धने दूर करतील दारिद्र्य; घरात कायम नांदेल लक्ष्मी!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो, प्रत्येकाला आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असावा, लक्ष्मीची कृपा असावी यासाठी प्रत्येक जण हा लक्ष्मी मातेची पूजा करीत असतोच. तसेच लक्ष्मी मातेचे व्रत देखील करीत असतात. काही वेळा आपण व्रत करून तसेच पूजा पाठ करून देखील आपणाला लक्ष्मीचा कृपाशीर्वाद मिळत नाही.

म्हणजेच आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहत नाही. तर मित्रांनो असा आज मी एक तुम्हाला उपाय सांगणार आहे जो उपाय तुम्ही केला तर यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल. लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर होईल. लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपणाला घरातील खूपच लहान सहान वस्तू खूपच फायदेशीर ठरतात.

या वस्तूंचा आपण उपयोग करून लक्ष्मीला प्रसन्न करून घेऊ शकतो. यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या पैशासंबंधी सर्व अडचणी दूर होतात. तर मित्रांनो आपल्या घरामध्ये जर पैशाची तंगी असेल आणि जर तुम्हाला लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा. तर मित्रांनो या उपायासाठी आपणाला फक्त धने आवश्यक आहेत.

तर मित्रांनो बऱ्याच जणांनी उधार पैसे अनेक लोकांना दिलेले असतात. परंतु मित्रांनो ते उधार दिलेले पैसे काही केल्याने तो व्यक्ती परत देत नसेल तर तुम्ही कोणत्याही शुक्रवारी एक कागद घेऊन त्या कागदावरती ज्या व्यक्तीला तुम्ही पैसे दिले आहे त्याचे नाव लिहायचे आहे आणि त्यावर धन्याचे दाणे ठेवायचे आहे आणि ती कागदाची पूडी आपणाला बांधायची आहे आणि ती पूडी आपणाला वाहत्या पाण्यामध्ये सोडायची आहे. यामुळे तुमचे उधार दिलेले पैसे नक्कीच मिळतील.

तसेच मित्रांनो तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे, मतभेद होत असतील तर तुम्ही धने घराच्या पूर्वेला ठेवून हनुमान चालीसाचे पठण करा. असे केल्याने सर्व वाद, भांडणे मिटतील. मित्रांनो अनेक जणांच्या घरांमध्ये पैसा टिकत नसेल या ना त्या कारणाने खर्च होत असेल तर तुम्ही प्रत्येक बुधवारी गाईला धने खायला द्यायचे आहेत. असे केल्यामुळे घरातील पैशांची चणचण दूर होते. घरात कायम लक्ष्मी नांदते.

तसेच मित्रांनो जर तुम्हाला लक्ष्मीची कृपा हवी असेल म्हणजेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदावी असे जर वाटत असेल तर तुम्ही शुक्रवारी एका लाल रंगाच्या कापडामध्ये धने आणि एक चांदीचे नाणं ठेवून पुरचुंडी तयार करून लक्ष्मीला अर्पण करायचे आहे. यानंतर लक्ष्मीच्या मूर्तीची आणि त्या पुरचुंडीची पूजा करायची आहे.

नंतर पूजेनंतर हे कापडासहित धने आणि नाणं तिजोरी किंवा तुम्ही ज्या ठिकाणी पैसे, दागिने ठेवता त्या ठिकाणी ठेवायचे आहे. यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल आणि लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदेल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *