घरांत शंकराचा फोटो लावतांना या चुका टाळा..!!

अध्यात्म माहिती

तुमच्या घरात भगवान शिवशंकराचा फोटो लावायचा आहे का? मग हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे. सध्या श्रावण मास सुरू आहे आणि अशातच घरोघरी देवाधिदेव भगवान महादेव यांची पूजा केली जाते. मात्र घरात जर तुम्हाला शिव शंकराचा फोटो लावायचा असेल, तर त्यासाठी काही गोष्टींची खबरदारी तुम्हाला घेणं अत्यावश्यक असणार आहे.

घरात महादेवाचा फोटो लावण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी चला आज आपण जाणून घेऊयात. .भगवान शिव भोलेनाथ असं म्हणतात. कारण ते भक्तांच्या उपासनेने लवकर प्रसन्न होतात. भगवान शिवाच्या पूजेत महत्त्व शास्त्र आणि पुराणात सांगितले आहे. भक्तांच्या खऱ्या व्यक्तींनाच भगवान शिव प्रसन्न होतात आणि इच्छित वरदान देतात.

त्यामुळे आपण पाहतो की, अनेक जण आपल्या घरात आणि कार्यालयात भगवान शिव शंकराची मूर्ती किंवा फोटो ठेवत आहे आणि घरामध्ये भगवान शंकरांचा फोटो लावणे शुभ असतं. मात्र वास्तू शास्त्रामध्ये भगवान देवतांचे फोटो लावण्याचे ही काही नियम सांगण्यात आले आहेत.

तर वास्तू नियमानुसार भगवान शंकराची मूर्ती किंवा फोटो स्थापित केल्यास शुभफळ प्राप्त होतात. मात्र हा फोटो कसा असावा? तर घरांत सुखशांती हवी असेल तर महादेवांचा ध्यानात चा फोटो घरात लावावा. आता हा फोटो लावल्यानं घरातलं वातावरण सुखद राहतं आणि कोणतीही बाहेरची शक्ती आपल्याला त्रास देऊ शकत नाही असं सांगितले जाते. यामुळे कोणतीही निगेटिव्ह एनर्जी म्हणजे नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश नाही करू शकत नाही असं सुद्धा म्हटलं जातं.

याउलट भगवान शंकरांचा असा फोटो जो तांडव करत आहेत. असा फोटो घरात लावू नये. कारण हे महादेवाचे विक्राळ रूप आहे या रूपात महादेव प्रसन्न नसून ते उग्र रुपात पाहायला मिळतात, म्हणून असा फोटो घरात नकारात्मक ऊर्जा सुद्धा आणू शकतो. त्यामुळे असा फोटो घरात ठेवणे टाळावे. याबरोबरच महादेवांचा तुटलेला फोटो घरात ठेवू नये असं करणं सुद्धा अशुभ मानले गेले आहे.

महादेवाची पिंड भग्नावस्थेत असल्याने त्यालाही आपल्या देवघरात ठेवणे चुकीचे आहे. कारण यामुळे घराय दारिद्र्य आणि निराशा येण्याची शक्यता असते, असे सांगितले जात. त्यामुळे असा तुटलेला फोटो किंवा शिवलिंग असल्यास त्याला नदीच्या प्रवाहात प्रवाहित करावे असेही म्हणतात. या आपल्या घरात फोटो लावायचा झाल्यास बारा ज्योतिर्लिंगा मधला कोणताही फोटो घरात लावला जाऊ.

त्यामुळे घरात पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे सकारात्मक उर्जा कायम राहते आणि या फोटोमुळे घरात आलेली सकारात्मक ऊर्जा घरातल्या मंडळींवर प्रभाव टाकते आणि अशाप्रकारे आपल्या घराचं वातावरण हसत खेळत राहत. याबरोबरच महादेवाचा फोटो लावताना तो कोणत्या दिशेला लावावा यालाही महत्त्व प्राप्त झाले.

भगवान महादेवाचा फोटो नेहमी उत्तर दिशेला लावावा, असं वास्तुशास्त्रा नुसार सांगितलं जातं. याबरोबरच महादेवांचे प्रिय स्थान कैलास पर्वत उत्तरेकडे आहे. वास्तुशास्त्रानुसार महादेवाचा फोटो उत्तर दिशेला लावण्याचे योग्य मानले जातात. शिवाय शास्त्रानुसार कैलासावर बसलेल्या शिव शंकराची मूर्ती घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवता येत असेल तर नक्की ठेवावी.

याबरोबरच तुम्हाला हवा असल्यास तुम्ही नंदी वर बसलेल्या भगवान शिवाचं किंवा प्रसन्न मुद्रेत असलेलं भगवान शिवचे फोटो लावू शकता. त्यामुळे घरामध्ये सकारात्मक उर्जेचा संचार होतो आणि भगवान शिवशंकराची कृपा आपल्या कुटुंबावर सदैव राहते असं सांगितलं जातं. तर अशा प्रकारे भगवान शिवशंकराचा फोटो जर तुम्ही लावण्याचा विचार करत असतात तर यानुसारच लावा. त्याचे तुम्हाला योग्य लाभ मिळतील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *