घरात पिंपळाचे झाड उगविणे शुभ की अशुभ? वास्तूशास्त्र काय सांगते?

अध्यात्मिक वास्तूशास्त्र

मित्रांनो, आपल्या आजूबाजूला अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडे आपल्याला पाहायला मिळतात. परंतु त्यापैकीच पिंपळाचे झाड याला हिंदुधर्मांमध्ये खूपच पूजनीय मानले गेलेले आहे. बरेच जण हे पिंपळाच्या झाडाची पूजा अगदी मनोभावे करीत असतात. असे म्हटले जाते की, पिंपळाच्या झाडांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो.

जर पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. तसेच सुख-समृद्धीचा आशीर्वाद देखील देत असते. त्यामुळे पिंपळाच्या झाडाची पूजा करणे खूपच शुभ मानले गेलेले आहे. परंतु घरात पिंपळाचे झाड किंवा रोप वाढवणे अशुभ आहे. जर हे झाड आपल्या घराच्या कानाकोपऱ्यात वाढत असेल तर याचा अर्थ घरावर वास्तु दोषांचा प्रभाव पडतो.

पिंपळाच्या झाडाची पूजा बरेचजण करतात. कारण पिंपळाच्या झाडामध्ये देवतांचा वास असतो. परंतु आपल्या घरात पिंपळाचे झाड असणे हे वास्तुशास्त्रानुसार अयोग्य मानले जाते. म्हणूनच पिंपळाचे झाड हे घरात अजिबात वाढू देऊ नये आणि वाढले तर ते काढून टाकावे.

घरात पिंपळाचे झाड असल्यामुळे घरातील सदस्यांची प्रगती होत नाही. त्यांच्या कामांमध्ये नवनवीन अडचणी निर्माण होतात. तसेच बरेच जण हे पिंपळाचे झाड तोडतात. परंतु पिंपळाचे झाड तोडणे हे अशुभ मानले जाते. जर तुम्हाला पिंपळाचे झाड कापायचे असेल तर त्याची पूजा करून फक्त रविवारीच कापावे. इतर कोणत्याही दिवशी तोडू नये.

वास्तुशास्त्रामध्ये पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे खूप सारे फायदे सांगितले गेलेले आहेत. शनिवारी जर पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर शनिदेव प्रसन्न होतात. तसेच शनिदोष देखील दूर होतो. याबरोबरच सर्व दुःखापासून देखील मुक्ती मिळते. तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा अवश्य करावी. जेणेकरून आपल्याला शुभ फळ प्राप्त होते. परंतु आपल्या घरामध्ये पिंपळाचे झाड तुम्ही अजिबात ठेवू नये. कारण घरात पिंपळाचे झाड असणे हे अशुभ मानले गेलेले आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *