घरातील तिजोरीचं तोंड चुकीच्या दिशेला ठेवल्यास लक्ष्मी होईल नाराज !

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो, आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आपणाला अनेक गोष्टींचे ज्ञान प्राप्त होते. वास्तुशास्त्रामध्ये काही नियम सांगितलेले आहे. त्या नियमांचे आपण जर काटेकोरपणे पालन केले तरी यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत नाही. तसेच मित्रांनो आपल्याला आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणीत देखील येत नाहीत.

मित्रांनो आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या वस्तूंचे वेगवेगळे योग्य ती दिशा सांगितलेली आहे आणि त्या दिशेला जर आपण त्या वस्तू ठेवल्या तर त्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर होत असतो. कोणत्याच मग अडचणी आपल्याला येत नाहीत.

प्रत्येक जण हा लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होण्यासाठी अनेक उपाय करतात. आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असावा असे वाटतच असते. यासाठी मग आपल्याला योग्य ती काळजी देखील तसेच वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेल्या नियमांचे देखील पालन करणे गरजेचे आहे.

तर मित्रांनो आज मी तुम्हाला आपल्या घरातील तिजोरी ही नेमक्या कोणत्या दिशेला तोंड करून ठेवायची आहे जेणेकरून लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदेल. याविषयी माहिती सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊया तिजोरीची नेमकी कोणती योग्य दिशा आहे ते.

तर मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घरातील जी तिजोरी आहे या तिजोरीचे तोंड हे उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे. कारण ही दिशा कुबेराची दिशा मानली गेलेली आहे आणि या दिशेला जर तुम्ही तोंड करून तिजोरी ठेवली तर तुम्हाला कधीही पैशाची अडचण भासत नाही.आर्थिक कोणतीही समस्या जाणवत नाही. या दिशेला तोंड करून ठेवलेली तिजोरी ही कायमच संपत्तीने भरलेली असते.

तसेच मित्रांनो पश्चिम किंवा दक्षिण दिशेला तोंड करून जर तुम्ही आपल्या घरातील तिजोरी ठेवली तर त्या घरामध्ये कधीही पैसा टिकून राहत नाही. कितीही जरी आपण पैसा कमवला तरी तो पैसा या नात्या कारणाने खर्च होतो. यामुळे मित्रांनो तो पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही. त्यामुळे या दिशेला तोंड करून तुम्ही अजिबात आपल्या घरातील तिजोरी ठेवायची नाही.

तसेच मित्रांनो आपण तिजोरी जवळ कधीही झाडू ठेवायचा नाही. कारण यामुळे आपल्याला आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. तसेच मित्रांनो संध्याकाळी आपण घरामध्ये झाडू देखील मारायचा नाही. कारण यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. कारण ती वेळ देवी लक्ष्मीच्या घरी आगमनाची वेळ असते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी देखील तुम्ही झाडू मारायचा नाही.

तसेच मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रानुसार ईशान्य कोपऱ्यात कचरा कधीही लावायचा नाही. कारण हा जो कोपरा असतो हा कोपरा खूपच शुभ मानला गेलेला आहे आणि यामुळे तुम्ही ईशान्य कोपऱ्याला अजिबात कचरा लावायचा नाही.

तसेच मित्रांनो आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर देखील कचरा ठेवायचा नाही. कारण यामुळे मग देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तसेच मित्रांनो रोज संध्याकाळी तुम्ही तुमच्या मुख्य जो काही प्रवेशद्वार आहे तेथे तुपाचा दिवा अवश्य लावावा. यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो.

वरील सांगितल्याप्रमाणे मित्रांनो आपल्या घरातील तिजोरी ही योग्य त्या दिशेला ठेवायची आहे. यामुळे लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम राहील. आपणाला आर्थिक समस्या अजिबात जाणवणार नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *