घरात लक्ष्मीचा फोटो या दिशांना नसेल तर होणार आर्थिक नुकसानच !

अध्यात्मिक

मित्रांनो,आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या देवी देवतांच्या मुर्त्या तसेच फोटोज देखील असतात. प्रत्येक जण हा आपल्या देवघरा मधील देवांची पूजा दररोज अगदी मनोभावे व श्रद्धेने करीत असतात. मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळ्या देवी देवतांच्या मुर्त्या या असतात. तसेच मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी प्रत्येक जण लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये ठेवतात.

मित्रांनो लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने घरामध्ये सुख शांती लाभते. तसेच कोणत्याही प्रकारची अडचण देखील येत नाही. लक्ष्मी मातेला धनाची देवता मानतात. त्यामुळे आपल्याला घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण भासत नाही.

मित्रांनो बरेच जण हे लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय करीत असतात. तसेच लक्ष्मी मातेचे व्रत देखील ते करीत असतात. तर मित्रांनो तुमच्या देखील घरांमध्ये लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती नेमकी कोणत्या दिशेला असावी याविषयी मी सविस्तर माहिती सांगणार आहे. जर तुम्ही लक्ष्मी मातेचा फोटो अयोग्य दिशेला लावला किंवा ठेवला तर यामुळे तुम्हाला खूपच आर्थिक अडचण निर्माण होते. तसेच आर्थिक नुकसान भरपूर प्रमाणात होते.

तर मित्रांनो देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तिची मूर्ती घरात योग्य दिशेला ठेवावी. लक्ष्मी देवीचा फोटो किंवा मूर्ती कोणत्या दिशेला लावणे शुभ आहे ते जाणून घेऊया. वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मीचा फोटो दक्षिण दिशेला लावणे शुभ नाही. यामुळे घरातील सुख-समृद्धी नाहीशी होते आणि गरिबी येते असे मानले जाते.

याशिवाय देवी लक्ष्मीचा फोटो उभ्या स्थितीतही लावू नये. या स्थितीतील फोटोमुळे ती एका ठिकाणी थांबत नाही. त्यामुळे लक्ष्मीच्या निवासासाठी तिचा फोटो बसलेल्या स्थितीत लावणे भाग्यशाली ठरेल. वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नेहमी उत्तर दिशेला लावावा. यामुळे आपल्या घरात सुख-समृद्धी, संपत्ती, धान्य आणि वैभव टिकून राहते.

व्यापारामध्ये भरपूर प्रमाणात नफा मिळाल्याने आपली जीवनामध्ये प्रगती होईल. तसेच मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार एका ठिकाणी लक्ष्मीच्या एकापेक्षा जास्त मूर्ती बसवू नये.हे अशुभ मानले गेलेले आहे. तसेच लक्ष्मी देवीच्या मूर्ती किंवा फोटोजवळ सुंदर रांगोळी काढावी. देवी लक्ष्मीची मूर्ती उजव्या बाजूला गणपतीसोबत किंवा डाव्या बाजूला विष्णूसोबत ठेवावी. सकाळ-संध्याकाळ भक्तीभावे लक्ष्मीची पूजा करून तिच्याकडे सुख, समृद्धी आणि सौभाग्याचे वरदान मागावे.

तर मित्रांनो तुमच्याही घरांमध्ये जर लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर ती योग्य दिशेलाच लावा. यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. तसेच आर्थिक नुकसान देखील आपले होणार नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *