देवळात प्रसाद म्हणून मिळालेला नारळ आपण जेवणात वापरला तर चालतो का?

अध्यात्मिक वायरल

मित्रांनो, आपण आपल्या धार्मिक पूजेमध्ये तसेच अनेक शुभकार्यात नारळाचा वापर करतो. नारळाला आपल्या हिंदू धर्मांमध्ये खूपच महत्त्वाचे स्थान दिले गेलेले आहे. कोणतेही शुभकार्य हे नारळाशिवाय अपूर्ण मानले जाते. आपण एखाद्या व्रत, पूजा किंवा शुभकार्य करत असतो त्यावेळेस नारळ फोडणे ही परंपरा आहे.

म्हणजेच नारळ फोडल्यानंतर आपली विधिवत पूजा पूर्ण झाल्यासारखे मानतात. त्यामुळे नारळाला आपल्या पुराणांमध्ये देखील महत्त्वाचे स्थान दिले गेलेले आहे.आपण फोडलेला नारळ त्याचे खोबरे आपण सगळ्यांना प्रसाद म्हणून देखील देत असतो आणि हा प्रसाद सर्वांना देणे असे शास्त्रात सांगितलेलं आहे.

तर मित्रांनो या नारळामध्ये साखर आणि गूळ मिक्स करून आपण प्रसाद म्हणून वाटतो. साखर आणि गूळ मिक्स केल्यानंतर नारळातील सात्विकता वाढते.म्हणून कधीही आपण नारळाचा प्रसाद वाढताना त्यात गोड पदार्थ मिक्स करावे. जेणेकरून नारळाची सात्विकता वाढली जाईल. तर मित्रांनो आपण या नारळाचा वापर अनेक पदार्थांमध्ये देखील करतो.

यामुळे आपल्या केलेल्या जेवणाला विशिष्ट अशी चव देखील प्राप्त होते आणि प्रकारच्या भाज्या, चटणी तसेच तामसी पदार्थात आपण नारळ वापरतोच. मित्रांनो आपण अनेक पूजा करीत असतो. अनेक देवी देवतांच्या दर्शनासाठी आपण मंदिरात जातो. तिथे देखील आपणाला एखादा पूजेचा नारळ देखील दिला जातो. मग तो नारळ आपल्याला मिळाल्यानंतर त्या नारळाचे नेमके काय करावे? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

अनेक जण हा नारळ फोडून अनेक पदार्थांमध्ये त्याचा वापर करतात. परंतु मित्रांनो तुम्ही हा नारळ आपल्या भाजीमध्ये, चटणीत अजिबात घालायचा नाही. कारण हा जो नारळ आहे हा नारळ आपणाला प्रसादा स्वरूप मिळालेला असतो आणि जर तुम्ही हा नारळ भाजीत किंवा चटणीत घातला तर त्याचे जे काही प्रसादाचे गुण असतात ते गुण नष्ट होतात.

मित्रांनो आपल्याला जे प्रसादाचे खोबरे मिळते ते आपण मांसाहारी जेवणामध्ये देखील अजिबात घालायचे नाही. बरेच जण हे मांसाहारी जेवणामध्ये देखील घालतात. परंतु मित्रांनो त्याचा वाईट परिणाम आपल्याच जीवनावर होत असतो. त्यामुळे मांसाहार पदार्थांमध्ये आपल्याला पूजेच्या वेळी किंवा देवस्थानी जो नारळ दिला जात असतो तो अजिबात तुम्ही घालायचा नाही.

जेव्हा आपल्याला पूजेच्या किंवा मंदिराच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे आपल्याला नारळ देत असताना तिथले गुरुजी सांगतात की याचा तुम्ही घरी जाऊन गोड पदार्थ बनवून खा. म्हणूनच मित्रांनो तुम्ही त्या नारळाचा गोड पदार्थ बनवू शकता.जर गोड पदार्थ बनवणे शक्य नसेल तर तुम्ही त्या नारळाच्या खोबऱ्यात प्रसाद वाटताना थोडी साखर, पेढे किंवा गोड फळांचे तुकडे मिसळून तो वाटण्याची प्रथा आहे.

त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जो काही नारळ मिळालेला असतो तो नारळ तुम्ही घरामध्ये आल्यानंतर काहीतरी गोड पदार्थ त्याचा बनवून खायचा आहे. किंवा त्या नारळाच्या खोबऱ्यात थोडेसा गूळ घालून तो प्रसाद म्हणून देखील आपल्या घरामध्ये खायचा आहे.

परंतु मित्रांनो मांसाहारी जेवणामध्ये तसेच कोणत्याही भाजी किंवा चटणीमधे तुम्ही या नारळाचा वापर अजिबात करायचा नाही. मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *