घरात या ठिकाणी ठेवू नये गणेश मुर्ती; धनसंपत्तीला पोहोचेल हानी!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो प्रत्येक जण हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे व्रत उपवास हे करीत असतात. आपल्या जीवनातील अडीअडचणी संकटे दूर व्हावेत यासाठी आपण उपवास देवतांचे करीत असतो. आपल्यापैकी बरेच जण हे विघ्नहर्ता गणेशाचे भक्त आहेत. गणेशजी हे आपल्या भक्तांचे सर्व संकटे दूर करतात. बरेच जण हे संकष्टी चतुर्थीचे व्रत देखील अगदी मनोभावे व श्रद्धेने करीत असतात.

परंतु आपण ही पूजा करत असताना काही चुका देखील न करणे गरजेचे आहे. कारण काही चुका आपल्या हातून झाल्या तर त्याचा अशूभ परिणाम आपल्या जीवनावर होत राहतो. तर मित्रांनो आज मी तुम्हाला घरामध्ये कोणत्या ठिकाणी गणेश मूर्ती ठेवायची नाही जेणेकरून धनसंपत्तीला हानी पोहोचू शकते म्हणजेच आपणाला आर्थिक टंचाई भासू शकते. तर ही जागा नेमकी कोणती आहे चला तर मग जाणून घेऊया.

आपण ज्यावेळेस मूर्ती खरेदी करतो त्यावेळेस काही गोष्टींची विशेष काळजी घेणे देखील गरजेचे आहे. जर तुम्हाला दररोज पूजा प्रार्थना करणे जमत असेल तरच तुम्ही गणेशाची मूर्ती खरेदी करायची आहे. तसेच उजव्या सोंडेची मूर्ती अजिबात खरेदी करायची नाही. तसेच आपण जी गणपतीची मूर्ती खरेदी केलेली आहे ती आपल्या घरामध्ये ईशान्य दिशेला स्थापित करावी.

तसेच गणपतीचे मुख हे मुख्य द्वाराकडे येईल अशा पद्धतीने स्थापित करायचे आहे. तसेच गणपतीच्या एका हातामध्ये मोदक आणि दुसरा हात हा वरद मुद्रेमध्ये असावा.तर अशा प्रकारची मूर्ती आपण खरेदी करून आणायची आहे तसेच ही मूर्ती भंग पावलेली देखील नसावी जर मूर्ती आपण खरेदी केली तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत नाही. अनेक संकटे येण्यास सुरुवात होते.

तर अशी ही गणपतीची मूर्ती तुम्ही लिविंग रूम मध्ये अजिबात स्थापित करायची नाही. तसेच जिन्या खाली जागेमध्ये देखील तुम्ही गणपतीची पूजा करायची नाही म्हणजेच जिन्याखाली कधीही मूर्ती स्थापित करायची नाही. कारण यामुळे आपल्या घरामध्ये अनेक अडीअडचणी येऊ शकतात. तसेच आपले घर कधीही शांततेत राहत नाही.

काही ना काही संकटे हे येतच राहतात. त्यामुळे लिविंग रूम तसेच जीन्याखाली गणपतीची मूर्ती स्थापित करायची नाही. तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही देखील गणपतीची मूर्ती खरेदी करणार असाल तर वरील सांगितलेल्या गोष्टींचे अवश्य पालन करा आणि योग्य त्या ठिकाणी गणपतीची मूर्ती स्थापित करा. यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील आणि सर्व संकटातून आपल्याला बाहेर देखील काढतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *