घरात माठ असल्याने काय फायदे होतात नक्की जाणून घ्या

अध्यात्मिक वास्तूशास्त्र

मित्रांनो, पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये आपणाला पिण्याचे पाणी वापरण्यासाठी माठ पाहावयास मिळत असे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूमध्ये मातीच्या पाण्याचे माठ वापरत असत आणि या माठाचे पाणी पिण्याची सवय ही सर्वांनाच होती. माठातील पाणी पिल्यामुळे कुणाला देखील सर्दी किंवा कोणत्याही प्रकारचा आजार देखील पूर्वीच्या काळी अजिबात होत नसे.

परंतु हल्लीच्या काळामध्ये प्रत्येक जण हा फ्रीजचा वापर करीत असलेला आपल्याला पाहायला मिळते. परंतु आपल्या घरामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आपण जर मातीचा माठ वापरला तर याचे खूप सारे फायदे आपल्याला होतात याविषयीची आपल्याला माहिती वास्तुशास्त्रामध्ये पाहायला मिळते.

आजही उन्हातून घरी आल्यानंतर माठातले थंडगार पाणी पिले तर तहानही भागते आणि गारवाही जाणवतो. तसे इतर कोणत्याही पाण्यात नाही. आजही ग्रामीण भागात घरोघरी मातीचे माठ असतात त्यातलेच पाणी लहानांपासून मोठ्यांपर्यंत पितात. शहरी भागात कुठेतरी घरामध्ये अडगळीच्या सामानात हे माठ पाहायला मिळतात.

घरात माठ भरून ठेवणे याचा वास्तुशास्त्राशी खूप निकटचा संबंध आहे. घरात असलेला माठ हा घरातील भरभराटीसाठी, संपत्तीसाठीही महत्त्वाची कामगिरी बजावते. चला तर मग जाणून घेऊया घरात पाण्याचा माठ का असावा? वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या पाण्याच्या माठामुळे घरात असणाऱ्या अनेक प्रकारच्या अडचणी तसेच संकटांपासून आपली सुटका होते.

आपल्या संकटांचे निराकारण करण्याचे कार्य माठा मार्फत नकळतपणे होत राहते. असे म्हणतात की आपल्या घरातील पाण्यातील पाण्याच्या भांड्यात आपल्या पितरांचा वास असतो. जर घरात पिण्याच्या पाण्याचे भांडे भरून ठेवले नाही तर आपले पितर कोठे वास्तव्य करतील.

पूर्वीच्या काळी दररोज सकाळी घरातील माठातील एक तांब्याभर पाणी घेऊन महादेवाच्या मंदिरात जाऊन ते महादेवाला जाऊन अर्पण केले जात असे. यामुळे दररोज आपल्या घरातील पितृआपोआप बाहेर पडत असत. आज-काल असे होत नसल्याकारणाने पितृ घरांमध्ये तसेच राहतात आणि आपल्या घरामध्ये मग पितृदोष वाढतच राहतो.

मग आपल्या अनेक कामांमध्ये अडचणी येत राहतात. संकटे येत राहतात. घरामध्ये भांडणे, वादविवाद होत राहतात.
पण आपल्याला त्यांचे कारणच समजत नाही. तसेच आपण जो घरात पाण्याचा माठ भरून ठेवतो तो नेहमी घराच्या उत्तर दिशेला असावा. माठात निम्यापेक्षा कमी झालेले पाणी घरात वादविवाद आणि भांडण उत्पन्न करते.

जर पाण्याचे भांडे निम्म्यापेक्षा खाली गेले तर घरात चोवीस तासाच्या आत घरात भांडणे नक्कीच होतात. म्हणून पिण्याच्या पाण्याचे भांडे कधीही अर्ध्यापेक्षा खाली जाऊन देऊ नये. तुमच्या घरामध्ये जर कोणाला मानसिक दडपण आलेले असेल म्हणजेच तो व्यक्ती ताणतणावांमध्ये असेल तर अशा व्यक्तीने माठातून एक तांब्याभर पाणी घेऊन एखाद्या झाडाला सलग काही दिवस टाकावे. या उपायामुळे नक्कीच त्या व्यक्तीचा ताण तणाव, दडपण दूर होईल.

तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे घरामध्ये जर तुम्ही पिण्याच्या पाण्यासाठी माठ वापरत असाल तर हे फायदे तुम्हाला नक्कीच जाणवतील आणि तुमचे घर हे सुखा समाधानाने नांदेल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *