त मानला जातो. भगवान शंकराला प्रसन्न करून तुम्ही तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकता. महाकाल शिव हे सहज प्रसन्न होणारे आणि भक्तांच्या नजरेत भरणारे देवाचे देव आहेत. मनातील वाईट विचारांना दूर करून, तसेच दारिद्र्य, अकाली मृत्यूची भीती, ग्रह दोष दूर करून पुत्र संपत्ती, समृद्धी इत्यादी प्रदान करणारे देव आहेत.

तर शास्त्रानुसार काही सोपे उपाय केल्याने भगवान शंकराला प्रसन्न केले जाऊ शकत. मनातील सर्व इच्छा सुद्धा पूर्ण होऊ शकतात. चला तर मग मासिक शिवरात्रीशी काही संबंधित खास माहिती जाणून घेऊया आणि काही महत्त्वाचे उपाय बघूया.. ज्यामुळे हव ते फळ तुम्ही प्राप्त करू शकता.

वर्षभरातच 11 मासिक शिवरात्री आणि 1 शिवरात्री असते. मान्यता आहे की, शिवरात्रीला श्रद्धा आणि भक्ती भोलेनाथ यांची उपासना आणि उपवास केल्यास ते खूप प्रसन्न होतात आणि भक्तांचे दुःख सुद्धा दूर करतात. मासिक शिवरात्रीच्या दिवशी काही विशेष अडचणी दूर करण्यासाठी काही सोपे उपाय प्रभावी ठरू शकतात.

मग या दिवशी कोणते उपाय करावेत? तर घरातील उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे यासाठी महत्त्वाचा उपाय म्हणजे मासिक शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही घरी फारच शिवलिंगाची स्थापना करावी त्याची नियमित पूजा करावी उत्पन्नाचे स्त्रोत वाढण्यात मदत होईल.
याबरोबरच, नंदी हे महादेवाच आवडतं गण आहे.

आणि त्याची पूजा केल्याने महादेव अत्यंत प्रसन्न होतात तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी बैलांना नंदी समजून हिरवा चारा खायला द्यावा. यामुळे गरिबी दूर होते आणि जीवनात सुखसमृद्धी सुद्धा येते. याबरोबरच ज्यांना पुत्रप्राप्ती हवी आहे अशा लोकांनी या दिवशी पिठाच्या शिवलिंगाची पूजा करावी.

असं सांगण्यात येतं की या वेळी त्यांनी 11 शिवलिंग बनवावे आणि त्या सर्वांचा अकरा वेळा गंगाजलाने अभिषेक करावा आणि मनोभावे पूजा करावी. असं केल्याने संतती योग तयार होतो. याबरोबरच शिवरात्रीला 21बेलाची पाने घेवून त्यावर चंदनाने ओम नमः शिवाय लिहावे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत की पाणी महादेवाला अर्पण करावे.

असे केल्याने मनोकामना पूर्ण होतात. शिवाय तुम्हाला तुमच्या जीवनात पैसा, धान्य सुख आणि समृद्धी हवे असेल तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिवाला जव अर्पण करावं. तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल आणि तुमची त्यापासून सुटका होत नसेल तर तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.

मंत्र जप करण्यापूर्वी भगवान शंकराची बेलपत्र चंदन, फुले-फळे, धूप, दिवे यांनी पूजा करावी, या बरोबरच अक्षरी मंत्राचा म्हणजेच ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. यामुळे तणावातून सुटका मिळते आणि मनही शांत राहतं.
जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही संकट येत असल्यास शिवरात्रीला पती-पत्नीने मिळून शिव शक्ती म्हणजेच महादेव आणि माता पार्वतीची पुजा करावी,

यामुळे वैवाहिक जीवनात आनंद येतो. ज्या लोकांच कोणत्याही कारणामुळे लग्न जमत नसेल त्यांनी शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर गायीच्या दुधात कुंकू मिसळून अभिषेक करावा तुम्हाला सकारात्मक परिणाम लवकरच दिसू शकतात. तर मासिक शिवरात्रिला हे सोपे उपाय केलेत ना तर नक्की हवं ते फळ तुम्ही प्राप्त करू शकता. मासिक शिवरात्रि महादेवाला तुम्ही कसा प्रसन्न करतात? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा..

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *