गणेश चतुर्थी नेमकी कधी? 18 की 19 सप्टेंबर..

अध्यात्म माहिती

यंदा वर्षे 2023 मध्ये अधिक महिना आल्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव सप्टेबर महिन्यात येत आहे आणि श्रावणातील सण उत्सव साजरे करण्या बरोबरच गणपतीची तयारी सुद्धा सुरू झालेली आहे. मात्र यंदा गणपती नेमके कधी आहेत? म्हणजे 18 ते 19 सप्टेंबर आता सब्रम निर्माण झालेला आहे. या विषयावर चर्चा होते. मात्र, याविषयी वर आपलं शास्त्र नेमकं काय सांगतात? आपण आज जाणून घेणार आहोत ..

मराठी वर्षात लाडक्या गणपती बाप्पाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. विविध स्वरूपात गणेशाचे पूजन केले जातात. महा शिवशंकर, भगवान श्रीहरी विष्णू यांच्याप्रमाणेच गणपतीने सुद्धा अनेक अवतार धारण केल्याचा कथा पुराणांमध्ये आढळतात. यानुसार गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस तीन अवतार महत्त्वाचे मानले जातात.

एक म्हणजे वैशाखी पौर्णिमेला पुष्टीपती विनायक आता जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच माघी गणेश चतुर्थी होय. यापैकी भाद्रपद चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीपासून पुढे 10 दिवस गणेश उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. आपल्या देशात अनेक पंचांग काढली जातात.

त्या त्या प्रदेशात ते पंचांग वापरून त्यानुसार व्रतवैकल्य आणि सण साजरा केला जातो. यंदाच्या गणेशोत्सवाची सुरुवात देशभरातील अनेक पंचांगात 18 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीने होणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. तर महाराष्ट्रात काही पंचगात मात्र गणेश चतुर्थीची तारीख 19 सप्टेंबर दाखवण्यात आली आहे.

काही पंचांगाप्रमाणे 18 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजून 53 मिनिटांनी गणेश चतुर्थी लागत असल्याचे दाखवण्यात आले तर काही पंचगात मात्र 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजून 38 मिनिटांनी गणेश चतुर्थीला सुरूवात होणार असे सांगितले गेले आहे.
शास्त्रानुसार गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्याची वेळ नेमकी कोणती? गणपती कधी बसवावे? याबाबत शास्त्रात काही माहिती देण्यात आली आहे.

शास्त्रानुसार सूर्योदयापासून गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत असली तरी माध्यान्ह काळी गणपतीची विशेष पुजा करावी असे सांगितले गेले आहे. दुपारी 11 वाजून 15 मिनिटांपासून ते 1 वाजून 15 मिनिटांनी पर्यंत माध्यमांना काळातल्या तर शास्त्र सांगत त्यामुळे या माध्यान्ह काळ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या काळात गणपती पूजन करावं असं सांगितलं जात आहे.

वास्तविक पाहता आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहेत. पंचांगात सूर्योदयाचा तिथीप्रमाणे गोष्टी दिलेल्या असतात. प्रदोषकाळी करावयाची व्रत आणि संकष्टी चतुर्थी त्याला सूर्योदयाची तिथी धरली जात नाही. कारण ही व्रतसंबंधित तिथी लागल्यावर केली जातात.

संकष्टी चतुर्थी चंद्रोदय महत्व अधिक असल्याने चतुर्थी तिथी लागली की, चंद्रोदयाची वेळ थांबून संकष्टी चतुर्थी धरली जाते. यंदाच्या गणेश चतुर्थी बाबतीत बोलायचं झाल्यास मंगळवार 19 सप्टेंबर रोजी सूर्योदयाच्या वेळी चतुर्थी आहे. चतुर्थी दिवशी दुपारी 1 वाजून 44 मिनिटांनी समाप्त होत आहे.

मध्यान काळी भगवान गणेशाची पूजा करावी असं शास्त्रात सांगितले गेले आणि ही बाब 19 सप्टेंबरला लागू होते. यंदाच्या गणपती विशेष म्हणजे गणपती मंगळवारी येत असल्यामुळे अंगारक योग जुळून येत आहे. त्यामुळे शास्त्रानुसार हा योग अत्यंत शुभ मानले गेले आहे, त्यामुळे आपल्या कुळाचा कुळधर्म आणि परंपरेनुसार गणेश चतुर्थीला गणेश पूजन तसेच गणपतीची प्राणप्रतिष्ठा करावी असं सांगितले जात आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *