दर शनिवारी घरात संध्याकाळी गुपचूप हे जाळा. घरात भरभराटी येईल.

अध्यात्मिक माहिती

बाधा, आजारपण, संकटे सगळं संपेल आणि पैसा भरपूर येईल. ज्या घरात शनिवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस ही वस्तू जाळली जाते त्या घरात कोणतीही अडचण, कोणतीही नकारात्मकता, कोणतीही वाईट शक्ती, कोणताही नजर दोष राहत नाही. त्या घरात फक्त सकारात्मक ऊर्जा, शांतता, आनंद, सुख समृद्धी राहते.

ही वस्तू दर शनिवारी संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घरात जाळायची आहे. तुम्ही तुमच्या देवघरात बसून ही वस्तू जाळू शकता. ही वस्तू जाळण्यासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टी लागणार आहेत. या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर शनिवारी संध्याकाळी देवपूजा झाल्यानंतर वाटीमध्ये या दोन वस्तू ठेवून जाळा. नक्कीच फरक जाणवेल.

एका दिवसात दोन दिवसात फरक जाणवत नाही. दोन-चार शनिवार हे केलं तर हळूहळू तुम्हाला नक्की फरक जाणवायला लागेल. प्रसन्नता वाटेल, आनंद वाटेल, घरात कटकटी होत असतील तर शांतता येईल, आनंद येईल, पैसा टिकायला लागेल, सुख समृद्धी नांदायला लागेल, पैसा संपणार नाही, बरकत राहील.

आता या दोन वस्तू कोणत्या? तर पहिली वस्तू आहे ती म्हणजे कापुराची एक किंवा दोन वडी आणि जी मुख्य वस्तू आहे ती म्हणजे तेज पान किंवा तेज पत्ता जे की आपण मसाल्यामध्ये वापरतो. मसाल्याच्या दुकानातून तुम्ही तेज पान आणू शकता आणि दर शनिवारी दोन किंवा एक कापुराची वडी वाटीमध्ये ठेवायची.

आणि एक तेजपानाचे तुकडे करून ठेवा किंवा पूर्ण या कापूर वर ठेवा. आता तो कापूर जाळा. संपूर्ण कापूर आणि संपूर्ण तेज पान जळू द्या. कुठेच हलवायचे नाही ते तिथेच राहू द्यायचे. ऑटोमॅटिक सगळीकडे धूर जाईल.यानेच तुमच्या घरात कोणत्याही गोष्टींची कमतरता भासणारच नाही. सुख-समृद्धी नांदेल, पैसा येईल, आजारपण संकट बाधा सर्व काही दूर होतील.

आणि जाळून झाल्यानंतर जे ही तिथे उदी असेल राख असेल ती तुम्ही बाहेर टाकू शकता.अशा रीतीने दर शनिवारी कापूर आणि एक तेजपान तुम्ही जाळायचे आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *