देवघरामध्ये ही एक मूर्ती ठेवली तर कधीच धन धान्याची कमी राहणार नाही भरपूर पैसा घरात येईल.

अध्यात्म माहिती

मित्रांनो आपण जर आपल्या घरामध्ये देवघरात ही एक मूर्ती ठेवली आणि दररोज सकाळ संध्याकाळ या मूर्तीचे आपण पूजा अर्चना केली, प्रार्थना केली, नैवेद्य दाखवला तर आपल्या घरात कधीही कोणत्या गोष्टीची कमी राहत नाही. सर्व काही गोष्टी आपल्या घरात भरून असतात. सर्व गोष्टींची भरभराट असते. सुख समृद्धी असते. धनधान्य कधीच संपत नाही.

नेहमी बरकत राहते. मित्रांनो आपल्या देवघरांमध्ये आपण बऱ्याच देवतांच्या मूर्ती ठेवत असतो. लक्ष्मीची मूर्ती सुख, समृद्धी, पैशासाठी, धनासाठी असते. गणपतीची मूर्ती आपली विघ्न दूर करण्यासाठी, आपल्याला चांगली बुद्धी, शिक्षणात प्रगती व्हावी यासाठी असते.

परंतु आपण बऱ्याचश्या घरामध्ये बघितला आहे की आज मी ज्या मूर्ती बद्दल सांगणार आहे ती मूर्ती कोणाचाही घरात नसते. बऱ्याचशा लोकांनी आता ठेवलेली आहे. पण बऱ्याचशा लोकांना माहीतच नसते की आपल्या घरात ही मूर्ती असायला पाहिजे आणि दररोज त्या मूर्तीचे पूजन आपण करायला पाहिजे.

आता ही मूर्ती कोणती तर ही मूर्ती अन्नपूर्णा मातेची आहे. जी ताब्याची पितळाची चांदीची अशी कोणत्याही धातूची मूर्ती तुमच्या इच्छेनुसार घेऊ शकता. त्यासोबत तुम्हाला एक छोटीशी वाटी घ्यायची आहे. कधी कधी मूर्ती घेताना त्यासोबत ती वाटी येते किंवा नसेल आली तर ती मूर्ती बसेल एवढी तुम्ही छोटीशी पितळेची, तांब्याची वाटी घेऊ शकता किंवा स्टीलची घेऊ शकता.

त्या वाटीमध्ये पूर्ण भरून तांदूळ घ्यायचे. आपल्या घरात जे असतील ते तांदूळ तुम्ही घ्यायचे आणि त्या तांदुळावर मातेची मूर्ती आपल्याला उभी करून ठेवायची आहे. इतर देवताप्रमाणे ती मूर्ती ठेवायची नसते. त्या वाटीमध्ये तांदूळ घ्या आणि ती वाटी देवघरात ठेवा. आता त्या वाटीमध्ये तांदळावर मूर्ती उभी करा.

दर मंगळवारी किंवा दर पौर्णिमाला ते तांदूळ बदलायचे. जे आधीचे तांदूळ असतात ते तुम्ही तुमच्या तांदळामध्ये मिश्रित करू शकता किंवा पक्ष्यांना खायला घालू शकता. दररोज मूर्तीला स्नान घालायचे, अभिषेक करायचे, पूजा अर्चना करू शकता. परंतु अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरात अवश्य ठेवा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *