घरात देव्हारा असताना मंदिरातही जाऊन देवदर्शन घ्यावे असे आपले पूर्वज का सांगत असत?

अध्यात्मिक माहिती वायरल

मित्रांनो, पूर्वीचे लोक हे आपल्या घरातील देवपूजा अगदी मनोभावे तसेच दररोज करीत होते. तसेच अनेक तीर्थक्षेत्री जाऊन तेथे देवी देवतांचे दर्शन देखील घेत होते आणि ज्या काही अडचणी आहेत या सर्व अडचणी त्या देवापुढे सांगत असत. हल्लीच्या काळामध्ये या व्यस्त जीवनशैलीमुळे बरेच जण हे मंदिरात जाणे टाळतात. त्यांना वेळच मिळत नाही.

मित्रांनो तुमच्याही घरांमध्ये एखादे वयस्कर आजी-आजोबा असतील तर ते देखील तुम्हाला म्हणत असतील की, मंदिरात जाऊन देवदर्शन घेऊन या. परंतु आपण याकडे दुर्लक्ष देतो आणि ते विसरूनही जातो. तसेच मित्रांनो पूर्वीच्या काळी लोक हे अंघोळ करून झाल्यानंतर अगोदर देवी देवतांचे दर्शन घेत होते. परंतु अलीकडच्या काळामध्ये आपणाला हे पाहायला मिळत नाही.

तर पूर्वीच्या काळी आपल्या आजी-आजोबा मंदिरात जाऊन देवी देवतांचे दर्शन घेण्यामागचे नेमके कारण काय होते हे तुम्हाला माहिती आहे का? तर मित्रांनो आज मी तुम्हाला याचीच सविस्तर माहिती सांगणार आहे.

मित्रांनो तुम्ही घरामध्ये व्यायाम न करता जिम मध्ये जाऊन व्यायाम करणे पसंत करता. कारण तिथे जाऊन तुम्हाला आपोआप व्यायाम करण्याची इच्छा होते उर्मी येते. कारण ते स्थान व्यायाम करण्यासाठीच बनवलेले असते. घरी पुस्तक वाचायला बसलात की तासाभरात झोप यायला लागते. पण ग्रंथालयात खूप साऱ्या पुस्तकांच्या गराड्यात बसलेलो असतानाही झोप येत नाही. उलट त्या शांततेत मन एकाग्र होते.

एवढेच काय, तर ऑफिसमध्ये बसून काम करणे आणि घरी बसून काम करणे यात केवढे अंतर आहे, ते आपण सर्वांनीच अनुभवले. त्याचप्रमाणे मंदिर बंद असताना आपण देव्हाऱ्यातल्या देवापुढेच ध्यान लावून प्रार्थना केली. तर जी अनुभूती मंदिरात येते, ती घरात येणे कठीण असते.

आपण मंदिरात चपला काढून, पाय धुवून मग प्रवेश करतो. मंदिराचा मोकळा सभामंडप आपले सगळे विचार विसरायला लावतो. आपण ‘मी’ मधून ‘आम्ही’च्या विश्वात प्रवेश करतो. म्हणून तिथे गेल्यावर स्वतः साठी काही मागत न बसता, तिथली सकारात्मक ऊर्जा शक्य तेवढी शोषून घ्यावी.

मंदिरे हे काही देवाकडे मागण्याचे ठिकाण नाही. ते विद्युत ऊर्जा केंद्र आहे. तिथे आपण सांसारिक प्रश्न घेऊन गेलो, तर मन:शांती कधीच लाभणार नाही. तिथल्या वातावरणाशी एकरूप होऊन उदबत्तीचा, धुपाचा, फुलांचा गंध घ्या. तिथल्या सकारात्मक लहरींशी मन जोडण्याचा तुम्ही प्रयत्न करा. देवासमोर तेवणाऱ्या मंद समईच्या प्रकाशात देवाची मूर्ती पहा आणि शांत चित्त लावून ध्यान धारणा करा.

तर मित्रांनो या सर्व गोष्टी आपणाला घरात बसून अनुभवता येणार नाहीत. एकदा का मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली की मन हे मंदिरासारखे भासू लागेल. त्यामुळेच मित्रांनो घरातील देवघरांमध्ये देवांचे दर्शन घेतले तरीही आपण मंदिरामध्ये देवांचे दर्शन नक्कीच घेण्यासाठी जावे. तुमचे मन नक्कीच प्रसन्न होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *