देव्हाऱ्यात पाण्याने भरलेल्या कलशाची स्थापना का करावी ? असं केल्याने काय घडते नक्की जाणून घ्या!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण-समारंभ साजरा करताना काही प्रतिकांचे महत्त्व जपलेले दिसून येते. मंगल कलश देखील कोणत्याही शुभप्रसंगी ,विवाह, पूजा,उत्सवाप्रसंगी स्थापन करून संस्कृतीचे, सुख-समृद्धीचे प्रतिक म्हणून ओळखला जातो तर काही ठिकाणी घराघरांमध्ये नित्यनेमाने पूजला जातो.

देव आणि दानवांनी समुद्रमंथन करण्यामागचा हेतू असा होती की या मंथनातून अमृत निघावं. पण हे अमृत कोणत्या भांड्यात भरायचं आणि ते भांडं कसं तयार करायचं असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा विश्वकर्मा या महान कलाकारावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. त्या विश्वकर्माने सर्व देवांमध्ये असलेल्या कलेचं ग्रहण करून एक भांडं तयार केलं. त्यालाच ‘कलश’ म्हणतात.

सृष्टी ज्यांच्या बळावर चालते, ते ब्रह्म, विष्णू आणि महेश ही त्रिगुणात्मक शक्ती आहे. हे सारे ब्रह्मांड या कलशात असते. हा कलश म्हणजे पंचतत्वापासून तयार झालेला एक घट आहे आणि मानवी शरीरही पंचतत्वांनी बनलेले आहे. या दोन घटांचे तादात्म्य साधण्यासाठीचे एक साधन आहे.

हिंदू धर्मातील अनेक प्रथा, परंपरांचा विज्ञानाशी फार जवळचा संबंध आहे. कारण तांबे हा धातू उत्तम विद्युतसुवाहक धातू आहे. तांब्याच्या कलशाच्या माध्यमातून विद्युत चुंबकीय ऊर्जा वाहून नेली जाते. त्या कलशावर असलेल्या नारळाची एक बाजू कलशातील पाण्यात असते आणि शेंडी कडील भाग ब्रह्मांडातील ऊर्जा स्वीकारतो त्या उर्जेपासून एक मंडल तयार होते

आणि ही सकारात्मक उर्जा मूलभूत तत्त्वाला जागृत करते. अशा प्रकारे ब्रह्मांडातील ऊर्जा कलशाच्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचते. पौराणिक कथेनुसार कलश पात्राची निर्मिती कशी झाली -समुद्र मंथनाची कथा प्रसिद्ध आहे. देव आणि दानवांनी समुद्रमंथनातून अमृत प्राप्ती व्हावी यासाठी केले पण हे मिळवलेले अमृत कोणत्या भांड्यात भरायचं आणि ते मग तो कलश माती, सोने, चांदी,तांबे या पैकी कशाचाही असो त्याचे महत्त्व तेवढेच असते

कारण देवांनी अमृत भरण्यासाठी तयार केलेले कलशकलशात असलेले पाणी म्हणजे जीवन. जलाने भरलेला कलश हा वरुण देव आणि पवित्र गंगाचे रूप समजून त्याची पूजा केली जाते. कलशावर असलेली पाने कलशा वर आंब्याची किंवा नागवेलीची पाने असतात .या पानांचेही धार्मिक दृष्टीने फार महत्त्व तर आहेच पण ती हिरवी पाने निसर्गाचे,चैतन्याचे,सुबत्तेचे प्रतिक आहे.

कलशावर असलेला नारळ -कलशावर ठेवलेला नारळ हा मंदार पर्वताचे प्रतिक आहे. तसेच नारळात पंचतत्व असतात. पृथ्वी, आप, तेज , वायू आणि आकाश ही पाचही तत्व नारळात आहेत म्हणून त्याला श्रीफळ म्हटले जाते. घरातील मंगलकार्यात गणरायाबरोबर कलश पूजाही केली जाते. कलशावर श्रीफळ अर्थात नारळ ठेवताना शेंडीचा भाग वर करावा. नारळाला पाणी लागेल इतके पाणी कलशात घालावे.

एक नाणे टाकावे, नारळाच्या कडेने आंब्याची, किंवा विड्याची पाने लावावीत, ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढलेल्या कलशाची स्थापना केल्यावर त्यामध्ये जल घालून सोनं, माणिकमोती, पाचू, प्रवाळ, पुष्कराज ही पंचरत्नं घालतात. दुर्वा, आम्रपल्लवी, नागवेलीची पानं यांच्या पंचपत्रीने त्यांचं मुख सुशोभित करतात.

गणपतींच पूजन, दारावर अंबा क्षेत्रपाल, उंबरठ्यात वास्तू, दाराच्या उजव्या बाजूला गंगा नदी, डाव्या बाजूला यमुना नदी आदी पूजा कराव्यात. यजमानांनी देवपूजा साहित्य घेऊन यजमान पत्नींनी जलपूर्ण कलश घेऊन पुरुषांनी उजवा पाय आणि महिलांनी डावा पाय टाकून मंगलवाद्यं व वेदमंत्रांच्या निनादात गृहप्रवेश करावा.

या मंगलकलशावर श्रीफल किंवा धान्याने भरलेलं पूर्णपात्र ठेवतात. दर पौर्णिमा,अमावस्येला या कलशातील पाणी बदलावे.अशा प्रकारे सुख-समृद्धी, वैभव आणि मांगल्ल्याचे प्रतिक आपल्या प्रत्येकाच्या घरात असावे. कलशाच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या देवता येऊन थांबत असतात, असं कालिकापुराणात म्हटलं आहे.

कलशाच्या मुखाच्या जागी ब्रह्मा, गळ्याच्या जागी शंकर, मूलगामी विष्णू, मध्यभागी मातृकागण आणि दाही दिशांना वेष्टून दिक्पाल निवास करतात. कलशाच्या पोटात सप्तसागर, सप्तदीप, ग्रह-नक्षत्रं, कुलपर्वत, गंगा, सरिता आणि चार वेद असतात, असं समजून त्याचं चिंतन करावं.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *