बुधाचा कर्क प्रवेश, या 6 राशींचे जगणे होणार मुश्किल…

अध्यात्मिक राशिभविष्य

ज्योतिषानुसार येणारे 16 दिवस 6 राशींसाठी लाभदायक असणार आहेत. त्यामुळे त्यांना गुंतवणुकीतून नफा होईल आणि आणखीनही बऱ्याच बाबतीत त्यांना लाभ झालेला पाहायला मिळेल. तर कोणत्या आहेत त्या 6 राशी आणि कोणते आहेत ते 16 दिवस? चला जाणून घेऊ या..

ज्योतिष शास्त्रानुसार, उत्तम बुद्धी आणि क्षमता यांचा कारक मानला गेलेला बुध ग्रह. या बुध ग्रहाने 8 जुलैला कर्क राशीमध्ये प्रवेश केलेला आहे, आता जुलै महिन्याच्या सुरुवातीला शुक्राने सुद्धा सिंह राशीत प्रवेश केला होता. त्यानंतर लगेचच बुध ग्रह कर्क राशीमध्ये विराजमान झालाय.

चंद्राचे स्वामित्व असलेल्या कर्क राशीत प्रवेश महत्त्वाचा मानला जातो. विशेष म्हणजे 24 जुलै रोजी बुध कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे आणि त्यातील काही दिवसांनी सूर्याचा कर्क राशीत प्रवेश होणार आहे. ज्यामुळे बुध आणि सूर्य एकाच राशीत येतील आणि बुधादित्य योग जुळून येईल. बुधाच्या कर्क राशीतील प्रवेशाने करियर आणि आर्थिक परिस्थितीवर चांगलाच प्रभाव पडेल.

आता येणारी 16 दिवस आहेत ते काही राशींसाठी लाभदायक पाहायला मिळतील. त्याना नशिबाची साथ मिळेल आणि करिअरमध्ये त्यांची प्रगती होईल. आणखीनही बऱ्याच चांगल्या घटना त्यांच्या आयुष्यात घडतील. पण काही राशींसाठी हे त्रासदायक सुद्धा करू शकत. त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार, काही राशीसाठी हे गोचर चांगला आहे तर काही राशींसाठी मात्र तापदायक आहे.

1.मेष राशी : मेष राशीच्या व्यक्तींना बुद्धाचा तर्क प्रवेश संमिश्र म्हणावा लागेल. अगदी काही त्यांचा येणारा काळ मानला जाते. काही कारणाने तणाव वाढू शकतो. कौटुंबिक समस्या वाढू शकतात. करियरमध्ये सुद्धा काही छोट्या-मोठ्या कुरबुरी जाणवू शकतात. त्यामुळे थोडीशी निराशा येऊ शकते. त्यामुळे चढ-उताराचा सामना करायला तयार राहा.

2. वृषभ रास: वृषभ राशीच्या व्यक्तींना बुधाचा प्रवेश लाभदायक आहे. त्यांचा उत्साह वाढेल. अनेक सकारात्मक बदल त्यांच्या आयुष्यात घडून येतील. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकेल. परदेशातून नोकरीसाठी कॉल सुद्धा येऊ शकतो. लाभाच्या शुभ संधी त्यांना मिळू शकतील. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कौटुंबिक सदस्यांसोबत त्यांचा वेळ चांगला जाईल. घरात काही शुभ कार्य होऊ शकतात.

3. मिथुन राशी: मिथुन राशीच्या व्यक्तींना सुद्धा संमिश्र म्हणावा लागेल आणि चढ-उतार त्यांना पहावे लागू शकते आणि समस्यांचा सामना करावा लागू शकेल. यासाठी आर्थिक लाभ मिळत राहील. पण त्यासाठी कठोर मेहनत करावी लागेल. पैसा सुद्धा खर्च होऊ शकतो. व्यवसायावर प्रतिकुल प्रभाव पडण्याची शक्यता आहे. कोणाशीही विनाकारण वाद घालण्यात तुम्ही या काळामध्ये टाळा.

4. कर्क राशी: या व्यक्तींसाठी हे 16 दिवस काहीसे संमिश्र ठरतील. स्तरातील कोणतेही काम करायचा असेल तर प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे. काही लोकांची बदली होऊ शकते. आयुष्यात त्यामुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. लाभ मिळण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल व वैयक्तिक जीवनात काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकतात.

5. सिंह राशी : या व्यक्तींना सुद्धा आव्हानांचा सामना करावा लागेल. एकाच वेळी अनेक समस्या उभ्या राहतील. कोणतेही काम पूर्ण करण्यास अडचणी येऊ शकतात. आर्थिक बाबतीत मात्र तुम्हाला सकारात्मक परिणाम बघायला मिळतील आणि त्यामुळे आनंद होईल.

6. कन्या रास: कन्या राशीच्या लोकांना बुधाचा प्रवेश लाभदायक आहे. तसेच या काळात धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच भावंडांच्या मदतीने गरजा पूर्ण होतील. नवीन लोकं भेटतील, जे भविष्यात फायदेशीर ठरतील. नोकरदारांना पदोन्नती मिळू शकेल. करिअरच्या चांगल्या संधी मिळू शकतील. व्यवसायांना फायदा होऊ शकतो. कठोर परिश्रमाने पैसा मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. मित्रांसोबत तुम्ही चांगला वेळ या काळामध्ये घालवाल.

7. तुळ राशी : या लोकांच्या नवीन लोकांच्या गाठीभेटी होतील. मित्र साथ देतील. भागीदारीत व्यवसाय केल्यास त्यांना नफा मिळेल. नशिबाची साथ मिळू शकेल. कुटुंबातील सदस्यांना पाहून मन प्रसन्न होईल. या काळात पैशाचा मात्र तुम्हाला उशारीने वापर करावा लागेल.

8. वृश्चिक रास: वृश्चिक राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये अचानक काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. मुलांसोबतच या नात्यात वाद वाढू शकतात. कोणालाही पैसे देऊ नका. अन्यथा पैसे अडकू शकतात.

9.धनु रास: धनु राशीच्या व्यक्तींना सुद्धा काही समस्या बघायला मिळतील. काही कारणास्तव इच्छा नसताना प्रवास करावा लागतो. या काळात तुम्हाला विनाकारण त्रास होऊ शकतात. विनाकारण खर्च वाढू शकतात.

10. मकर रास : मकर राशीच्या व्यक्तींसाठी मात्र हा काळ सकारात्मक राहील. कामाबद्दल खूप जागरूक राहावे लागेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. नोकरदारांना नवीन संधी मिळतील. पैसे मिळवण्यात यश मिळेल. गुंतवणुकीच्या बाबतीत फायदा होईल. धार्मिक कार्यात रूची वाढेल. व्यापारी पैसा मिळवण्यात यशस्वी होतील..

11. कुंभ रास: कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ आर्थिक लाभाचा म्हणावं लागेल. काही छोट्या गोष्टी सोडल्या तर सर्व काही चांगला होईल. व्यावसायिक आघाडीवर सकारात्मक प्रभाव पडू शकते. दुसरीकडे विरोधकांना मात्र कडवी झुंज द्यावी लागू शकते.

12. मीन राशी: या व्यक्तींना बुधाचा कर्क प्रवेश शुभ म्हणावं लागेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचा कौतुक होईल. करिअर बद्दल समाधानी राहू शकाल. इच्छा पूर्ण होतील. नोकरदारांचे कामासाठी काही सहकाऱ्यांशी चांगले संबंध करावे. काम वेळेवर पूर्ण करू शकाल. मित्रांसोबत कुठे याचा विचार करू शकता. कठोर परिश्रमाच्या जोरावर यश प्राप्त होईल आणि जीवनामध्ये यश मिळेल..

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *