दिसल्याबरोबर लगेच घराबाहेर काढून टाका ‘या’ वस्तू !

राशिभविष्य अध्यात्मिक

मित्रांनो, आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आपल्याला अनेक गोष्टींचे महत्त्व जाणून घेण्यास मिळते. प्राचीन काळापासूनच वास्तुशास्त्राला विशेष असे महत्त्व दिले गेलेले आहे. मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आपल्या घराची रचना कशी असावी, कोणत्या वस्तू कोणत्या दिशेला असाव्यात या प्रकारची सर्व माहिती दिलेली आहे. यामुळे मग आपल्या घरामध्ये वास्तुदोष देखील निर्माण होत नाही.

तर मित्रांनो आज मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे या वस्तू तुम्ही आपल्या घरामध्ये अजिबात ठेवायच्या नाहीत. या जर आपल्या घरामध्ये असतील तर लगेचच त्यांना घराबाहेर काढायचे आहे. जेणेकरून त्याचा त्रास आपल्या घरातील लोकांना तसेच आपणाला होणार नाही. तसेच आर्थिक अडचण, कोणतीही संकटे आपणाला मग येणार नाही किंवा आपल्या घरामध्ये वास्तू दोष देखील निर्माण होणार नाही.

मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये दिशांना खूपच महत्त्वाचे स्थान दिले गेलेले आहे. तर मित्रांनो आपल्या घरामध्ये, दुकानात किंवा ऑफिसमध्ये अशा काही वस्तू पडून राहिलेले असतात या वस्तू आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. मग यामुळे आपल्याला अनेक आर्थिक अडचणींना तसेच आरोग्यावर तसेच मानसिकतेवर त्याचा वाईट परिणाम दिसून येतो.

तर मित्रांनो या नुकसान करणाऱ्या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत हे आता आपण जाणून घेऊया आणि या वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये अजिबात ठेवायच्या नाहीत.

तर मित्रांनो यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे निवडुंग. वास्तुशास्त्रानुसार, निवडुंगाच्या झाडावरील टोकदार काटे वाईट ऊर्जा प्रसारित करतात. ज्यामुळे आपल्या घरात राहणाऱ्या लोकांच्या मनात चिंता आणि तणाव राहतो आणि मनात वाईट भावनाही निर्माण होतात. या कारणामुळे आपण आपल्या घरामध्ये निवडुंगाचे रोप अजिबात ठेवायचे नाही.

तसेच मित्रांनो आपल्या घरात तुटल्या-फुटलेल्या काचा पडून राहणं हे आपत्तीला आमंत्रण देणारं मानलं जातं. काचेमध्ये नकारात्मक शक्तींना कैद करण्याची क्षमता असते. परंतु, जेव्हा काच तुटते तेव्हा या नकारात्मक शक्ती मुक्त होतात. हे आपल्यासाठी खूपच हानिकारक देखील ठरू शकते. म्हणून तुटलेली-फुटलेली वस्तू घरात राहू देऊ नये.

तसेच वास्तुशास्त्रानुसार, महाभारत युद्धाचे हिंसक चित्र, महिषासूर मर्दनचे चित्र, रामायण युद्धाचे चित्र इत्यादी फोटो घरामध्ये किंवा कार्यालयात अजिबात लावू नयेत. कारण असे केल्याने आपल्या वातावरणात हिंसक वृत्ती दृढ होते आणि कुटुंबातील सदस्यांना त्याचा फटका बसतो. त्यांच्यात वाद व भांडणे होण्यास सुरूवात होते.

तसेच देवांच्या तुटलेल्या मूर्ती किंवा तुटलेले चित्र घरात अजिबात ठेवू नये किंवा त्याची पूजा करू नये. असे मानले जाते की, जेव्हा देवाची मूर्ती किंवा फोटो मोडले जातात. तेव्हा नकारात्मक शक्ती त्यात येतात आणि त्यामध्ये वास करतात. जे कोणत्याही व्यक्तीसाठी अशुभ ठरू शकते.

तसेच मित्रांनो आपल्या घरात ताजमहालचे चित्र किंवा त्याची प्रतिकृती घरात ठेवणे देखील अशुभ मानले जाते.
ताजमहाल अर्थातच सुंदर आहे, पण प्रत्यक्षात तो फक्त एक मकबरा आहे. तिथे शाहजहान आणि त्याची बेगम मुमताज यांच्या कबर बांधल्या आहेत. म्हणून ताजमहालाची प्रतिकृती घरात ठेवल्यानं घरात अपवित्रता येते. तसेच ते मृत्यू आणि निष्क्रियतेचे प्रतीक मानले जाते.

तर मित्रांनो अशा प्रकारच्या वरील सांगितल्याप्रमाणे वस्तू आपल्या घरामध्ये ठेवणे आपल्याला खूपच नुकसानकारक ठरणार आहे. त्यामुळे मित्रांनो अशा वस्तू आपल्या घरामध्ये अजिबात ठेवू नका. जरी असतील तर त्या लगेचच घराबाहेर काढा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *