एक सुपारी गुरुवारी इथे ठेवा आणि चमत्कार पहा

अध्यात्म माहिती

मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की सुपारी मध्ये श्री गणेशाचा वास असतो. जेव्हाही सत्यनारायणाची पूजा असू द्या, लग्न असू द्या किंवा अन्य कोणते होम हवन किंवा कोणतीही पूजा असतील तिथे गणपतीचे स्वरूप म्हणून सुपार्‍या सुद्धा ठेवल्या जातात आणि सुपाऱ्यांचे सुद्धा पूजन केले जाते.

पण ही सुपारी खाण्याची सुपारी नसते ही पूजेची सुपारी असते जी आपल्याला पूजा सामग्रीचा दुकानात आरामात मिळते.
मित्रांनो मी तुम्हाला फक्त एक सुपारीचा असा एक तोडगा सांगणार आहे जो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो. तुम्हाला नशिबाची साथ मिळवून देऊ शकतो.

तुम्हाला हा उपाय फक्त तुमच्या घरात सात दिवसांपर्यंत करायचा आहे. सात दिवसानंतर तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल.
आता तुम्हाला या उपायासाठी एक पूजेची नवीन कोरी सुपारी लागेल. नवीन कोरी म्हणजे तुम्हाला ती बाजारातून पूजा सामग्रीच्या दुकानातून विकत आणायची आहे. वापरलेली घरात असलेली पूजेची सुपारी वापरू नये.

तुम्हाला नवीन एक- दोन रुपयाची सुपारी जी पूजा सामग्रीच्या दुकानात मिळते ती आणायची आहे. ती आणल्यानंतर तुम्हाला तिचे दुधाभिषेक म्हणजे दुधाने तिला अभिषेक करून घ्यावे. नंतर पाण्याने अभिषेक करून घ्यावे आणि त्यानंतरच तिचा या उपायांमध्ये वापर करावा.

आता हा उपाय तुम्हाला केव्हा करायचा आहे? तर हा उपाय तुम्हाला फक्त गुरुवारच्या दिवशी करायचा आहे. सुपारी केव्हाही आणा तुम्ही आणून तिला घरात ठेवून द्या आणि गुरुवारच्या दिवशी सकाळी, संध्याकाळी किंवा दुपारी केव्हाही हा उपाय करू शकता. सुपारी गुरुवारच्या दिवशीच दुधाभिषेक करून घ्यावी.

त्यानंतर ती सुपारी आपल्या देवघरात ठेवून द्यावी कोणत्याही बाजूला डाव्या हाताला उजव्या हाताला कुठेही ती सुपारी तुम्ही ठेवून द्यावी जिथे तुम्हाला सोयीस्कर वाटेल तिथे. त्यानंतर सात दिवस लगातार सकाळ संध्याकाळ हळदी कुंकू अक्षदा टाकून त्या सुपारीचे पूजन करावे, अगरबत्ती आणि दिव्याने तिची आरती करावी.

सात दिवस तुम्ही ही प्रक्रिया अवश्य करावी आणि सात दिवस झाल्यानंतर म्हणजे आठव्या दिवशी ती सुपारी देवघरातून तुम्ही घ्यावी आणि आपल्या तिजोरी मध्ये कायमस्वरूपी ठेवून द्यावी. तिजोरी कपाट जिथेही तुम्ही तुमचे दाग दागिने, पैसा, महत्वाचे कागदपत्र ठेवत असाल त्या ठिकाणी ती सुपारी कायम स्वरूपी साठी ठेवून द्यावी.

नंतर तिला कधीही स्पर्श करू नये. हात लावू नये. चुकून हात लागला तर काही हरकत नाही. पण तिला तिथून काढून बघू नये किंवा नेहमी काढत राहायचं नाही. तिला एकदा ठेवली म्हणजे ठेवली. मग तुम्ही ती तिजोरी मध्ये ठेवू शकता, दुकान असेल तर दुकानाच्या हल्ल्यात, ऑफिस असेल तर ऑफिसच्या मुख्य ठिकाणी तुम्ही सुपारी ठेवू शकता.हा उपाय खूप चमत्कारी आहे. तुमच्या इच्छा पूर्ण करू शकतो. तुम्हाला नशिबाची साथ मिळवून देऊ शकतो.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *