गणपती अथर्वशीर्ष नित्य पठनाने घडेल चमत्कार, अशा व्यक्तींनी तर आवर्जून कराच.

अध्यात्मिक माहिती

गणक ऋषी यांनी लिहिलेले गणपती अथर्वशीर्ष स्त्रोत हा एक सिद्ध मंत्र मानला जातो. या स्त्रोत्रात गणरायाच्या अमूर्त स्वरूपाचं वर्णन केले गेले आहे. अर्थात आपण पाहतो तेवढेच गणेशाचे स्वरूप मर्यादित नाही तर तो चराचरात कणाकणात समावला आहे असं सांगताना गणक ऋषी म्हणतात, तू ब्रह्म तू विष्णू तू रुद्र तू इंद्र, तेवढेच काय तर आमच्या मुलाधार चक्राशी तुझा नित्य वास असतो. असा गणपती बाप्पा आपल्या सदा सर्वदा सानिध्यात असतो. त्याची प्रार्थना करणारे हे स्त्रोत्र आपल्याला आत्मरूपाची प्रचिती देणार आहे. ते नियमित म्हटल्या नंतर काय लाभ होतात ते जाणून घेऊया.

सर्वात आधी तर अथर्व या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया. थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे चंचल नाही ते. शीर्ष म्हणजे डोकं. आपले डोके शांत असेल तर आणि तरच आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो. यामुळे अथर्वशीर्ष चा पहिला लाभ म्हणजे आपले चित्त शांत होणे.

ज्या डोक्यात विचारांचे वादळ सुरू असते ते वादळ या स्तोत्र पठणाने स्थिर होत असं सांगितलं जातं. यासाठी ते स्तोत्र शांतचित्ताने म्हटलं पाहिजे. उरकून टाकल्यासारखी गोमपट्टी केली तर त्याचा काही उपयोग होत नाही. त्याचा उच्चार अर्थ समजून समजून म्हटलं तर त्याचा प्रभाव नक्की पडतो आणि त्याचा लाभही जाणवतो.

गणपती अथर्वशीर्ष पठण केल्याने मानसिक शांती तर लाभते शिवाय आत्मविश्वासही वाढतो. यामुळे मन स्थिर राहून अचूक निर्णय घेण्यास मदत मिळते. रोज गणपती अथर्वशीर्ष पाठ केल्यास जीवनात स्थिरता येते. यानी कामातील अनावश्यक अडथळे सुद्धा दूर होतात.

अथर्वशीर्ष अनेक भाविक दररोज म्हणत असतात. मात्र गणपती अथर्वशीर्ष पठण करताना काही नियम सुद्धा पाळावे लागतात. ते नियम पाळून अथर्वशीर्षाचे पठण केले तर उत्तम फलश्रुती प्राप्त होते असं म्हटेलं जात. अथर्वशीर्ष म्हणन्या पूर्वी स्नान करावे. उच्चार अगदी स्पष्ट असावे. अथर्वशर्ष एकाच गतील हळू म्हणावे.

अथर्वशर्ष पूर्वी दिलेले शांती मंत्र प्रत्येक पटनापूर्वी न म्हणता सुरुवातीला एकदाच उच्चारावे. गणेश अथर्वशीर्षाची २१ आवृत्ती म्हणजेच अभिषेक होय. अथर्वशीर्ष पठण करताना मांडी बदलणार नाही याची काळजी घ्यावी. दक्षिण दिशे शिवाय इतर कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे.

अथर्वशीर्ष पाठ करण्यापूर्वी गुरूंना तसेच ज्येष्ठांना नमस्कार करावा. अथर्वशीर्ष पठण करण्यापूर्वी गणपतीची पूजा करून आक्षता, दुर्वा, शमी आणि लाल फुले वहावी. पूजा करणे शक्य नसेल तर गणपतीच्या मनस्थितीचे ध्यान करावे आणि नमस्कार करावा. स्त्रोत्राची आवर्तन करताना फलश्रुती सर्वात शेवटी एकदाचं म्हणावी.

सहस्त्र अवर्तने शक्य नसतील तर 3, 7, 11, 21, वेळा आवर्तन करावे. मात्र जेवढे म्हणाल तेवढे मनापासून म्हणावे तरच त्याचा लाभ नक्की मिळतो ज्यांच्या कुंडलीत राहू, केतू, शनि यांचा अशुभ प्रभाव असेल त्यांच्यासाठी हा गणपती अथर्वशीर्ष पाठ खूप फायदेशीर ठरतो असेही सांगितले जाते. अशा व्यक्तीने दररोज गणपती अथर्वशीर्ष पठण करावं. यामुळे व्यक्तीचे दुःखद दूर होतं असं म्हटलं जातं.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *