घराच्या या कोपऱ्यात चुकूनही करू नका ‘हे’ काम, अन्यथा…

अध्यात्मिक वास्तुशास्त्र

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला देखील खूपच महत्त्वाचे स्थान आहे. घरातील सुख समृद्धी, धनसंपत्ती,आजारपण, भांडण या सगळ्यांचा संबंध हा वास्तूशी असतो. म्हणजेच वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्यामुळे आजकाल प्रत्येक जण हा वास्तुशास्त्राचा सखोल अभ्यास करून त्याप्रमाणेच आपल्या घराची रचना किंवा आपली वास्तू बांधत असतो.

जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी किंवा संकटे येऊ नयेत. तर आपल्या प्रत्येकालाच आपल्या घरामध्ये प्रसन्नतेचे वातावरण असावे, सर्व कुटुंबीय अगदी आनंदाचे जीवन जगावे असे वाटतच असते. तर यासाठी आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये काही नियम देखील सांगितलेले आहेत. जर तुम्ही या नियमांचे पालन करून जर तसे आपल्या वास्तूमध्ये प्रत्येक गोष्ट कराल तर यामुळे तुमचे घर कायमच प्रसन्न आणि आनंदी राहील.

तर आपल्या घरातील ईशान्य कोपरा म्हणजेच पूर्व आणि उत्तर दिशेच्या मधला भाग हा ईशान्य असतो. या दिशेमध्ये देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे हा कोपरा दैवी देखील मानला गेलेला आहे. त्यामुळे हा ईशान्य भाग जितका तुम्ही स्वच्छ ठेवाल तितके आपले घर हे सुख समृद्धीने नांदते.परंतु जर तुम्ही या ईशान्य कोपऱ्यात काही अशी कामे केला

तर त्यामुळे आपणाला अनेक संकटांचा देखील सामना करावा लागू शकतो. तर अशी कोणती कामे आहेत किंवा कोणत्या गोष्टी या आपल्या ईशान्य कोपऱ्यामध्ये अजिबात करायचा नाहीत याविषयी जाणून घेऊयात. तर घरातील देवघर कायम ईशान्य कोपऱ्यात असाव. हा कोपरा नेहमी स्वच्छ असावा.

तरच येथे मग लक्ष्मीचा वास कायम राहतो. वास्तुशास्त्रानुसार ईशान्य कोपऱ्यात कोणतीही तुम्ही जड वस्तू अजिबात ठेवायची नाही. कारण जर जड वस्तू तुम्ही ईशान्य कोपऱ्यात ठेवली तर सकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि नकारात्मकतेचा वास सुरू राहतो. तसेच या ईशान्य भागात कधीही तुम्ही चप्पल ठेवायचे नाही

किंवा घरातील कचरा देखील अजिबात गोळा करून ठेवायचा नाही. असे केल्यामुळे आपल्या घरामध्ये सर्व नकारात्मक वाईट विचार खूपच वास करतात. तसेच नवविवाहित दांपत्याची खोली देखील या भागात अजिबात नसावी. त्यामुळे परस्पर संबंधांमध्ये संघर्ष निर्माण होतो आणि अनावश्यक समस्या वाढतात .आपल्या वास्तुशास्त्रामध्ये पिण्याचे पाणी ठेवण्यासाठी ईशान्य दिशा खूपच उत्तम मानली गेलेली आहे.

त्यामुळे तुम्ही नवीन घर बांधत असाल तर तुम्ही जर घराच्या ईशान्य कोपऱ्यात जलस्त्रोत बनवा किंवा जमिनीखाली तुम्ही पाण्याची टाकी देखील बसू शकता. ईशान्य भागात विहीर खोदणे देखील खूपच शुभ मानले गेलेले आहे. यामुळे घरामध्ये ऐश्वर्य कायम राहते.

तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही घराच्या ईशान्य कोपऱ्याला या गोष्टी करणे टाळायचे आहे आणि जे ईशान्य कोपऱ्यात शुभ आहे याच गोष्टी करायचे आहेत. यामुळे आपल्या घरात मध्ये कायमच लक्ष्मीचा वास राहील. सुख-समृद्धी राहील आणि कोणत्याही संकटांचा सामना देखील तुम्हाला करावा लागणार नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *