दररोजच्या कामामध्ये करा ‘हे’बदल अनुभव येतील

अध्यात्म माहिती

मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये घराच्या शांतीसाठी आणि उपाय सांगितले आहेत त्यापैकी आपण काही उपाय करत देखील असतो तरीही जर घरामध्ये शांती सुख मिळत नसेल घरामध्ये जर वारंवार तंटे होत असतील.

एकमेकांसोबत पटत नसेल तर त्याबद्दलची आपण काही उपाय व त्यांचे तोडगे आपण आज जाणून घेणार आहोत दररोजच्या कामांमध्ये काही बदल तुम्हाला त्यासाठी करावे लागणार आहेत तर ते कोणते बदल आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया

मित्रांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे की आपण जेव्हा घरातील किराणा भरतो तो आपण शुक्रवारच्या दिवशी भरायचा आहे शुक्रवार हा श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस आहे. कारण लक्ष्मी माता तेव्हा आपल्यावर लवकर प्रसन्न होते.

शुक्रवारी बाजार भरल्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी भरभराटी राहते .त्याच्यानंतर आपण नेहमी नामस्मरण करायला पाहिजे त्याच्यामुळे आपलं मन नेहमी शांत राहतं आपली कामे देखील लवकर आवरतात जर तुमच्या घरामध्ये झाडे असतील.

तर झाडांना नियमितपणे पाणी घालायचे आहे झाडे सुकली तर घरामध्ये नकारात्मक शक्ती येते म्हणून त्याला नेहमीप्रमाणे पाणी द्यायचं आहे .आपण दररोज सकाळी व संध्याकाळी देवाजवळ दिवा लावत असतो तर तो आपण एका वातीचा लावत असतो.

तस न करता आपल्याला दोन वाती एकत्र करून दिवा लावायचा आहे. देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावे. त्यानंतर आपल्याला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे यामुळे आपले मन नेहमी शांत राहणार आहे.

गायत्री मंत्राचा जप रस्त्यामध्ये किंवा येता जाता कधीही करू नये. गायत्री मंत्राचा जप तुम्हाला ज्यावेळी तुम्ही शांत असतात त्यावेळेसच करायचा आहे घराच्या दक्षिण किंवा वायव्य दिशेला कचऱ्याचा डबा ठेवायचा आहे.

महिन्यातून एकदा तरी पाण्यामध्ये कापूर टाकून उकळायचे आहे आणि आपले घर किंवा व्यवसाय च्या ठिकाणी ते पाणी टाकून आपल्याला पुसून घ्यायच आहे.त्याच्यामुळे सर्व नकारात्मक गोष्टी निघून जातात आणि पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात .

एकादशीचे व्रत नेहमी करायचे आहे जर तुम्हाला एकादशी करणे जमत नसेल तर त्या दिवशी तुम्हाला भात खायचा नाही घराच्या मुख्य दरवाजाच्या डावीकडे नित्यनियमाने तुम्हाला दिवा लावायचा आहे घरामध्ये बंद पडलेल घड्याळ लवकरच दुरुस्त करून घ्यायचे आहे .

अंगणामध्ये तुळसी असणे खूप गरजेचे आहे आणि तुळशीची तुम्हाला योग्य प्रकारे अशी काळजी देखील घ्यायची आहे आणि जर सूकली तर लगेच काढून टाकायचे आहे त्या जागी नवीन तुळस लावायची आहे घरातील फरशीचा कलर हा कधीही काळा होऊ देऊ नये.

बाहेर जाताना नेहमी देवाचे दर्शन घेऊनच बाहेर पडायचे आहे देवांना आपल्या सोबत चला अशी प्रार्थना देखील आपल्याला करायचे आहे.स्वयंपाक करताना दक्षिणेला तोंड करून कधीही स्वयंपाक करू नये घरामध्ये सकाळी व संध्याकाळी धूप अगरबत्ती दिवा लावायचा आहे.

रोज सकाळी आंघोळ करून झाल्यानंतर सूर्याला जल अर्पण करायचे आहे असे केल्याने मन शांत राहते मनामध्ये काही वाईट विचार असतील तर ते विचार देखील निघून जातात त्याचबरोबर कामात मन देखील रमतं जर तुम्हाला शक्य झालं तर दिवसा घरामध्ये कधीही झोपू नये.

त्याचबरोबर घरामध्ये फरशी पुसताना गोमूत्र आणि हळद वापरणे खूप गरजेचे आहे आणि बाथरूम मध्ये तुम्हाला एक वाटी तुरटी मीठ कापूर ठेवायचा आहे आणि आठवड्यातून एकदा हे बदलायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे काही सोपे उपाय आहे.

ते तुम्हाला आवश्यक करायच आहे याच्यामुळे तुम्हाला तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे व तुमचे घराचे वातावरण देखील नेहमी चांगले राहणार आहे .

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *