चातुर्मासात या वस्तूचे दान करा, पुण्य मिळेल…

अध्यात्मिक माहिती

चातुर्मास म्हणजे काय किंवा चातुर्मासाच्या काळात भगवान श्रीहरी विष्णू निद्रा अवस्थेत का जातात, या संदर्भातील संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. तसेच चातुर्मासात कोणत्या प्रमुख वस्तूंचा दान केल्यास तुम्ही भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न करू शकता? शिवाय यामुळे देवी लक्ष्मीला सुद्धा प्रसन्न केलं जाऊ शकतं.

कारण हिंदू धर्मात दानाला विशेष महत्त्व आहे. विशेषतः कोणत्याही विशेष प्रसंगी वस्तूंचे दान करणं अधिक शुभ मानले जातात. चातुर्मासात सुद्धा दान करण्याची परंपरा आहे. या काळात काही विशेष प्रकारचा दान दिले जात. चला तर मग कोणत्या विशेष प्रकारचे दान आपण चातुर्मासात केल्याने आई लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया…

पौराणिक कथेनुसार चातुर्मास महिन्याच्या श्रीहरी विष्णू विश्व चालवण्याचा सर्व कार्य भगवान महादेवावर सोपवून योग निद्रेमध्ये जातात, असे म्हणतात. असंही म्हणतात की, चातुर्मासाच्या काळात सकाळी लवकर उठल्यानंतर श्रीहरी विष्णू सहस्त्रनाम स्त्रोत आता नियमित जप करावा.

रोज सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान श्रीहरी विष्णूची पूजा करावी. चातुर्मासात पूजा आणि धार्मिक कार्या केल्यास विविध फल प्राप्त होतात असंही सांगितलं जातं. शिवाय ज्योतिष शास्त्रानुसार दान केल्याने व्यक्तीला पापापासून मुक्ती मिळते आणि देवाच्या कृपेनं जीवनात सुख- शांती आणि समृद्धी प्राप्त होते. या काळात सुख-समृद्धीसाठी भगवान श्रीविष्णूची उपासना करावी.

गरीब आणि गरजू लोकांना विविध वस्तूंचे दान करावं. याबरोबरच गरीबांना अन्नदान केल्यास किंवा त्यांना भोजन दिल्यास शुभ फळ प्राप्त होतं, असं म्हणतात. नोकरी आणि व्यवसाय अडचण येत असेल तर चातुर्मासात छत्री, कपडे, अन्न आणि कापरचे दान करावं यामुळे भगवान महादेव सुद्धा प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. यामुळे व्यक्तीची व्यवसायात वाढ होऊ लागते, अशी मान्यता आहे.

शिवाय चातुर्मासात विशेष वस्तूंचे दान करणं अधिक शुभ मानलं जातं. शिवाय चातुर्मासात प्रामुख्यानं विशेष प्रकारचे दान द्यावं असं म्हणतात. चातुर्मासात पशु आणि पक्षी, गरीब व्यक्तींना, गरजूंना अन्नदान करावे. या काळात गरीब आणि गरजूंना कपडे सुद्धा दान करावे. तसेच मंदिरात दिवा लावावा किंवा स्वच्छ आणि वाहत्या पाण्याच्या जळता दिवा सोडवा. तसेच मंदिरात सेवा करावी.

यासोबतच चातुर्मासात एका भांड्यात तेल टाकून त्यात तुमचा चेहरा पाहावा आणि नंतर ते ते गरिबांना दान करावं, असं सांगितलं जातं. याचबरोबर, काही मंत्राचा जप तुम्ही चातुर्मासाच्या काळात करावा, असे म्हणतात. चातुर्मासात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णूये नम:, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवाय, याबरोबरच विष्णुसहस्त्रनाम आचा एक माळ जप केला तरी अनंत फळ प्राप्त होतं, असं सांगितलं जातं.

तर चातुर्मासात कोणत्या विशिष्ट प्रकारच दान तुम्ही करता आणि त्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा…

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *