दर अमावस्येला आईने आपल्या मुलांसाठी हे करावे

अध्यात्मिक

मुलांवरील संकटे दूर होतील

आईने आपल्या मुलांसाठी करावा हा चमत्कारी तोडगा आपल्या मुलांवरील संकटे, समस्या, अडचणी दूर होतील. मित्रांनो आईने केलेले प्रत्येक कार्य प्रत्येक उपाय आपल्या मुलांसाठी लाभदायक असतो आणि तसं तर महिला हे घराची लक्ष्मी असते तिने केलेले प्रत्येक कार्य त्या घरासाठी शुभदायक आणि फलदायक असते. तुमचे मुलं कितीही लहान किंवा कितीही मोठे असू द्या तुम्ही हा उपाय हा तोडगा करू शकता.

यासाठी तुम्हाला काहीही करण्याची गरज नाहीये. फक्त तुम्हाला एका गोष्टीची गरज लागणार आहे. आई ने अमावस्येच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. प्रत्येक अमावास्येला हा उपाय करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलाला किंवा मुलीला देवघरात किंवा हॉलमध्ये एका ठिकाणी बसवायचा आहे. एका वाटीत भात घेऊन तो भात तुम्हाला तुमच्या मुलावरून मुलीवरून तीन वेळेस ओवाळून घ्यायचा आहे. आरती करतो तसा ओवळायचा आहे.

मग तो भात आपल्या छतावर किंवा बाहेर कुठेही पक्षांसाठी प्राण्यांसाठी तो भात टाकायचा आहे. अमावस्येच्या दिवशी जर आपण भात ओवाळून टाकला तर आपल्या मुलांवर मुलींवर आलेली नजर, संकट, अडचण त्या भातासोबत बाहेर निघून जाईल. मुलांना सुख समृद्धी लाभेल. तुम्हाला या भातामध्ये तेल मीठ काहीच टाकायचे नाही.

फक्त पाणी आणि तांदूळ एक वाटी भात पाहिजे. हा उपाय तुम्ही दिवसा करायचा आहे. संध्याकाळी रात्री नाही फक्त दिवसा. असं समजून घ्या की संध्याकाळच्या पाच वाजायच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर नक्की हा उपाय करा. ज्याने नक्की लाभ होतो आणि मुलांवर आलेली संकटे दूर होतात.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *