गणपतीची मूर्ती कशी असावी ?मूर्ती घरी आणताना कोणते नियम पाळावे !

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो आता थोडेच दिवसांमध्ये बाप्पा येणार आहेत बाप्पा हे प्रत्येकांचेच लाडके असतात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजणच बाप्पाचे वेडे असतात भाद्रपद महिन्यामध्ये येणाऱ्या गणेशोत्सवाची तयारी प्रत्येक जण मोठ्या उत्साहाने करत असते. गणपतीची मूर्ती घेताना तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे फारच गरजेचे आहे.

म्हणजे मूर्ती कशी असावी मूर्ती घरी आणताना नेमकी कोणते नियम पाळावेत याबाबतची तुम्हाला सर्व गोष्टी मी आज सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊया नेमके कोणती नियम आहेत व मूर्ती कशी आणायची आहे. मित्रांनो जेव्हा तुम्ही आपल्या घरासाठी गणपतीची मूर्ती खरेदी करता तेव्हा एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवणे फारच गरजेचे आहे.

ती म्हणजे गणपतीची सोंड कधीही उजवीकडे नसावी उजव्या सोंडेचे गणपतीकडे विशेष लक्ष ठेवावे उजव्या सोंडेच्या गणपतीला फार सोवळ्याची गरज असते आणि हे सर्व सोवळा घरात पाळणे फारच अवघड असतं. म्हणूनच या सोंडेचे गणपती मंदिरामध्येच असतात घरात डावीकडे सोंड असलेल्या गणपतीची मूर्ती ठेवायची आहे.

सिंहासनावर किंवा लोढाला टेकून बसलेल्या विश्रम अवस्थेतील प्रतिमा ही सर्वात उत्तम मानली जाते एक ते दीड फुटा पेक्षा जास्त मोठी मूर्ती घ्यायची नाही मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता व अंत आली पाहिजे अशा पद्धतीची घ्यायची आहे गणपतीची मूर्ती एकदंत चतुर्भुज पाश आणि अंकुश धारण केलेली असावी एका हाती मोदक आणि दुसऱ्या हातात वरद मुद्रेत असावा सध्या लोक सर्व प्रकारच्या श्री गणेशाच्या मूर्ती घरी आणायला लागलेत आपल्या बाप्पाची मूर्ती वेगळी असावी अशी प्रत्येकांनाच वाटत असते.

गणपतीची मूर्ती पांढऱ्या किंवा सिंदूर रंगाची मूर्ती असणे खूपच शुभ मानले गेलेले आहे त्यामुळे पांढऱ्या किंवा सिंदूर रंगाची मूर्ती ठेवण्याचा तुम्ही जास्त करून प्रयत्न करायचा आहे शिव पार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये कारण शिवपार्वतीची पूजा लिंग स्वरूपातच केली जाते शास्त्रात मूर्ती निशिध आहे.

साप गरुड मासा किंवा युद्ध करताना व चित्रविचित्र आकारातील गणपतीची मूर्ती मुळीच घ्यायची नाही अशी मूर्ती आपल्या घरासाठी शुभ मानले जात नाही मूर्ती सुबक प्रसन्न आणि पिवळे पितांबर नेसलेली असणारी घ्यायची आहे. मूर्ती भगलेली रंग उडालेली नसावी कारण भगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही.

गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये दैवतव येत नाही तो वर केवळ माती समजावे मूर्तीची विधी व प्राणप्रतिष्ठापण करणे खूप गरजेचे आहे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पणा करण्या अगोदर काही कारणांसह मूर्ती भंग झाल्यास अजिबात घाबरू नये त्यामुळे नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून प्रतिष्ठापना करावे .

मनात कोणतेही भय व शंका आणू नये कुटुंबात किंवा नातेवाईका मध्ये मृत्यू झाल्यास घरातील व्यक्ती ऐवजी शेजारी मित्रमंडळी यांचे करवी नैवेद्य दाखवून घ्यावा गणपती विसर्जनाची घाई या काळामध्ये करायची नाही गणपती प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वाद विवाद व मध्य मासहर करु नये.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *