देवाची आरती करताना दिवा तेलाचा लावावा की तूपाचा ? नक्की जाणून घ्या

अध्यात्मिक

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असते. प्रत्येक जण हा आपल्या देवघरामधील देवांची पूजा व्रत करीत असतात. सकाळ-संध्याकाळ ते आरती देखील करीत असतात. आपल्या घरामधील सर्व अडचणी दूर व्हाव्यात, संकटे दूर व्हावेत अशी देवांकडे ते प्रार्थना देखील करीत असतात.

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये देवपूजेला खूपच अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त आहे. तर मित्रांनो बऱ्याच जणांना आपल्या देवतांची आरती करीत असताना दिवा तेलाचा लावावा की तुपाचा लावावा असे प्रश्न पडलेले असतात. तर मित्रांनो तुम्हाला आज मी याविषयीची सविस्तर माहिती सांगणार आहे.

तर मित्रांनो तुपाच्या दिव्याचे आणि तेलाच्या दिव्याचे दोन्हींचे महत्त्व हे वेगवेगळे असते. तुपाचा दिवा हा सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. त्यामुळे मग आरती करताना शुद्ध तुपाच्या दिव्यानेच करणे शुभ मानले गेलेले आहे. पंरतु संध्याकाळी देवाजवळ दिवा लावताना तेलाचा दिवा लावावा. कारण तेलाचा दिवा नकारात्मक उर्जा नष्ट करतो.

अर्थात आपल्याला दोन्ही गोष्टींची गरज असते. मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार आपण सकाळी सगळ्या कामांची सुरुवात करीत असतो आणि त्यामुळे आपणाला सकारात्मक ऊर्जेची गरज असते. म्हणून देवपूजा करताना हा शुद्ध तुपाचा दिवा लावणे खूपच शुभ असते.

परंतु मित्रांनो जर तुम्ही चांदीच्या निरंजनात चांगल्या तुपाची वात लावली तर हे खूपच अति उत्तम मानले जाते आणि याचे परिणाम देखील खूपच चांगले शुभ होतात. तसेच मित्रांनो, रात्रीच्या वातावरणात नकारात्मक उर्जेचा प्रभाव जास्त असतो. तो कमी करायचा असल्यास तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.

आपण तुळशीजवळ जो दिवा लावतो तो तिळाच्या तेलाचा लावल्यास घरात नकारात्मक उर्जा प्रवेश करीत नाही. तसेच मित्रांनो तेलाचा आणि तुपाचा दिवा हा वेगवेगळा असावा. ज्यांना या गोष्टी करणे शक्य आहे त्यांनी नक्कीच कराव्यात. कारण त्याचे शुभ परिणाम होतात आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी कुठल्याही तेलाचा दिवा लावला तरी चालेल. पण सकाळी व संध्याकाळी दिवा हा अवश्य लावा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *