देवघरात चुकूनही करु नका या 4 चुका, होईल अनर्थ!!

अध्यात्मिक वास्तुशास्त्र

घरातल्या देवघरात कोणत्या गोष्टी चुकूनही करू नये? आणि घरातल्या देवघरात कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात? काय सांगता वास्तुशास्त्र चला हे सगळं जाणून घेऊया.. घरात देवघर कसा असावा याच्यापेक्षा आधी हे जाणून घ्या की, घरातल्या देवघर कुठे असावे? देवघर जर पूर्व दिशेला असेल तर ते तुम्हाला ऐश्वर्य आणि प्रतिष्ठा देईल.

घरातला देवघर जर उत्तर दिशेला असेल तर तुम्हाला सर्व सुखांचा लाभ होईल. पण दक्षिण दिशेला असलेल्या देवघर शत्रुपीडा मात्र घेऊन येईल. पश्चिम दिशेला असलेला देवघर आजारपणात येतो. नैऋत्य दिशेला देवघर असेल तर नकारात्मक गोष्टींचा त्रास होतो. वास्तूच्या अग्नेय दिशेला देवघर असेल तर होम-हवनाशिवाय इतर प्रकारची कुठलीही साधना उपासना निष्फळ ठरते.

देवघरातील देव एकमेकांकडे पहात आहेत असे मांडू नये. देवार्यात किंवा पैसे लपवून ठेवू नये. कमीतकमी देव मूर्ती आणि फोटो असावेत. कुलदैवतांचे टाक, एखादा फोटो तरी हवाच. तुमची इष्टदैवत, त्याबरोबर छोटा बाळकृष्‍ण आणि महादेव छोटीशी पिंड हे हवेच आणि सगळ्यात महत्वाचं गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती तरी हवीच. त्याच बरोबर वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे चालतील. मात्र ती जमिनीशी समांतर मांडावी.

एकाच देवाच्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त मूर्ती असू नये त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाही. त्या देवतेची मूर्ती आणि तस्वीर चालेल. देवी दोन पेक्षा जास्त नको. देव्हाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती किंवा फोटो ठेवू नये, त्यामुळे घरचे वातावरण स्मशानवत स्वरूपात मानले जाते. संसारी माणसाने मारुती देवार्यात पुजु नये, कारण त्यामुळे कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता असते.

घरात कुठेही मारुतीचा फोटो असावा चालेल. देवघरात काल भैरवाची पूजा देखील करू नये, कारण ते यम असून ते उग्र आणि कडक आहेत. देवघरात जुने देवीचे फोटो नसावेत, कारण त्यामुळे कुलदेवीचे कृपाछत्र कुटुंबावर त्यामुळे घरांत राहत नाही. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, देवघरातील पूजेच्या मूर्ती 3 इंचापेक्षा जास्त मोठे असून नये, त्याच्या असतील तर त्या विसर्जित करायला पाहिजे. देवघर नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवावे, कारण देव घरावर नजर जाताच आपलं मन प्रसन्न झाले पाहिजे आणि घरात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला प्रसन्न वाटलं पाहिजे..

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *