बॉसशी 36 चा आकडा असणाऱ्या या काही राशी !

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला अशा काही राशी विषयी सांगणार आहोत, ज्या राशींचा आपल्या बॉसची 36 चा आकडा असतो. कितीही म्हटले तरी या लोकांचे आपल्या मालकाशी अजिबात पटत नाही. मालकाच्या विचारधारेला हे लोक नेहमी टक्कर देत असतात आणि आपले म्हणणे कसे खरे आहे हे वारंवार सांगत असतात. आपल्या सर्वांना बॉस म्हणजे अनेकदा टेन्शन येत असतो.

आपल्या आजूबाजूला असे बॉस असतात जे वारंवार आपल्या कर्मचाऱ्यांवर ओरडत असतात किटकिट कटकट करत असतात आणि यामुळे अनेकांना बॉस हा प्रकार आवडत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे अनेकदा आपण बॉस सोबत पंगा घेत असतो. हा पंगा अनेकदा महाग देखील पडू शकतो. परंतु हे सगळं गोष्टी या तुमच्या राशीमुळे घडत असतात, ज्योतिष शास्त्रामध्ये अशा काही राशींचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे ज्यांचा स्वतःच्या मालकांशी अजिबात जमत नाही.

हे लोक नेहमी मालकांच्या विचारधारेच्या विरुद्ध वावरत असतात आणि जगत असतात बसचे म्हणणे यांना पटत नाही आणि म्हणूनच प्रत्येक वेळी काही ना काही अडचण व भांडण व वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येते. बॉस शी नेहमी पंगा घेणारी जी पहिली रास आहे ती मेष राशी आहे.

आपल्या सर्वांना माहिती आहे की मेष राशीचा स्वामीग्रह मंगळ आहे. मंगळ राशीचा स्वामी असणारे अनेक जातक हे स्वभावाने रागिष्ट असतात म्हणूनच आपल्या मालकाचे व अधिकाऱ्याचे म्हणणे त्यांना अनेकदा पटत नाही. एखाद्या अधिकाऱ्याने जर आपल्याला काही सांगितल्यावर त्याचा राग नक्की मेष राशीच्या जातकांना येतो आणि अशावेळी हे लोक आपल्या भावना लपवून ठेवू शकत नाही. यांना लगेच राग येत असल्यामुळे या लोकांचे आपल्या मालकाशी भांडण नक्की होते.

या लोकांना अनेकदा मालकाचे म्हणणे पटत नाही म्हणूनच बहुतेक वेळ अशी परिस्थिती निर्माण होते की यांना कामाच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. मेष राशी असणाऱ्या व्यक्तींचा एक फायदा असा की हे लोक आपले काम नेहमी प्रामाणिकपणे पार पाडत असतात.

तसेच कोणतेही कार्य करत असताना त्यामध्ये चांगल्या गोष्टी देखील ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टी अड’चणी निर्माण होत नाही. फक्त मालकाच्या वागण्यामुळे व निर्णय न पटल्यामुळे अनेक घटना घडत असतात. जर तुमच्या जीवनामध्ये अड’चणी निर्माण होत असतील तर अशावेळी मेष राशीच्या व्यक्तीने सूर्याला नेहमी जल अर्पण करायला हवे.

तसेच बजरंग बली यांची पूजा अर्चना देखील करायला हवी. यानंतरची दुसरी राशी आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या जातकांचा देखील स्वामी ग्रह मंगळ आहे. या व्यक्तींना बॉसच्या हाताखाली काम करणे अजिबात पटत नाही म्हणूनच कामाच्या ठिकाणी या लोकांचे बस सोबत नेहमी वाकडे ठरते. या सर्व गोष्टीमुळे यांना कामांमध्ये नीट लक्ष देता येत नाही लक्ष केंद्रित करता येत नाही. यामुळे त्यांना व्यवसायिक प्रगती देखील करता येत नाही.

अनेकदा मनामध्ये सुळाची भावना निर्माण झाल्याने यांची संवाद शैली देखील बिघडून जाते तसेच अधिकाऱ्यांसोबत वागणे देखील खराब होते. सतत मानसिक अशांती जाणवू लागते. या राशीच्या व्यक्तीने देखील हनुमान चालीसाचे पठण नेहमी करायला हवे यानंतरची राशी आहे धनु राशि.

ज्या व्यक्तींची राशी धनु असते अशा राशीचे जातकांना देखील लवकर राग येतो आपल्या अधिकाऱ्यांनी सांगितलेले एखादी काम त्यांच्या जिव्हारी येत असते. रागिष्ट गुणधर्मामुळे यांच्या जीवनामध्ये अनेक अड’चणी निर्माण होत असतात यांचा रागाचा पारा हा लवकर वाढतो.

भविष्यात अनेक अडचणी यांच्या जीवनामध्ये निर्माण होतात. यांना देखील राग शांत करण्यासाठी रविवारच्या दिवशी सूर्याला जल अर्पण करायला हवे. तसेच सूर्य चालीसा पठण करायला हवी. यानंतरची राशी आहे मकर राशि. मकर राशीचे स्वामी हे शनी देव आहेत.

अनेकदा बुध व शनी यांचे मार्ग वेगवेगळ्या असल्याने मकर राशीच्या जातकांचे देखील बुद्धीशी निगडित असणारे कार्यांमध्ये अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. जर एखाद्या व्यक्तीच्या ग्रह राशीतील बदलांमुळे देखील अनेक वाद होण्याची शक्यता असते. हे वाद वारंवार घडतात. आपल्या अधिकाऱ्यांनी सांगितलेले काम या लोकांना पटत नाही म्हणूनच भविष्यात यांचे देखील मालकांसोबत भांडण जास्त होते.

अनेकदा हे लोक स्वतःला एकटी समजतात आणि या एकटेपणामुळे एकटा वेळ घालवतात. या मकर राशीच्या घातकाने देखील शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचे आहे असे केल्याने त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल दिसून येतील.

अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *