चांगली वेळ येण्या आधी देव देत असतात हे ७ संकेत

अध्यात्मिक माहिती

१) जर ब्रह्म मुहूर्तावर म्हणजेच पहाटे ४.२४ ते ५.१२ या वेळेत तुमचे डोळे उघडले आणि तुम्हाला देवाचे स्मरण झाले किंवा कोणीतरी तुम्हाला एखाद्या दिशेने घेऊन जात आहे असा भास वाटला. असे झाल्यास तुमच्यासाठी यशाची नवे दरवाजे उघडणार आहेत हे समजून घ्यावे. ज्यात देव स्वतः तुम्हाला साथ देईल.

२) जर तुम्हाला वाटत असेल की कधी कधी तुमचे मन विनाकारण आनंदी राहते, तुमचा चेहरा फुललेला आणि हास्याने भरलेला असतो, तुम्ही रागाच्या पलीकडे असता हे चिन्ह तुम्हाला दाखवते की आनंद तुमच्या आयुष्यात दार थोठावणार आहे. जेणेकरून तुम्ही नेहमी आनंदी राहाल.

३) तुमच्या घराच्या दारात एखादी गाय वारंवार काही खायला येत असेल, तुमच्या घरात मांजर बाळांना जन्म देत असेल, एखादे माकड तुमच्या घरातील अन्नपदार्थ घेऊन जाते किंवा पक्षी तुमच्या अंगणात तळ ठोकून किलबिलाट करतात अशी ही काही शुभचिन्हे सूचित करतात की तुमचा येणारा काळ तुम्हाला बलवान बनवणार आहे. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आयुष्यातील योग्य स्थानावर पोहोचणार आहात. यशाचे शिखर लवकरच गाठणार आहात.

४) देव स्वतः लहान मुलांमध्ये वास करतो. जर एखादी लहान मुलगी किंवा मूल तुमच्याकडे वारंवार हसत असेल किंवा तुमच्या घरी आले असेल किंवा तुमच्या अंगणात आनंदाने खेळत असेल तर ते तुमच्यासाठी खूप शुभ लक्षन मानले जाते. अशी चिन्हे सुचित करतात की तुमचे जीवन हसत आणि नवीन आनंदाने भरले जाणार आहे आणि तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन नाती जोडली जाणार आहे.

५) अनेक दिवसापासून चालत आलेले तुमचे खर्च अचानक तोडतात आणि पैशाचे नवीन स्त्रोत उघडू लागतात. मग या लक्षणांवरून समजून घ्या की तुमचा वाईट काळ संपणार आहे आणि पैसा आता तुमच्या घरात नक्कीच राहील. माता लक्ष्मीचा वास होणार आहे.

६) पूजेच्या ताटात पडलेल्या फुलांची माळ किंवा चंदन तसेच देवाची मूर्ती तुमच्याकडे पाहून हसत असल्याचा भास होणे, घरात प्रिय पाहुण्यांचा आगमन, घरात सोन चांदी किंवा स्त्रियांच्या डाव्या आणि पुरुषांच्या उजव्या अंगाला मुरगळणं अतिशय शुभ मानले जाते.

७) सकाळी जर तुम्ही एखाद्या शुभकार्यासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना तुम्हाला गोमातेचे दर्शन झाले म्हणजेच गाय दिसली किंवा तुम्हाला ऋषी संत महाराज किंवा पुजारी यांचा आशीर्वाद मिळाला तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ तुम्ही ठरवलेले काम नक्कीच यशस्वी होईल. मग ती मुलाखत असेल किंवा नवीन संपत्ती खरेदी असेल किंवा एखादी केस जिंकणं असेल जे काही असेल ते शुभ विनाअडथळा पार पडेल हे नक्कीच.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *