चांगल्या कर्माचे फळ कधीही मिळु शकते…

अध्यात्मिक माहिती

आपण आपल्या जीवनात जे काही आहोत ते आपल्या कर्मामुळे आहोत.त्यामुळे, आपण जर योग्य मेहनत घेतल्यास,भविष्य उज्वल होईल तर, आळस करत राहिलो तर वाटेला अपयश येईल, चांगले कर्म केले तर फळही चांगलेच मिळणार, आणि कर्म वाईट केलेत तर फळ सुध्दा त्याचप्रमाणे मिळणार.

त्यामुळे फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहील पाहिजे. कधीकधी आपण एखादे चांगले कर्म केल्यानंतर विसरुनही जातो,आणि अचानक पणे काही वर्षानंतर त्या कर्माचे फळ प्राप्त होते.त्यामुळे या कथेद्वारे आपल्याला समजण्यास मदत होईल ,की जीवनात कधीनाकधी कर्माचे फळ मिळत असते.

एक छोट्याशा गावात एक म्हातारी आणि तिची मुलगी राहत होत्या.एके त्यांच्याकडे एक अगरबत्ती विकणांना मुलगा आला ,तो मुलगा घरी जाऊन अगरबत्ती विकत असे.मे महिना असल्याने खूप उष्णता वाढली होती.तो मुलगा दुपारी आला होता आणि त्याने त्यांना अगरबत्ती घेण्यासाठी विनंती केली.त्यावर त्या आजींनी पुरेसे पैसे नसल्याने अगरबत्ती घेऊ शकत नाही,असे सांगितले.

मग त्या मुलाने एक ग्लास पाणी मागितले. त्यामुळे म्हातारीने त्या मुलाला आत बोलावून, त्याची विचारपूस केली आणि पाणी प्यायला दिले. त्यावर तो मुलगा म्हणाला की,तो खूप गरीब असल्याने अगरबत्ती विकून काही दोन-चारशे रुपये मिळवून आपले घर चालवत असतो. कारण त्याची आई सतत आजारी असते, वडील नसल्याने हे काम त्या मुलाला करावे लागते.

तो मुलगा खूप थकलेला दिसल्यामुळे आजींनी त्याला खायला दिले, त्यावेळी त्या मुलाने सांगितले नको,” जर मी इथे काही खात बसलो, तर अगरबत्ती विकणार नाही आणि पुन्हा उपाशी ठेवावे लागेल” त्या वेळी त्या आजीने एक ग्लास दूध देऊन त्याच्याकडून एक अगरबत्तिचा पुडा खरेदी केला.

त्यावेळी तो मुलगा पुन्हा तेथुन निघून गेला कारण त्याला दिवसभर अगरबत्ती विकून, त्यानंतर रात्री अभ्यासही करावा लागतो. त्यावेळी आजी आणि मुलगी दोन्हीही मोलमजुरी करून आपले जीवन पुढे ढकलत होत्या.त्यामध्ये एकदा अचानक आजीच्या छातीत दुखू लागले. तेव्हा त्या मुलीने घाईघाईने आईला दवाखान्यात नेवून ऍडमिट केले.

लगेच आजीच्या विविध टेस्ट करून तिचे ऑपरेशन करावे लागले. हृदयविकाराचा झटका आला होता त्याचं सुखरूपपणे बाहेर पडले परंतु, ज्यावेळी दवाखानाचे बिल हे 12 लाख झाले होते. त्यावर इतकी मोठी रक्कम बगताच त्या दोघेही घाबरल्या,कारण त्या राहात असलेले घर भाड्याने घेतलेले होते.

त्यामुळे त्यांनी डॉक्टरांची भेट घेतली आणि त्याना सांगितले की, इतके बिल होणार आहे, याची पूर्णकल्पना आम्हाला आधीच सांगायला पाहिजे होते. कारण आमच्याकडे इतके पैसे नाहीत. तसेच आयुष्यभर तरी आम्ही तुमच्याकडे कामाला राहिलो तरी सुद्धा आम्ही तुमचे हे 12 लाखांचे बिल देऊ शकत नाही, असे या आजींनी सांगितले.

त्यावर डॉक्टरांनी सांगितले की,तुमचे हे 12 लाखाचे बिल अधिक भरलेलं आहे.त्यावर त्या दोघी आवाक झाल्या, तेव्हा त्या दवाखान्याचे सर्वात मोठे डॉक्टर पुढे आले आणि त्यांनी त्या आजींना नमस्कार करून “आई ओळखलस का मला”असे म्हणाले. त्यावर आई आणि मुलगी दोघेही त्या डॉक्टरांकडे बघतच राहिल्या तो डॉक्टर दुसरा-तिसरा कोणी नसून अगरबत्ती विकणार यो गरीब मुलगा होता.

त्यावर ते डॉक्टरांनी सांगितले की, तुम्ही दवाखान्यात आणले तेव्हाच मी तुम्हाला ओळखले होते, त्यादिवशी मी संकटात होतो अडचणीत होतो, उपाशी होतो त्यावेळी तुम्ही मला केली म्हणून 10 वर्षांपूर्वीच्या त्या मदतीची परतफेड म्हणून, मी आज तुझे संपूर्ण बिल एक ग्लास दुधात फेडून टाकले.हा प्रसंग पासून आजी आणि मुलीच्या डोळ्यात पाणी आले आणि त्यावर त्याने सांगितले की, ताई हा माझा दवाखाना आहे. कधीही जर तुला किंवा आईला कसला आहे मदत लागल्या बिनधास्त दवाखान्यात जायचे.

अशाप्रकारे आपण केलेल्या आपल्या चांगल्या कर्माचे फळ अचानकपणे आपल्याला मिळते. हे कधी ना कधी नक्कीच मिळत असते. त्यामुळे सतत दुसऱ्याचा चांगला विचार करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *